Home » Health : फ्रोझन मटारच्या अतिसेवनामुळे आरोग्यवर होतात अनेक दुष्परिणाम

Health : फ्रोझन मटारच्या अतिसेवनामुळे आरोग्यवर होतात अनेक दुष्परिणाम

by Jyotsna Kulkarni
0 comment
Health
Share

हिवाळा आता संपुष्टातच आला आहे. त्यामुळे हिवाळ्यात मिळणारे ताजे मटार वर्षभर खाता यावे यासाठी महिलांची एकच कसरत चालू झाली आहे. बाजारातून घरी मोठ्या प्रमाणावर ताजे मटार आणून ते सोलून फ्रोझन मटार बनवले जात आहे. कारण मटार सगळ्यांनाच आवडतात. जवळपास सर्वच भाज्यांमध्ये आपण या मटारचे वापर करू शकतो. शिवाय नुसते मटार वापरून देखील नाना प्रकारच्या अगणित चविष्ट रेसिपी तयार होतात. जर मटार फ्रोझन नाही केले तर मग ते वापरता येणार नाही. यासाठी मटार फ्रोझन केले जातात. आजकाल तर बाजारात देखील सहज फ्रोझन मटार उपलब्ध होतात. अनेक हॉटेलमध्ये तर बहुतांशवेळा फ्रोजन मटारच वापरले जातात. मात्र फ्रोझन मटार खाणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले नाही असे तज्ज्ञांचे मत आहे. फ्रोझन मटार खाल्ल्याने काय तोटे होऊ शकता पाहूया. (Marathi)

फ्रोझन मटारमध्ये ताज्या मटारपेक्षा कमी पोषक असतात आणि ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने नुकसान होऊ शकते. फ्रोजन मटारमध्ये जास्त स्टार्च सामग्री असते, ज्यामुळे वजन वाढू शकते. याशिवाय फ्रोझन मटारमध्ये ट्रान्स फॅट देखील असते, ज्यामुळे हृदयविकार होऊ शकतो. अतिप्रमाणात फ्रोझन मटार खाल्ल्याने आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. यामुळे वजन वाढू लागते. त्यामुळे सतत फ्रोझन मटार खाऊ नये. यामध्ये असलेल्या स्टार्चमुळे शरीरात अतिरिक्त चरबी वाढू लागते. यामुळे लठ्ठपणाची समस्या वाढू लागते. (Top Marathi News)

Health

शेंगांमधून काढलेले वाटाणे हे ताजे असतात आणि ते फ्रोजन मटारपेक्षा आरोग्यासाठी चांगले मानले जातात. फ्रोजन वाटाणे वापरण्यास सोपे असले, तरी ते ताज्या वाटाण्यांपेक्षा कमी चवदार असण्यासोबतच ते शरीरासाठी हानिकारक देखील असतात. फ्रोजन मटारमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असू शकते. त्याचबरोबर त्यात पोषक घटकही कमी होतात. ताज्या वाटाण्यामध्ये मात्र असे होत नाही. तज्ज्ञांच्या मते, जेवणात ताजे मटार शक्यतो वापरा आणि फ्रोजन मटारचे सेवन टाळा. (Latest Marathi Headline)

फ्रोझन मटारमध्ये ताज्या मटारपेक्षा कमी पोषक असतात. याचे कारण असे की गोठलेले वाटाणे गोळा केल्यानंतर ते लवकर थंड केले जातात जेणेकरून त्यातील पोषक घटक नष्ट होत नाहीत. तथापि, ते जास्त काळ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास या पोषक तत्वांची काही प्रमाणात हानी होऊ शकते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी फ्रोजन पदार्थ हानिकारक ठरू शकते. मधुमेहाने त्रस्त असलेल्या लोकांनी फ्रोझन मटारचे सेवन करू नये. (Top Stories)

======

Sleep : झोपेत उंचावरून पडत असल्याचा आभास का होतो?

======

यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढण्यास सुरुवात होते. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांना फ्रोझन मटार न खाण्याचा सल्ला दिला जातो. उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी फ्रोझन मटार खाऊ नये. यामुळे उच्च रक्तदाब वाढू लागतो. यामध्ये असलेल्या सोडियममुळे ही समस्या जाणवू लागते. तसेच यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू लागतो. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.