आता हळूहळू थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. थंडी किंवा हिवाळा हा अनेकांचा आवडता ऋतू आहे. या ऋतूमध्ये उत्तम जेवण आणि व्यायाम आपल्याला अधिक स्ट्रॉंग बनवते. हिवाळा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने जितका चांगला आणि आल्हादायक आहे तितकाच तो त्रासदायक देखील आहे. हिवाळा सुरु झाला की, सर्वाधिक त्रासदायक ठरणारी गोष्ट म्हणजे कोरडी त्वचा. हिवाळ्यामध्ये जवळपास सगळ्यांनाच त्वचा कोरडी होण्याचा त्रास होतो. आपल्या केसांमधील त्वचा देखील या दिवसांमध्ये कमालीची कोरडी होते. त्यामुळे या ऋतूमध्ये केसांमध्ये कोंडा होण्याचे प्रमाण जास्तच वाढते. कोंडा झाला की, डोक्याला सतत खाज येणे, कोंडा खाली पडणे, केस निस्तेज होणे, केस गळती असे त्रास होतात. (Hair Care)
केसांमधील कोंडा घालवणे वाटते तितके सोपे अजिबातच नाहीये. कोंडा सहजासहजी जात नसल्याने त्यासाठी अनेक महागड्या ब्युटी ट्रीटमेंट्सचा वापरही केला जातो, पण तरीही केसांवर त्याचा उपाय निरर्थक ठरू शकतो. कोंडा घालवण्यासाठी बाजारात अनेक प्रकारची उत्पादने आहेत, ती वापरल्यानंतरही कोंडा जाईल याची काही खात्री नसते. शिवाय केसांमध्ये कोंडा जास्त असेल तर त्यामुळे टाळूमध्ये इन्फेक्शन किंवा जखमेची समस्याही उद्भवते. अशा तऱ्हेने कोंड्याच्या सुरवातीलाच त्यापासून सुटका झाली तर तुमच्या केसांचे आरोग्य टिकून राहते. यासाठीच आज आम्ही तुम्हाला कोंडा घरच्याघरी अगदी सोप्या आणि सहज पद्धतीने काढून टाकण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत. (Marathi)
दही
केसांची योग्य निगा राखण्यासाठी दह्याचा वापर फायदेशीर ठरेल. दही हे नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करतं. दह़्याचा हेअर मास्क लावून कोंडा सहज घालवू शकता. यासाठी केसांना शॅम्पू केल्यानंतर दही लावा आणि 10-15 मिनिटांनी केस स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे तुमच्या केसांना चमक येईल. (Top Marathi \stories)
लिंबू
तुम्हाला डोक्यामध्ये जास्तच कोंड्याची समस्या जाणवत असेल तर तुम्ही जेव्हा आंघोळीला जाणार असाल त्याच्याआधी साधारण ४-५ तास लिंबामध्ये थोडी साखर मिक्स करा आणि हे मिश्रण तुम्ही केसांना लावा आणि आंघोळ करताना हे धुवा. एक आठवड्याच्या आत तुम्हाला कोंड्यापासून सुटका मिळाल्याचे दिसून येईल. लिंबातील विटामिन सी हे केसांना उत्तम पोषण देते आणि कोंडा घालविण्यास मदत करते. (Marathi News)
तुळस आणि आवळा
केसांमधील कोंडा घालवण्यासाठी तुळस आणि आवळ्याची पेस्ट बनवून आपण केसांना मसाज करू शकता. मसाजनंतर अर्ध्या तासानंतर केस धुवा. यामुळे डोक्यातील कोंड्याची समस्या सुटेल. (Top Marathi News)
ॲपल साइडर
समप्रमाणात पाणी आणि ॲपल साइडर व्हिनेगर मिक्स करा. सर्वप्रथम शॅम्पूने केस स्वच्छ धुवावेत. नंतर हे मिश्रण केसांमध्ये घालून काही मिनिटे सोडा. यानंतर केस धुवून स्वच्छ करावेत. हे आपल्या टाळूची पीएच पातळी राखेल. (Latest Marathi Headline)
कांद्याचा रस
