Silver Jewellery Cleaning Hacks : भारतीय संस्कृतीमध्ये ज्लेवरीप्रति महिलांपुरुषांचे खास आकर्षण असते. पण ज्वेलरीची योग्य पद्धतीने काळजी घेणे फार महत्वाचे आहे. खासकरुन चांदीची ज्वेलरी कालांतराने काळी पडते. यामुळे जुनी दिसते. अशातच चांदीची ज्वेलरी स्वच्छ करण्यासाठी सोनाराकडे जावे लागते.खरंतर, चांदीची ज्वेलरी व्यवस्थितीत ठेवल्यास ती काळवंडली जात नाही. याशिवाय ज्वेलरी काळी पडण्यामागे काही कारणे असू शकतात. जसे की, हवेमध्ये असणारे सल्फर किंवा ऑक्सिजनसोबत रिअॅक्शन झाल्यास चांदीची ज्वेलरी काळवंडली जाते. याला ऑक्सीडेशन प्रोसेस असे म्हटले जाते. उन्हाळ्याच्या दिवसात चांदीची ज्वेलरी लवकर काळवंडली जाते. अशातच घरच्याघरी चांदीची ज्वेलरी स्वच्छ कशी करायची हे जाणून घेऊया.
लिंबाचा वापर
चांदीची ज्वेलरी स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा वापर करू शकता. लिंबाचा रसामध्ये मीठ मिक्स करुन पेस्ट तयार करा. ही पेस्ट ज्वेलरीवर लावून 20 मिनिटे ठेवा. यानंतर पुन्हा थोडा लिंबाचा रस ज्वेलरीला लावून ब्रशने स्वच्छ करा. धुतल्यानंतर स्वच्छ कापडाने पुसून घ्या.

Silver Jewellery-Coins
बेकिंग सोडा
बेकिंग सोड्याचा वापर करुनही चांदीची ज्वेलरी स्वच्छ करू शकता. यासाठी बेकिंग सोडा एका कपमध्ये घेऊन त्यामध्ये पाणी मिक्स करुन पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये ज्वेलरी बुडवून ठेवा. यामुळे ज्वेलरीवरील जमा झालेली घाण दूर होईल. याशिवाय ज्वेलरी स्वच्छ करण्यासाठी ब्रशचा वापर करा.
=======================================================================================================
हेही वाचा :
Akshaya Trutiya : अक्षय्य तृतीयेला मीठ का खरेदी करतात?
Akshay Tritiya : जाणून घ्या भारतातील विविध प्रांतातील अक्षय्य तृतीया सणाबद्दल
=======================================================================================================
अॅल्यूमिनियम फॉइल आणि गरम पाणी
चांदीची ज्वेलरी स्वच्छ करण्यासाठी गरम पाणी घ्या. यामध्ये अॅल्यूमिनियम फॉइलचे लहान लहान तुकडे करुन घाला किंवा बॉल्स घाला. यानंतर पाण्यात बेकिंग सोडा घालून चांदीची ज्वेलरी त्यामध्ये बुडवून ठेवा. 20 मिनिटांनंतर ज्वेलरी पाण्यातून काढून ब्रशने स्वच्छ करा.(Silver Jewellery Cleaning Hacks)
ही चूक करणे टाळा
चांदीची ज्वेलरी स्वच्छ करण्यासाठी मऊसर ब्रश घ्या. अन्यथा हार्ड ब्रशने ज्वेलरी स्वच्छ केल्यास त्यावर स्क्रॅच येऊ शकतात. याशिवाय ब्लीच किंवा कोणत्याही केमिकलचा वापर करू नका. गरम पाण्यातही ज्वेलरी थेट घालू नका. यामुळे ज्वेलरीचे नुकसान होऊ शकते.