चहाच्या कपातून दिवसाची सुरुवात करणे ही बहुतांश जणांची सवय असते. त्यामुळे दिवसाची सुरुवात ही अगदी छान आणि आनंददायी झाल्याचे वाटते. मात्र ही सवय कधीकधी आपल्याला त्रासदायक होते की, डोकेदुखी सुद्धा सुरु होते. चहा पिण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. काहीजण दूधाची चहा पितात तर काही जण ब्लॅक टी. या व्यतिरिक्त काही लोक टी बॅग असणारी चहा पितात. मात्र तुम्हाला माहिती आहे का टी बॅगची चहा पिण्याची सवय धोकादायक बनू शकते. एका रिसर्चनुसार, याबद्दलची एक महत्वाची माहिती समोर आली होती. दरम्यान, टी बॅगच्या नुकसानासंदर्भातील यापूर्वीच्या काही सर्चमध्ये किंवा रिपोर्टमध्ये चुका आहेत. तर जाणून घेऊयात टी बॅग संदर्भात होणाऱ्या नुकसानाबद्दल अधिक. (Side effects of Tea bag)
टी बॅगमध्ये प्लास्टिकचा खरंच वापर केला जातो?
मॉन्ट्रियलच्या मॅकगिल युनिव्हर्सिटीच्या काही संशोधकांनी रिसर्चमध्ये असे आढळून आले की, प्लास्टिक टी बॅगच्या माध्यमातून चहाच्या कपात काही हानिकारक उत्पादक मिसळले जातात. रिसर्चनुसार जवळ ५ मिमीपेक्षा कमीची प्लास्टिक टी बॅग काही वेळ गरम पाण्यात ठेवली जाते, यामध्ये काही माइक्रोप्लास्टिक्स आणि नॅनोप्लास्टिक्स चहामध्ये कप मिसळला जातो. हे हानिकारक पदार्थ गरम पाण्याच्या संपर्कात येतात आणि असे असू शकतात की, यामुळे काही जणांना कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो.

टी बॅग ही या केमिकल पासून केले जाते तयार
खरंतर ही बॅग एक प्रकारच्या केमिकल पासून तयार केली जाते. ज्याला एपिक्लोरोहाइड्रिनच्या नावाने ओळखले जाते. रिसर्चनुसार, पेपर बॅग ही पाण्यास विरघळू नये त्यासाठी त्यावर केमिकलचा वापर केला जातो. हे केमिकल पाण्यात मिसळले जातात आणि यामुळे कार्सिनोजेनिक किंवा कॅन्सर बॉडी शरिरात निर्माण होऊ शकते. नफा मिळवण्यासाठी आरोग्यासह असा निष्काळजीपणा करण्याचा व्यापार अधिक वाढला आहे. यामुळे महिलांच्या हार्मोनल बॅलेंन्स बिघडू शकतात. ज्याला पीसीओडी आणि इनफर्टिलिटी पर्यंतच्या समस्या होऊ शकतात.(Side effects of Tea bag)
हे देखील वाचा- चहा गरम करताना सावधान…
हे ऑप्शन्स निवडा
जर तुम्हाला सकाळी अशा प्रकारचे पेय पिण्यापासून दिवसाची सुरुवात करायची असेल तर तुम्ही टी बॅग ऐवजी चहाच्या पानांचा वापर करा. तुम्हाला मार्केटमध्ये अगदी सहज अशा प्रकारचे प्रोडक्ट्स मिळतात. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेऊ शकतात.