आजकाल टॅनिंगची समस्या सर्वांनाच मोठ्याप्रमाणावर जाणवू लागली आहे. आधी केवळ हा त्रास उन्हाळ्यामध्ये जास्त जाणवायचा मात्र आता ऋतू कोणताही असला तरी टॅनिंगची समस्या मात्र कायम आहे. टॅनिंगमुळे आपली त्वचा काळवंडते आणि आपला रंग बदलून जाते. शिवाय हे टँनिग फक्त चेहऱ्यापुरते मर्यादित राहत नाही तर हात, मान, पाय आणि शरीराच्या इतर भागांवर देखील परिणाम करते. मुख्य म्हणजे टॅनिंग फक्त उन्हामुळेच होते असे नाही, तर बदलणारे वातावरण, धूळ, माती, प्रदूषण यांमुळे देखील टॅनिंगची समस्या वाढते. (Skin Care)
टॅनिंग निघाल्यानंतर रंग उजळतो आणि त्वचा देखील सतेज दिसू लागते. टॅनिंग काढण्यासाठी जवळपास सर्वच महिला पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रीटमेंट करून घेतात. याचा नक्कीच त्यांना फायदा होत असला तरी तो खूपच कमी काळ होतो. कधी कधी या ट्रीटमेंटमुळे अनेक साइड इफेक्ट होण्याची देखील शक्यता असते. तर काही महिलांना कितीही महागड्या ट्रीटमेंट केल्या तरी फरक पडत नाही. मग अशावेळेस सर्वच घरगुती आणि नैसर्गिक साधे सोपे उपाय शोधतात. नैसर्गिक पद्धतींनी टॅनिंग काढून टाकणे हा सर्वोत्तम आणि सुरक्षित उपाय आहे. आज या लेखात आपण काही घरगुती टॅन रिमूव्हल उपाय पाहणार आहोत जे करून नक्कीच तुम्हाला फरक पडेल आणि त्वचा चांगली दिसेल. (Marathi News)
दही आणि हळद
व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ त्वचेसाठी फायदेशीर असतात. या पदार्थांमुळे त्वचा उजळण्यास मदत होते. टॅनिंग दूर करण्यासाठी दही आणि हळद उत्तम पर्याय आहेत. दही त्वचेला मॉइश्चरायझ करते तर हळद नैसर्गिक एक्सफोलिएटर म्हणून काम करते. टॅन काढण्यासाठी एक चमचा दह्यात चिमूटभर हळद मिसळा आणि हा पॅक टॅन झालेल्या भागावर लावा. २० ते ३० मिनिटे तसंच राहू द्या आणि नंतर पाण्याने धुवा. यामुळे त्वचेवरील टॅन निघून जाईल आणि त्वचा उजळण्यास मदत होईल. (Latest Marathi News)
टोमॅटो
टोमॅटोमध्ये असलेले लायकोपीन आणि अँटीऑक्सिडंट्स टॅनिंग दूर करण्यास मदत करतात. टोमॅटो अर्धा कापून त्याचा रस काढा. हा रस चेहऱ्यावर १० मिनिटे लावा. त्यानंतर चेहरा पाण्याने धुवा. असे केल्याने टॅनिंग कमी होईल आणि तुमची त्वचाही चमकदार होईल.
कोरफड जेल
कोरफड जेलमध्ये असलेले गुणधर्म त्वचा हायड्रेट ठेवण्यास मदत कतात. कोरफड जेल त्वचा थंड ठेवते. टॅनिंग दूर करण्यासाठी कोरफड जेल एक उत्तम पर्याय आहे. दररोज ३० मिनिटे कोरफडीचे मास्क चेहऱ्यावर लावून ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवा. चेहरा स्वच्छ धूतल्यानंतर त्यावर मॉइश्चरायझर लावा. यामुळे टॅनिंग दूर होण्यास मदत होते. (Top Marathi News)
काकडीची पेस्ट
काकडी शरीर तसेच त्वचा हायड्रेटेड ठेवण्यास फायदेशीर आहे. यामुळे त्वचा फ्रेश होते. टॅनिंग कमी करण्यासाठी काकडी बारीक करून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर आणि ज्या ठिकाणी टॅन आहे तेथे लावा. १५ ते २० मिनिटं राहू द्या. नंतर थंड पाण्याने धुवा यामुळे टॅनिंगपासून सुटका होईल.
दही
टॅनिंग दूर करण्यासाठी दह्याचा वापर करता येतो. दह्यामध्ये असलेले लॅक्टिक अॅसिड, कॅल्शियम, प्रथिने आणि व्हिटॅमिन डी टॅनिंग काढून टाकते आणि त्वचा मऊ करते. टॅनिंग दूर करण्यासाठी, १ चमचा तांदळाचे पीठ २ चमचे दह्यात मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट टॅन झालेल्या भागावर लावा आणि हलक्या हाताने घासून घ्या. ५ मिनिटांनी ते धुवून टाका. (Top Trending News)
लिंबू
लिंबूमध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक अॅसिड केवळ टॅनिंग दूर करत नाही तर मुरुमांची समस्या देखील सोडवते. १ चमचा मधात लिंबाचे ३ ते ४ थेंब मिसळा आणि पेस्ट बनवा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर ५ मिनिटे लावा. त्यानंतर चेहरा पाण्याने धुवा. लक्षात ठेवा कधीही लिंबू थेट चेहऱ्यावर लावू नका.
बटाट्याचा रस
बटाच्याच्या रसामध्ये एंजाइम आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. जे त्वचेला चमकदार बनवते आणि डागं कमी करण्यास मदत करते. बटाटे किसून त्याचा रस काढा. काढलेला रस कॉटनच्या सहाय्याने टॅन झालेल्या भागावर लावा. 15 ते 20 मिनिटे तसंच राहू द्या आणि नंतर पाण्याने धुवा.
==============
हे देखील वाचा : Haritalika Vrat : जाणून घ्या हरितालिका व्रताचा मुहूर्त आणि पूजा विधी
Ganesh Chaturthi : गणेश चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त आणि शुभ वेळ
===============
बेसन
वाटीमध्ये बेसन घेऊन त्यात कच्चे दूध, हळद मिक्स करा आणि टॅन झालेल्या भागावर लावा. ५ ते १० मिनिट ठेवून नंतर त्वचा स्वच्छ करून घ्या. यामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी होईल आणि त्वचा सुंदर चमकदार दिसू लागेल. हा उपाय आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा करावा. (Top Marathi stories)
पपई मास्क
पपईमध्ये पपेन नावाचे संयुगे आढळतात. जे त्वचेला एक्सफोलिएट करते आणि त्वचेचा रंग सुधारण्यास मदत करते. पिपकलेली पपई मॅश करा आणि ती तुमच्या त्वचेवर मास्कप्रमाणे लावा. २० ते ३० मिनिटं तसंच राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. यामुळे टॅनिंग दूर होण्यास मदत होईल. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics