Home » Shivlinga : दरवर्षी वाढणा-या शिवलिंगाचे गुढ !

Shivlinga : दरवर्षी वाढणा-या शिवलिंगाचे गुढ !

by Team Gajawaja
0 comment
Shivlinga
Share

छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात एक चमत्कारी शिवलिंग आहे. देशातील हे सर्वात मोठे शिवलिंग असल्याचा दावा करण्यात येत आहे. गारियाबंद जिल्ह्यापासून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या मारोडा गावातील या भूतेश्वर महादेव मंदिराचे गुढ दिवसेंदिवस वाढत आहे. कारण या शिवलिंगाचा आकार दरवर्षी वाढत असल्याचे लक्षात आले आहे. सध्या हे शिवलिंग २५ फूट लांब आणि २० फूट रुंद आहे. मात्र येथील स्थानिकांच्या मते हे शिवलिंग त्यांनी जेव्हा बघितले, तेव्हा अगदी लहान होते. ३ फुटापर्यंत उंची असलेल्या या शिवलिंगाचे आता भव्य स्वरुप झाले आहे. दरवर्षी या शिवलिंगाचा आकार काही फूट वाढत आहे. त्यामुळेच छत्तीसगडच्या या रहस्यमयी शिवलिंगाला बघण्यासाठी मोठ्या संख्येनं शिवभक्त येत आहेत. भूतेश्वर महादेव मंदिर म्हणून हे मंदिर ओळखले जाते, या मंदिराला भूतेश्वर महादेव मंदिर, असे नाव का मिळाले, यामागेही आख्यायिका सांगितल्या जातात. (Shivlinga)

छत्तीसगड राज्यातील गारियाबंद जिल्हा सध्या त्यातील अद्भूत शिवलिंगामुळे चर्चेत आला आहे. या जिल्ह्यातील मारोडा या गावामध्ये एका रहस्यमयी शिवलिंगाची उंची आणि रुंदी दरवर्षी वाढत आहे. या शिवलिंगाचा आकार दरवर्षी वाढत असल्यामुळे ३ फूटांवरून २५ फूटांपर्यंत हे शिवलिंग वाढल्याचा दावा स्थानिक करत आहेत. दरवर्षी नैसर्गिकरित्या वाढत असलेल्या या शिवलिंगाला बघण्यासाठी शिवभक्तांची या गावात गर्दी होत आहे, सोबतच मोठ्या प्रमाणात अभ्यासकही येथे भेट देत असून या शिवलिंगाबाबत अधिक शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हे भूतेश्वर महादेव शिवलिंग आहे, तो भाग घनदाट जंगलांनी वेढलेला आहे. पावसाळ्यात तर या भागात जाणे शक्य होत नाही. त्यामुळे काही महिन्याच्या अंतरांनी हे शिवलिंग बघितले की थोडे मोठे झाल्याची जाणीव स्थानिकांना व्हायला लागली, तेव्हापासूनच या भूतेश्वर शिवलिंगाची चर्चा सुरु झाली. (Social News)

घनदाट जंगलात असलेले हे शिवलिंग अनेक रहस्यांनी वेढलेले आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार गुरे चरायला नेणा-यांनी या शिवलिंगाचा प्रथम शोध लावला. विशिष्ट खडकावर गायींचे दूध सांडत असल्याचे या गुराख्यांनी बघितले. अनेक दिवस गायी या खडकाभोवती घुटमळत असल्याचे लक्षात आल्यावर मारोडा गावातील ज्येष्ठ नागरिकांनी या खडकाला फोडण्याचा निर्णय घेतला. काळजीपूर्वक या खडकाला फोडले असतांना त्याच्या आता एक भव्य शिवलिंग असल्याचे उघड झाले. घनदाट जंगलात असलेल्या या शिवलिंगाला तेव्हापासून भूतेश्वर महादेव म्हणून ओळखले जाऊ लागले. (Shivlinga)

शिवलिंग सापडल्यापासून या ठिकाणी श्रावण महिन्यातील सोमवारी मोठी यात्रा भरु लागली आहे. तसेच महाशिवरात्री आणि सोमवती अमावस्येला दूरवरुन भाविक या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी येतात. मात्र दरवर्षी येणा-या भाविकांना हे शिवलिंग वाढत असल्याचे लक्षात आले. या मंदिर परिसरात शक्यतो रात्री कोणी रहात नाही. कारण या भागात रात्रीच्या वेळी मंदिराभोवती असलेल्या घंटांचा आवाज येत असल्याचे सांगण्यात येते. शिवाय महादेवाचा, ओम नमः शिवाय हा जपही येथे रात्रीच्या समयी या भागात ऐकू येतो, असा दावा आहे. पूर्णतः नैसर्गिक अशा या भूतेश्वर महादेव मंदिराबाबत अन्यही अनेक आख्यायिका आहेत. या भूतेश्वर महादेवाचे दर्शन घेतल्यानं सर्व पापांचा नाश होतो आणि जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्तता होते, असेही सांगण्यात येते. मारोडा गावातील या भूतेश्वर महादेव मंदिराचे स्थान जिथे आहे, त्या सर्व भागाला नैसर्गिक सौंदर्याची देणगी मिळालेली आहे. घनदाट जंगल या भागात आहे. हे सर्व जंगल, अनेक दुर्मिळ वृक्षराजीनं संपन्न आहे. (Social News)

=========

Sheikh Hasina : बांगलादेशमध्ये पुन्हा सत्तापालट होणार….

=========

तसेच या भागात अनेक वन्यजीवही आहेत. त्यामुळे भूतेश्वर महादेव मंदिरात जे भाविक येतात, ते ही वनसंपदा पाहूनही हरखून जातात. या भूतेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक पायपीटही करतात. विशेषतः श्रावण महिन्यातील सोमवार आणि महाशिवरात्रीला येथे येणारे भाविक पदयात्रा करुन येतात. निसर्गात रहाणा-या महादेवाचे दर्शन घेण्यासाठी कुठल्याही वाहनाचा वापर केला, तर या जंगालातील वन्यजीवांना त्याचा त्रास होईल, अशीही भावना त्यामागे भाविकांची आहे. त्यामुळेच महाशिवरात्रीला या भूतेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक पदयात्रा काढतात. यावेळी शिवभक्त, भगवान शंकराच्या नावाचा जयजयकार करतात, छत्तीसगड भाषेत, गर्जनेच्या आवाजाला भाकुर्रा म्हणतात, म्हणून छत्तीसगडमध्ये भाकुर्रा भगवान म्हणूनही भूतेश्वर महादेव मंदिर ओळखले जाते. (Shivlinga)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.