कांद्याचा रस केसांच्या या समस्येवर मात करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो. मिक्सरमध्ये कांदा बारीक करून घ्या. चाळणीत चांगला गाळून एका भांड्यात ठेवा. कापसाच्या मदतीने हा रस धुतलेल्या आणि वाळलेल्या केसांच्या मुळांवर लावा आणि २० मिनिटं कोरडं होऊ द्या. यामुळे तुमचे केस निरोगी आणि मजबूत होतील. (Todays Marathi Headline)
संत्र्याची साल
संत्र्याची साल वापरून तुम्ही कोंडा दूर करू शकतात. संत्र्याची साल बारीक करून त्यात लिंबाचा रस मिसळा आणि ही पेस्ट केसांना व्यवस्थित लावा याचे चांगले परिणाम मिळवण्यासाठी तुम्हाला ही पेस्ट तुमच्या डोक्यांवर अर्धा तास ठेवावी लागेल आणि नंतर तुमचे केस स्वच्छ धुऊन टाका. (Top Stories)
टी ट्री ऑइल
हिवाळ्यात केसांमधील कोंडा घालवण्यासाठी टी ट्री ऑइलचाही उपयोग फायदेशीर ठरू शकतो. यासाठी टी ट्री ऑइलमध्ये खोबरेल तेल मिसळून केसांना लावा आणि तासाभराने केसांना शॅम्पू करा. यामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल घटक केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी तसेच टाळूच्या त्वचेला संसर्गमुक्त ठेवण्यास मदत करतात. (Top Trending Headline)
नारळाचे तेल आणि कपूर
केसांमध्ये कोंड्याची समस्या असेल तर साधारण १०० ग्रॅम नारळाच्या तेलात ४ ग्रॅम कापूर मिक्स करा आणि एका बाटलीत भरून ठेवा. दिवसातून २ वेळा तुम्ही या तेलाने केसांना मालिश करा. केस धुतल्यानंतर ते सुकवा आणि तेल लाऊन मालिश करा आणि रात्री झोपण्यापूर्वी पुन्हा एकदा हे तेल लावा आणि मालिश करा. दिवसातून २ वेळा मालिश करा. काही दिवसांमध्येच तुम्हाला कोंडा निघून गेल्याचे जाणवेल. (Top Marathi Headline)
मेथी दाणे
केसांमधील कोंडा घालण्यासाठी मेथी दाणे प्रभावी आहेत. यासाठी रात्रभर २ चमचे मेथीचे दाणे पाण्यात भिजवा. त्यांना सकाळी बारीक करून पेस्ट बनवा. ते केसांत लावा आणि ३० मिनिटे ठेवा. नंतर केस धुवा. केसांतला कोंडा घालवण्यासाठी हा घरगुती उपाय खूप प्रभावी आहे. (Latest Marathi News)
========
Health : ‘हे’ सोपे उपाय करून ॲसिडिटीचा त्रास करा कमी
Dussehra : दसऱ्याला सोनं म्हणून वाटल्या जाणाऱ्या आपट्याच्या पानांचे आहेत अनेक आरोग्यवर्धक लाभ
========
कोरफड जेल
फ्रेश कोरफड जेल काढून ते थेट आपल्या टाळूवर लावा. नंतर सुमारे 30 मिनिटे ठेवा. यानंतर आपल्या रेग्युलर शॅम्पूने धुवून केस स्वच्छ करा. कोरफडमध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात जे टाळूचा कोरडेपणा आणि कोंडा दूर करण्यास मदत करतात. (Top Trending News)
तांदळाचे पाणी
तांदळाचे पाणी केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी चांगले ठरू शकते. एक कप तांदळात ४ कप पाणी टाका आणि उकळा. १० मिनिटांनी गॅस बंद करून तांदूळ गाळून घ्या. हे पाणी थंड झाल्यावर केसांच्या मुळांना लावा. ३ तास केसांना लावून ठेवा. तुम्ही शॅम्पू केल्यानंतरही वापरू शकता. तीन तासांनंतर साध्या पाण्याने केस चांगले धुवा, आठवड्यातून किमान ३ वेळा ही पद्धत वापरून पहा. (Social News)
(टीप : कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics