Home » Rahul Deshpande :प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडेंचा घटस्फोट

Rahul Deshpande :प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडेंचा घटस्फोट

by Jyotsna Kulkarni
0 comment
Rahul Deshpande
Share

हिंदी मनोरंजनविश्वात पाहिले तर घटस्फोट हा शब्द नवीन नाही. या क्षेत्रात वावरणाऱ्या अनेक कलाकारांच्या घटस्फोटाच्या बातम्या आपण आजवर ऐकल्या आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रात घटस्फोटाच्या बातम्या ताशा कमी ऐकायला मिळतात. त्यामुळे मराठी प्रेक्षकांसाठी अशी एखादी बातमी खूपच मोठी आणि चटका लावून जाणारी असते. अशातच नुकतीच एक घटस्फोटाची बातमी समोर आली आहे, जी ऐकून अनेकांना मोठा धक्का बसला आहे. (Rahul Deshpande)

मनोरंजनविश्वातील अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक असलेल्या राहुल देशपांडेने घटस्फोट घेतला असल्याचे जाहीर केले आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने ही गोष्ट सांगितली आहे. ही बातमी ऐकल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे. गायक राहुल देशपांडे आणि नेहा देशपांडे यांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा घेतला आहे. राहुल आणि नेहा यांनी हा निर्णय लग्नाच्या १७ वर्षांनंतर घेतला आहे. (Marathi News)

राहुल देशपांडेने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “प्रिय मित्रांनो, तुम्ही प्रत्येकजण माझ्या प्रवासाचा तुमच्या परीने अर्थपूर्ण भाग राहिला आहात आणि म्हणूनच मी तुमच्यासोबत माझ्या आयुष्यातली एक वैयक्तिक आणि महत्त्वाची अपडेट शेअर करू इच्छितो. मी तुमच्यापैकी काहींना ही गोष्ट आधीच सांगितली आहे. १७ वर्षांच्या लग्नानंतर आणि भरपूर आठवणींनंतर, नेहा आणि मी परस्पर वेगळे झालो आहोत आणि स्वतंत्रपणे आमचे जीवन सुरू केले आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये आम्ही कायदेशीर पद्धतीने मैत्रीपूर्ण वेगळे झालो आहोत. (Latest Marathi Headline)

Rahul Deshpande

मी बदलाची ही प्रक्रिया खासगीपणे पूर्ण करण्यासाठी, तसंच सर्वकाही विचारपूर्वक व्यवस्थापित केले आहे याची खात्री करण्यासाठी, विशेषतः आमची मुलगी रेणुका हिच्या हितासाठी ही माहिती देण्यापूर्वी आम्ही वेळ घेतला. माझी मुलगी माझी सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि मी नेहासोबत तिचे अतूट प्रेम, पाठिंबा आणि स्थिरतेसह सह-पालकत्व करण्यास वचनबद्ध आहे. (Top Marathi Headline)

आमच्या दोघांच्या आयुष्यातील हा नवा अध्याय असला तरी, पालक म्हणून आमचे नाते आणि आमचा एकमेकांबद्दल असलेला आदर अजूनही मजबूत आहे. या काळात आमच्या गोपनीयतेबद्दल आणि निर्णयाबद्दल तुम्ही समजून घेतल्याबद्दल आणि आदर केल्याबद्दल मी खरोखर आभारी आहे.” दरम्यान राहुल देशपांडेची ही पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याच्या फॅन्सला या घटस्फोटामुळे दुःख झाल्याचे देखील काहींनी कमेंट्स करत म्हटले आहे. (Top Trending News)

राहुल देशपांडेबद्दल सांगायचे झाले तर राहुल भारतीय राष्ट्रीय संगीत क्षेत्रातील मोठे आणि नावाजलेले नाव आहे. राहुलला ‘मी वसंतराव’ या चित्रपटातील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक मोठे पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत. राहुल महान गायक पंडित वसंतराव देशपांडे यांचे नातू आहे. राहुल शास्त्रीय संगीत, ठुमरी, गजल आणि भजनसाठी ओळखले जातात. शिवाय त्याने ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ आणि ‘संगीत सम्राट 2’ यांसारख्या टीव्ही शोजमध्ये परीक्षक म्हणून देखील काम केले आहे. (Latest Marathi News)

=========

Ashtavinayak : अष्टविनायकातील सहावा गणपती – लेण्याद्रीचा गिरिजात्मक

Ashtavinayak : अष्टविनायकातील सातवा गणपती – महडचा वरदविनायक

=========

राहुल यांनी आजोबांच्या ‘कट्यार काळजात घुसली’ या प्रसिद्ध नाटकाला पुन्हा रंगभूमीवर आणण्यात मोठे योगदान दिले आहे. त्यांनी ‘खान साहब आफताब हुसैन बरेलीवाले’मध्ये सचिन पिळगांवकर यांच्यासाठी एक गाणंसुद्धा गायले होते. २०११-१२ मध्ये राहुल यांनी काकासाहेब खादिलकर यांच्या ‘संगीत मनाना’ या नाटकाला नव्या अंदाजात सादर केले. हे नाटक पाच भागात होते आणि त्यात ५२ गाणी होती. राहुल यांनी त्याला छोटं करून दोन भाग आणि २२ गाण्यांसह सादर केले. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.