Home » 1 डिसेंबर पासून सिम कार्ड खरेदी-विक्रीचे नवे नियम लागू होणार

1 डिसेंबर पासून सिम कार्ड खरेदी-विक्रीचे नवे नियम लागू होणार

देशात लवकरच सिम कार्ड संबंधित नवे नियम लागू होणार आहेत. केंद्र सरकारने सिम कार्ड खरेदी आणि विक्रीच्या नियमांत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

by Team Gajawaja
0 comment
SIM Card Rules
Share

देशात लवकरच सिम कार्ड संबंधित नवे नियम लागू होणार आहेत. केंद्र सरकारने सिम कार्ड खरेदी आणि विक्रीच्या नियमांत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नियम यंदाच्या वर्षी 1 डिसेंबर 2023 पासून लागू केले जाणार आहेत. नव्या नियमांअंतर्गत एका आयडीवर मर्यादित प्रमाणातच सिम कार्ड खरेदी करता येणार आहेत. सरकारच्या या निर्णयानंतर नवे सिम कार्ड खरेदी करुन फसवणूक करणाऱ्यांवर चाप बसणार आहे.(SIM Card Rules)

दूरसंचार विभागाने सिमच्या नियमांत बदल करत माहिती दिली आहे. खरंतर हे बदल 2 ऑक्टोंबर 2023 रोजी होणार होते. पण काही कारणास्तव असे झाले नाही. त्यामुळे सरकारने 2 डिसेंबर पासून हे नवे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. टेलिकॉम कंपन्यांनी नवे नियम लागू करण्यासाठी काही कालावधी मागितला आहे.

काय असणार आहेत नवे नियम
सिम कार्ड संबंधित नवे नियम लागू झाल्यानंतर एका आयडीवर मर्यादित प्रमाणात सिम कार्ड खरेदी करता येणार आहेत. त्याचसोबत सिम कार्ड विक्रेत्याला रजिस्टर करण्यापूर्वी आणि सिस्टिममध्ये सहभागी होण्यासाठी केवायसी प्रक्रियेतून जाणे अनिवार्य असणार आहे. जर ३० नोव्हेंबर नंतर एखादी टेलिकॉम कंपनी एखाद्या विक्रेत्याला रजिस्ट्रेशनशिवाय सिम विक्री करण्याची परवानगी देत असेल तर कंपनीवर १० लाखांचा दंड लावला जाऊ शकतो.

SIM Card

SIM Card

सरकारने साइब्र क्राइम आणि स्कॅम रोखण्यासाठी सिम संदर्भातील नियमांत बदल जारी केले आहेत. ऐवढेच नव्हे तर फ्रॉड कॉल रोखण्यासाठी 50 लाखांपेक्षा अधिक कनेक्शन ब्लॉक करण्यात आले आहेत. नवे नियम लागू झाल्यानंतर मर्यादित संख्येपेक्षा अधिक सिम खरेदी करणाऱ्यांवर कार्यवाही केली जाणार आहे. देशात सध्या 10 लाखांपेक्षा अधिक सिम कार्ड विक्रेते आहेत. ज्यांना नोव्हेंबर महिन्याच्या अखेर पर्यंत रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे.(SIM Card Rules)

सिम कार्ड खरेदी करण्याचे नवे नियम लागू होण्याआधी व्हिआयपी सिम कार्डची विक्री एका कंपनीने सुरु केली आहे. खरंतर वोडाफोन-आयडिया आपल्या ग्राहकांना फ्री मध्ये व्हिआयपी क्रमांक ऑफर करत आहे. यासाठी कोणताही शुल्क आकारला जात नाहीय. केवळ ऐवढेच नव्हे तर होम डिलिव्हरी ही केली जातेय. केवळ यासाठी तुम्हाला एक प्रोसेस मात्र फॉलो करावी लागणार आहे. याची अधिक माहिती तुम्हाला जवळच्या वोडाफोन आयडियाच्या गॅलरीत अथवा कस्टमर केअरवरून मिळू शकते.


हेही वाचा- बचत योजनेत गुंतवणूक करण्याच्या नियमांत बदल


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.