Home » एकसारख्या नावामुळे गायक अरमान मलिकला मनस्ताप

एकसारख्या नावामुळे गायक अरमान मलिकला मनस्ताप

by Jyotsna Kulkarni
0 comment
Singer Armaan Malik gets frustrated
Share

असं म्हणतात की, या जगात एक सारख्या दिसणाऱ्या सात व्यक्ती आहेत. आता हे प्रत्यक्ष कोणीच पाहिलेले नाही. मात्र यावर अनेकांचा विश्वास आहे. आपण पाहिले तर दोन जुळ्या व्यक्तींमध्येच आपण किती गोंधळतो, तर सात अशा व्यक्ती समोर आल्या तर कसे कोणाला ओळखायचे? एकसारख्या दिसणाऱ्या व्यक्ती जेव्हा समोर येतील तेव्हा येतील, मात्र आता आपल्या मनोरंजनविश्वात एकसारख्या नावावरून एकच गोंधळ सुरु झाला आहे.

सध्या ओटीटीवर सुरु असणारा बिग बॉस हा शो खूपच गाजत आहे. या शोमध्ये रोज होणारी भांडणं, वाद यांमुळे शोची लोकप्रियता दिवसेंगणिक वाढतच आहे. या शोमध्ये सहभागी असणाऱ्या स्पर्धांमध्ये प्रसिद्ध यूटुबर अरमान मालिकांचा देखील सहभाग आहे. या शोमध्ये तो सामील झाल्यानंतर त्याला दोन लग्नांवरून मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे. सोबतच विशाल पांडेला त्याने चापट मारल्याने देखील तो नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. मात्र अरमान मलिकला ट्रोल करणाऱ्या नेटकाऱ्यानी गायक अरमान मलिकला ट्रोल केले आहे. (Singer Armaan Malik gets frustrated)

Singer Armaan Malik Get's frustrated

झाले असे की, गायक अरमान मलिक आणि यूटुबर अरमान मलिक यांचे नाव सारखेच असल्याने नेटकरी गोंधळे आहेत. यूटुबर अरमान मलिकबद्दल कमेंट करताना ते गायक अरमान मलिकला टॅग करत आहे. या कमेंट्समध्ये अनेक अपशब्द असून, याचा आता गायक असणाऱ्या अरमान मलिकला त्रास होऊ लागला आहे. या ट्रोलिंगमुळे त्याची बदनामी होत असून, त्याचा अरमानसोबतच त्याच्या जवळच्या लोकांना देखील मनस्ताप होताना दिसत आहे.

अरमानने आता त्याचा त्रास सोशल मीडियावर पोस्ट करत सगळ्यांना सांगितला आहे. त्याच्या पोस्टवरून तो किती वैतागला आहे हे स्पष्ट दिसत आहे. अरमानने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “मी आत्तापर्यंत शांत होतो; मात्र आता परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर जात आहे. एक युट्यूबर आहे, ज्याचे पहिले नाव संदीप होते मात्र नंतर त्याने त्याचे नाव बदलत अरमान मलिक असे केले. हा अरमान मलिक सध्या ‘बिग बॉस ओटीटी सीझन ३’ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. आमचे नाव एक सारखेच असल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे”. (Singer Armaan Malik gets frustrated)

पुढे अरमान मलिकने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “लोकं आम्हा दोघांना एकच व्यक्ती समजत आहे. त्यामुळे त्याला टॅग करण्याऐवजी ते मला टॅग करत आहेत. मला एक गोष्ट स्पष्टपणे सांगायची आहे की, माझा या व्यक्तीसोबत किंवा त्याच्या आयुष्याशी कोणताही संबंध नाही. एकाच नावामुळे निर्माण झालेल्या या गोंधळामुळे मी आत्तापर्यंत जे काही नाव कमावले आहे, त्या नावाला आणि माझ्या नावलौकिकाला यामुळे धोका निर्माण झाला आहे. ज्या लोकांनी मला नेहमीच पाठिंबा दिला, त्यांच्यासाठी हे सर्व गोंधळात टाकणारे आहे”.

पुढे अरमानने लिहिले, “मी कोणालाही स्वतःचे नाव बदलण्यापासून किंवा माझे नाव स्वत: ला ठेवण्यापासून थांबवू शकत नाही. मात्र माझी मला पाठिंबा देणाऱ्या माझ्या लोकांना एवढी एकच विनंती आहे की, सदर व्यक्तीच्या संबंधित कोणत्याही पोस्ट मला टॅग करू नका. तुम्ही मला समजून घेतल्याबद्दल आणि मला दिलेल्या पाठिंब्याबद्दल मनापासून धन्यवाद”. (Singer Armaan Malik gets frustrated)

======

हे देखील वाचा : ॲव्होकॅडो खाण्याचे ‘हे’ आहेत चमत्कारिक फायदे

======

दरम्यान गायक अरमान मलिक हा बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि प्रसिद्ध गायक आहे. तर यूटुबर अरमान मलिक हा यूट्यूबस्टार असून, त्याला लाखो फॉलोवर्स आहेत. तो नेहमीच त्याच्या व्हिडिओमुळे कमालीचा चर्चेत असतो. पायल आणि कृतिका या दोन पत्नींमुळे नेहमीच त्याची चर्चा होते. सध्या दोन पत्नी असल्यामुळे तो चांगलाच ट्रोल होताना दिसत आहे.

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.