जर तुम्हाला नवं सिम कार्ड घ्यायचे असेल तर सर्वात प्रथम ही माहिती वाचा. कारण सरकारने सिम कार्ड संबंधित नियमात बदल केले आहेत. या अंतर्गत काही ग्राहकांना सिम कार्ड घेणे अगदी सोप्पे झाले आहे. मात्र काही ग्राहकांना सिम कार्ड घेणे मुश्किल ही होऊ शकते. खरंतर आता सिम कार्ड घेण्यासाठी ग्राहकांना ऑनलाईन अर्ज करता येऊ शकतो आणि सिम कार्ड त्यांना घरपोच ही मिळू शकते. (SIM Card Rules)
सिम कार्ड संबंधित नियमात बदल
सरकारने सिमच्या नियमात बदल केला आहे. आता कंपनी १८ वर्षाखाली कमी वयोगटातील मुलांना सिम कार्ड विक्री करणार नाहीत. १८ वर्षावरील व्यक्तींसाठी आधार कार्ड किंवा डिजीलॉकरच्या माध्यमातून आपले ओळखपत्र दाखवत सिम कार्डचे वेरिफिकेशन करु शकतात.

१ रुपयात केली जाईल केवायसी
नव्या नियमांनुसार युजर्सला नव्या मोबाईलच्या कनेक्शनसाठी युआयडीएआयच्या आधार कार्डच्या आधाराने ई-केवायसी सर्विसच्या माध्यमातून फक्त १ रुपयांत पेमेंट करावे लागणार आहे.
कोणत्या युजर्सला मिळणार नाही नवे सिम?
-दूरसंचारच्या नव्या नियमानुसार आता कंपनीने १८ वर्षाखालील कमी वयोगटातील युजर्ससाठी सिम कार्ड दिले जाणार नाही.
-या व्यतिरिक्त एखादा व्यक्ती मानसिक रुपात आजारी असेल तर व्यक्तीला नवे सिम कार्ड दिले जाणार नाही-
-मात्र व्यक्तीने नियमांचे उल्लंघन केल्यास तर सिम कार्ड विक्री करणाऱ्या टेलिकॉम कंपनीला दोषी मानले जाईल.
हे देखील वाचा- सिम कार्डच्या किनाऱ्याला कट असण्यामागील ‘हे’ आहे कारण
-घरबसल्या मिळवा सिम कार्ड
आता युआयडीएआय आधारित वेरिफिकेशनच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या घरीच सिम कार्ड मिळणार आहे. डीओटीच्या मते ग्राहकांना मोबाईल कनेक्शन अॅप किंवा पोर्टलच्या आधारित प्रक्रियेच्या माध्यमातून दिले जाईल. यासाठी फक्त ग्राहकांना मोबाईल कनेक्शनसाठी घरबसल्याच अर्ज करायचा आहे. (SIM Card Rules)
खरंतर ग्राहकांना यापूर्वी मोबाईल कनेक्शनसाठी मोबाईल कनेक्शनला प्रीपेड मधून पोस्टपेड मध्ये बदलण्यासाठी केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी लागत होती. त्याचसोबत सिम कार्ड कोणाच्या नावावर हे सुद्धा तुम्ही शोधून काढू शकतात. खरंतर तुम्ही TrueCaller अॅपच्या माध्यमातून तुम्ही ते तपासून पाहू शकता. येथे तुम्हाला गुगल अकाउंटचे लॉगिन करुन ज्याच्या क्रमांकाची माहिती हवी आहे तो सुद्धा तेथे टाका. अशा प्रकारे तुम्ही मोबाईल अॅपच्या माध्यमातून सिम कार्ड कोणाच्या नावावर आहे हे तुम्हाला कळू शकते.