ग्राहकांना शुद्ध आणि योग्य दागिने मिळावेत म्हणून सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क १ जून २०२२ पासून अनिवार्य केले आहे. या तारखेनंतर कोणत्याही ज्वेलरला हॉलमार्क शिवाय सोन्याचे दागिने विक्री करता येणार नाहीत. मात्र चांदीसाठी हा नियम अनिवार्य नाही. अशातच चांदीच्या दागिन्यांसह नाण्यांवरील हॉलमार्क संबंधित नक्की काय नियम आहे याबद्दलच आपण अधिक जाणून घेऊयात. (Silver Jewellery-Coins)
ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड म्हणजेच बीआयएसच्या मते ज्वेलरला हे अनिवार्य केले नाही की, त्याने हॉलमार्किंग असलेले चांदीच्या दागिन्यांची विक्री करावी. जर त्याला हॉलमार्क असलेले चांदीचे दागिने विक्री करायचे असतील तर तसे तो करु शकतो. मात्र सरकारकडून हा नियम अनिवार्य करण्यात आलेला नाही, जसे सोन्यासाठी आहे.
एखादा ज्वेलर आपल्या स्तरावर चांदीच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग करुन विक्री करु शकतो. यामध्ये दागिन्याची शुद्धता आणखी वाढेल आणि ग्राहकांमध्ये त्या ज्वेलर बद्दल विश्वास ही निर्माण होईल. ग्राहकाला वाटले तर तो ज्वेलरला त्यावर हॉलमार्किंग करुन देण्यास सांगू शकतो. त्यासाठी ज्वेलर तुमच्याकडून हॉलमार्किंगचा काही शुल्क वसूल करेल. ज्वेलरीसाठी ग्राहकाला प्रथम ऑर्डर देता येईल आणि नंतर ज्वेलर ते एसेइंग सेंटरमध्ये हॉलमार्किंगसाठी पाठवेल. त्यानंतर हॉलमार्किंगचा चार्ज जोडून तुम्हाला तो दागिना दिला जाईल.
जसे सोन्यावर हॉलमार्क केला जातो त्याच प्रमाणे चांदीच्या दागिन्यावर ही हॉलमार्किंगची निशाणी असेल. ज्वेलरीवर बीआयएस मार्कसह सिल्वर असे लिहिलेले असेल. शुद्धतेची ग्रेड किंवा सिल्वरचा फाइननेस सुद्धा लिहिलेले असेल. ज्या सेंटरमध्ये हॉलमार्किंग केले जाईल त्या सेंटरचे आइडेंटिफिकेशन मार्क लावण्यात आलेला असेल. त्याचसोबत चांदीच्या दागिन्यावर ज्वेलरचा मार्क किंवा मॅन्युफॅक्चरर आयडेंटिफिकेशन मार्क सुद्धा असावा. (Silver Jewellery-Coins)
हे देखील वाचा- दुबईत भारतापेक्षा स्वस्त का असते सोनं? जाणून घ्या अधिक
चांदीच्या दागिन्यावर हॉलमार्किंग असेल तर ग्राहकाला कळेल की, कोणत्या ग्रेडचा दागिना आपण खरेदी केला आहे. ज्वेलर नेहमीच चांदीत लेड कंटेट मिसळतात. ज्यामुळे चांदीचे दागिने किंवा भांडी तयार करणे सोप्पे होते. काही लोक चांदीच्या भांड्याचा वापर खाण्यापिण्यासाठी करतात. अशातच त्यात लेड कंटेट अधिक असेल तर तुमच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.जर हॉलमार्किंग असेल तर तुम्हाला कळेल की चांदीच्या दागिन्यावर किंवा भांड्यामध्ये किती प्रमाणात लेड आहे की नाही. तर अशाप्रकारे तुम्ही चांदीची नाणी किंवा दागिने घेताना काळजी घेऊ शकता.