उत्तराखंड मधील जोशीमठची स्थिती सध्या भयंकर होती चालली आहे. जमीन आणि घरांना पडलेल्या भेगांमुळे आता दिवसागणिक वाढली जात आहेत. त्यांना पाहून लोक असे म्हणत आहे की, जोशीमठ उद्धस्त होत आहे. रिपोर्ट्स असे सांगतात की, बदलत्या ऋतूमुळे जगभरातील काही शहर २०५० आणि २१०० पर्यंत पूर्णपणे बुडणार आहेत. मात्र तुम्हाला माहिती आहे की, जगताली अशी काही शहरं आहेत जी पुढील ८-९ वर्षात समुद्राच्या पातळीत वाढ झाल्याने पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. (Sinking Cities in World)
क्लाइमेट सेंट्रल नावाच्या प्रोजेक्टच्या एका रिपोर्टमध्ये असे म्हटले गेले आहे की, क्लाइमेट चेंजमुळे जगभरातील ९ शहर ही काही वर्षामध्ये बुडणार आहेत. तर जाणून घेऊयात कोणत्या शहरांचा यामध्ये समावेश आहे.
बसरा, इराक
इराक मधील बसरा सहर शत अल-अरब नावाच्या मोठ्या नदी किनाऱ्यावर वसलेले आहे. ती नदी पारस खाडीला जाऊन भेटते. बसरा शहराजवळ काही दलदलीचा परिसर आहे. अशातच समुद्राची पातळी वाढल्यास या शहराला धोका उद्भवू शकतो.
एम्स्टर्डम, द नेदरलँन्ड्स
द नेदरलँन्ड्सची राजधानी एम्स्टर्डम, हॉग आणि रॉटरडम सारखी शहर नॉर्ख सी च्या जवळ आणि कमी उंचीवर आहेत. मात्र ज्या हिशोबाने समुद्राची पातळी वाढत आहे, ते पाहून असे वाटत नाही ही देशातील ही शहरं बचावतील.
वेनिस, इटली
इटली मधील वेनिस शहर पाण्यामध्येच वसलेले आहे. येथे प्रत्येक वर्षाला हाय टाइडमुळे पुर येतो. वेनिस शहराला दोन प्रकारचा धोका आहे. प्रथम तर समुद्राच्या पातळीत वाढ आणि दुसरा म्हणजे वेनिस शहर स्वत: स्वत: मध्ये बुडणार आहे. प्रत्येक वर्षी २ मिलिमीटर खाली जात आहे. जर समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वेगाने वाढ झाल्यास तर २०३० पर्यंत हे शहर पाण्यात बुडणार आहे. (Sinking Cities in World)
न्यू ओरलींस, अमेरिका
अमेरिकेतील न्यू ओरलींस शहराच्या मध्ये खुप कालवे आणि पाण्याच्या शाखांनी जाळे बनले आहे. ही जाळी या शहराला पुरपासून बचाव करते. या शहरातील उत्तरात लेक मॉरेपास आणि दक्षिणेला लेक सल्वाडोर व एक लहान झरा आहे. शहरानंतर द बिलोक्सी आणि जीन लॅफिटे वाइल्डलाइफ प्रिजर्व जवळजवळ पाण्याच्या स्तराऐवढे आहे. अशातच जर पाण्याच्या पातळीत थोडी तरी वाढ झाली तर ते बुडणार आहे.
कोलकाता, भारत
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता आणि त्याच्या आसपासाची जमीन शतकानुशतके सुपीक असल्याचे मानले जाते. मात्र क्लाइमेट सेंट्रलच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास तर समुद्राच्या पातळीत वाढ झाल्यास या शहराला धोका उद्भवतून ते नष्ट होऊ शकते. कोलकाता मध्ये तुफान पाऊस आणि हाय टाइडच्या समस्येला सामोरे जावे लागते. पावसाळ्यादरम्यान, येथे पुर येतो. येथे पावसाचे पाणी जमिनीखाली जात नाही.
हो ची मिन्ह सिटी, विएतनाम
हे शहर यू थियेम नावाच्या दलदली जमिनीवर वसले आहे. तर समुद्र तळापासून त्याची उंची अधिक नाही. मेकॉन्ग डेल्टाच्या पाण्याची पातळी वाढत आहे. तज्ञांनी अशी शंका आहे की, वर्ष २०३० पर्यंत हो ची मिन्ह शहर पाण्याखाली जाणार आहे.
बँकॉक, थायलंड
पर्यटनासाठी प्रसिद्ध थायलंडची राजधानी बँकॉक शहर ग्लोबल वॉर्मिंगमुळे अधिक प्रभावित आहे. बँकॉक शहर समुद्र सपाटीपासून केवळ १.५ मीटर उंचीवर आहे. बँकॉक शहरातील रेतीली मातीवर वसलेले आहे. प्रत्येक वर्षी २ ते ३ सेंटीमीटर खाली जात आहे. अनुमानानुसार, वर्ष २०३० पर्यंत समुद्र किनाऱ्यावरील था खाम, समुत प्रकान आणि सुवर्णभूमि स्थित शहरातील इंटरनॅशनल एअरपोर्ट पूर्णपणे पाण्याखाली बुडू शकते.
हे देखील वाचा- अमेरिकेच्या एका घटक राज्याची निसर्गानं उडवली दाणादाण!
जॉर्जटाउन, गुएना
गुएनाची राजधानी जॉर्जटाउनच्या एका बाजूला जवळजवळ ४०० किमी लांब समुद्राचा परिसर आहे. येथे वेगाने वारे वाहतात जे शहरात येऊन धडकतात. जलस्तरापासून त्यांची उंची केवळ ०.५ मीटर ते एक मीटर पर्यंत आहे. अशातच पाण्याचा स्तर वाढल्यास शहर पाण्यात डुबू शकते.
सवाना, अमेरिका
अमेरिकेतील जॉर्जिया मधील सवाना शहर चहूबाहूंनी समुद्राने घेरलेले आहे. याच कारणास्तव खुप दलदलीचा परिसर आहे. हे शहर पूर्णपणे बुडण्याची २०५० पर्यंतचा वेळ लागू शकतो. मात्र २०३० पर्यंत अशी उद्भवण्यास सुरु होऊ शकते.