हिंदू रीतिरिवाज आणि संस्कृतिमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्यातील अनेक गोष्टी आपल्याला माहित ही नसतात. पण त्यांना खुप महत्व आहे.आपण बऱ्याचदा पाहतो की लहान तान्हया बाळाला काळा टिका लावला जातो अगदी तसेच तुम्ही अनेकदा लहान मुलांच्या हातात किंवा पायात काळ्या रंगाचा धागा बांधलेल्या पहिला असेल. केवळ लहानच नाही तर हल्ली मोठ्या लोकांच्या हातात किंवा पायात ही काळा रंगाचा धागा बांधलेला दिसतो. अस म्हणतात की काळा रंग नकारात्मक ऊर्जा किंवा दुसऱ्याच्या आपल्यावर होणाऱ्या वाईट प्रभावापासून संरक्षण करतो. हल्ली त्याला फॅशनचे रूप ही आले आहे त्यामुळे काही जण फॅशन म्हणून ही काळा धागा मनगटावर किंवा पायात घालताना दिसतात. पण जर तुम्ही वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी काळा धागा परिधान करत असाल तर त्याचे काही नियम आहे. आणि आपण आज याच विषयावर अधिक माहिती जाणून घेणार आहोत. (Significance Of Black Thread)
लक्षात घ्या जेव्हा तुम्ही वाईट नजरेपासून वाचण्यासाठी हातात किंवा पायात काळा धागा बांधता तेव्हा त्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणे खुप महत्वाचे असते कारण जर तसे झाले नाही तर त्या धाग्याचे दुष्परिणाम ही होऊ शकतात.तर आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात
काळा धागा बांधण्याचे काही विशिष्ठ आणि महत्वाचे नियम:
– काळा धागा बांधताना काळजी घ्या की त्या धाग्याचा सतत तुमच्या शरीराला स्पर्श होणे गरजेचे आहे.
– काळा धागा परिधान करण्यासाठी शनिवार चा दिवस अतिशय शुभ मानला गेला आहे.
– मनगटावर काळा धागे बांधण्यासाठी ठराविक वेळ आणि शुभ मुहूर्त असतो. सामान्यत: हा पवित्र काळ ब्रह्म मुहूर्तावर असतो.
– जर परिधान केलेला धागा खराब किंवा सैल पडला असेल तर त्याला बदलणे गरजेचे आहे. शक्यतो ३-४ महिन्याच्या अंतरावर धागा बदलला जाणे गरजेचे आहे. तरच तुम्हाला धागा बांधण्याचा फायदा होईल. (Significance Of Black Thread)
– जर तुम्ही काळ्या धाग्याच्या प्रभावाला मानत नसाल तर एका शनिवारी शनी जैविक मंत्राचा जप करुन काळा धागा परिधान करा त्याने तुम्हाला नक्कीच काळ्या धाग्याचा प्रभाव दिसून येईल.
– काळ्या धाग्याच्या अधिक प्रभावासाठी तुम्ही न चुकता दररोज रूद्र गायत्री मंत्राचा जप करा. यासाठी रोजची एक ठराविक वेळ तुम्ही तुमच्या रोजच्या दिवसाच्या टाइमटेबल मध्ये ठरवू शकता.
==========
हे ही वाचा: उंचावरुन खाली पडत असल्याचे स्वप्न पडले तर त्याचा अर्थ काय होतो?
========
– काळा धागा बांधल्यानंतर तुम्हाला जर कोणताही शारीरिक किंवा मानसिक त्रास सुरु झाला तर ताबडतोब तो धागा काढून टाका.
– काळ्या धाग्याचे दुष्परिणाम आपल्यावर होऊ नये यासाठी ज्योतिषाचा सल्ला घेऊनच काळा धागा परिधान करा.
हल्ली खुप कमी ठिकाणी अशी लोक पहायला मिळतील ज्यांच्या हातात किंवा पायात काळा धागा बांधलेला पहायला मिळणार नाही. आणि यामध्ये महिलांसह पुरुषांचाही समावेश आहे.आज ही काळा धागा आणि काजळ वाईट नजर , काळी जीभ , नकारात्मक ऊर्जेपासून आपले रक्षण करतो असे वृद्ध लोकांचे म्हणणे आहे.
(Disclaimer: वरील लेख केवळ माहितीच्या आधारावर लिहिला गेलेला आहे. यातील कोणतीही गोष्ट करण्याआधी योग्य त्या व्यक्तीचा सल्ला घ्या.)