पावसाळा कायमच लोकांना सुखावणारा ठरतो. या ऋतूमध्ये निर्माण होणार वातावरणातील थंडावा सगळ्यांनाच हवाहवासा वाटतो. पावसाळा जरी सगळ्यांचा आवडता ऋतू असला तरी या ऋतूचे त्रास देखील भरपूर आहेत. पावसाळ्यात हवेतील आर्द्रता वाढते. याचा परिणाम थेट आपल्या त्वचेवर होताना दिसतो. यामुळे त्वचा कोरडी होण्याची शक्यता अधिक असते. त्यातही जर तुमची त्वचा आधीच कोरडी असेल तर यामुळे ही समस्या अधिकच वाढू शकते. शिवाय पावसाळ्यात आपण पाणी सुद्धा खूप कमी प्रमाणात पितो त्यामुळे देखील शरीर आणि त्वचा डिहायट्रेट होऊन कोरडी पडते. अशावेळी आपण आपल्या त्वचेची काळजी घेणे आवश्यक असते. (Beauty Tips)
एवढेच नाही तर ज्यांची त्वचा तेलकट आहे, त्यांच्यासाठी देखील हा ऋतू त्रासदायक ठरू शकतो. कारण पावसाळ्यात तेलकट त्वचा असलेल्या लोकांना त्वचेवर पुरळ येणे, त्वचा लाल होणे, चट्टे पडणे आदी त्रास सहन करावे लागतात. त्यामुळे तेलकट त्वचा असलेल्या लोकांनी देखील काळजी घेणे आवश्यक असते. आता त्वचेची काळजी घेणे म्हणजे सतत पार्लरमध्ये जाणे आणि महागड्या ट्रीटमेंट घेणे असे नाही, तर आपण आपल्या आहारात बदल करून आणि छोटे छोटे उपाय करून देखील त्वचेची योग्य ती काळजी घेऊ शकतो. (Todays Marathi News)
* पावसाळ्यात हवेत आर्द्रता मोठ्या प्रमाणात असते. जर सतत पावसाच्या पाण्याचा संपर्क त्वचेशी होत असेल तर त्वचा कायम ओलसर राहते. यामुळे जंतुसंसर्ग वाढतो, खाज येते. अशा वेळी त्वचा जास्तीत जात कोरडी ठेवण्याचा प्रयत्न करा. यासाठी त्वचा स्वच्छ अशा मुलायम सुटी कापडाने पुसत राहा. (Top Marathi HEadline)
* पावसाळ्यात वातावरणात खूप मोठ्या प्रमाणात बदल होत असतो. या दिवसांमध्ये जर थोडे जरी ऊन पडले तरी भरपूर घाम येतो. घामावाटे शरीरातील पाणी कमी होत असते. त्यामुळे त्वचा कोरडी होते. म्हणूनच पावसाळ्यात भरपूर पाणी प्या. या दिवसांमध्ये दिवसभरात कमीतकमी आठ ते दहा ग्लास पाणी पिणे गरजेचे असते. पाण्यासोबतच लिंबू पाणी, नारळपाणी प्यायल्यास देखील त्वचा हायड्रेटेड राहते. (Latest Marathi News)
* त्वचेला पोषण देण्यासाठी मॉइस्चराइर वापरणे आवश्यक असते. त्यामुळे जर त्वचा रखरखीत लागत असेल तर तुमच्या त्वचेला मॉइस्चरायझरची नितांत गरज आहे असे समजावे. आपल्या त्वचेच्या गरजेनुसार योग्य मॉइस्चराइझरची निवड करा आणि ते लावत जा. पावसाळ्यात तुम्ही जेल बेस्ड मॉइस्चराइझर वापरू शकता. (Top Marathi News)
* आहारामध्ये व्हिटॅमिन सी चा वापर जास्तीत जास्त करावा. व्हिटॅमिन सी हा अँटीऑक्सीडेंट आहे. यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती तर वाढतेच शिवाय याचा त्वचेचा देखील भरपूर फायदा होतो. भरपूर सलाड, भाज्या यांचा आहारात समावेश करणे देखील गरजेचे आहे. (Top Stories)
* पावसाळ्यात वातावरणात थंडावा वाढू लागल्यानंतर लगेच जर तुम्ही कडक पाण्याने अंघोळ करत असाल तर हे योग्य नाही. अति गरम पाण्याने अंघोळ केल्यामुळे तुमच्या त्वचेचा मऊपणा कमी होतो. त्वचा कोरडी आणि रखरखीत होते. यासाठी पावसाळ्यात जरी वातावरण थंड असलं तरी कोमट पाण्याने अंघोळ करा. (Social News)
==========
हे देखील वाचा :
Health : भ्रामरी प्राणायाम करण्याचे फायदे
Coconut Water : आरोग्याच्या दृष्टीने अमृतासमान आहे नारळ पाणी
============
* पावसाळ्यात आठवड्यातून एकदा स्क्रबिंग करावे. आपल्या त्वचेला सूट होईल असा पॅक लावणे देखील फायदेशीर ठरू शकते. याशिवाय तुम्ही डॉक्टरांचा देखील सल्ला घेऊन विविध उपाय करू शकता. (Social Updates)