Home » Makeup : सावधान! दररोज मेकअप करण्याच्या सवयीचे आहेत मोठे दुष्परिणाम

Makeup : सावधान! दररोज मेकअप करण्याच्या सवयीचे आहेत मोठे दुष्परिणाम

by Jyotsna Kulkarni
0 comment
Makeup
Share

प्रत्येक स्त्रीला सुंदर दिसणे आवडत असते. यासाठी अनेक महिला विविध घरगुती उपाय करण्यासोबतच मेकअपचा आधार देखील घेतात. बाहेर जाताना, ऑफिसला जाताना महिला कायम थोडातरी मेकअप करूनच जातात. एवढेच काय तर काही महिला घरी देखील मिनिमल मेकअप करून राहतात. एकतर मेकअप महिलांचा वीकपॉईंट आहे, तर मेकअप करणे प्रत्येकाला आवडते देखील आणि मेकअप केल्याने चेहरा अधिक सुंदर आणि आकर्षक दिसतो. (Makeup Side Effect)

आजच्या काळात तर मेकअप हे महिलांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. या फॅशनच्या जमान्यात लहान मुलीही रोज मेकअप करतात . मात्र त्यामध्ये अनेक हानिकारक घटक असतात. मात्र कायम मेकअप करणे हे आपल्या शरीराच्या त्वचेच्या दृष्टीने खूपच हानिकारक आहे. मेकअप केल्यामुळे त्वचेचे मोठे नुकसान होते.(Marathi News)

दररोज मेकअप केल्याने अनेक नकारात्मक परिणाम होतात. त्याच्या वापरामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते आणि त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. पण चेहऱ्यावर सतत मेकअप लावल्याने त्वचेची छिद्रे बंद होतात, ज्यामुळे त्वचेच्या पेशींचे नुकसान होते. मेकअपच्या अतिवापरामुळे चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या उदभवण्यास सुरुवात होते. यामुळे चेहऱ्याची चमक हळूहळू फिकी पडण्यास होते आणि कालांतराने चेहरा खराब दिसू लागतो. कधी कधी चेहऱ्याला फाऊंडेशन लावण्यापूर्वी आणि नंतर चेहरा स्वच्छ न धुतल्यामुळे त्वचेची छिद्र कमी होतात आणि पिंपल्स, ब्लॅकहेड्सच्या समस्या उदभवण्यास सुरुवात होते. (Todays Marathi Headline)

Makeup

इतकेच नाही तर मेकअपमुळे चेहऱ्यावर मुरुम, पिंपल्स आणि ॲलर्जी सारख्या समस्या उद्भवू लागतात. ज्यामुळे संपूर्ण चेहरा लाल होऊ लागतो. रोजच्या मेकअपमुळे त्वचेला श्वास घेणेही कठीण होते. बाजारात उपलब्ध असलेल्या काही मेकअपमध्ये केमिकल असल्याने त्वचेशी संबंधित समस्या वाढू शकतात. लिपस्टिकचा सततच्या वापरामुळे ओठ काळे होऊ लागतात. लिपस्टिकमध्ये असणारी हानिकारक केमिकल्स ओठांचा नैसर्गिक गुलाबीपणा दूर करतात. याशिवाय लिपस्टिकचा सततच्या वापरामुळे ओठांना इन्फेक्शन होण्याचाही धोका असतो. (Top Trending News)

बऱ्याच महिलांची त्वचा सेन्सिटिव्ह असते. त्यामुळे मेकअपच्या सततच्या वापरामुळे चेहऱ्यावर मुरुमांची समस्या अधिक प्रकर्षाने जाणवू लागते. रोज मेकअप केल्याने मेकअप प्रोड्क्टसमधील काही तुकडे त्वचेत जमा होतात, ज्यामुळे चेहेऱ्यावर मुरूम येऊ लागतात. याशिवाय मेकअपमध्ये असलेले पिगमेंट बॅक्टेरिया प्रदूषित हवेत मिसळतात आणि त्वचेच्या कोलेजनचे नुकसान करतात. परिणामी, नवीन पेशी वाढण्यात अडचणी निर्माण होतात. ज्यामुळे त्वचेवर सुरकुत्या येण्याची समस्या उद्भवते. त्वचेवर वेळेआधीच सुरकुत्या आल्याने तुम्ही कमी वयातच म्हातारे दिसू लागता. (Latest Marathi News)

डोळ्यांचा जास्त मेकअप केल्याने पापण्या नष्ट होण्याचा धोका असतो. कारण मस्कारामध्ये रसायने असतात. एवढेच नाही तर जास्त डोळ्यांच्या मेकअपमुळे कोरडेपणा येऊ शकतो. ही समस्या डोळ्यांमध्ये सर्वात सामान्य आहे. काहीवेळा डोळ्यांत किरकिरही सुरू होते. त्वचेला तेल येण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अति मेकअप हे देखील असू शकते. (Top Stories)

========

Health : कॅन्सर होऊ नये म्हणून ‘अशी’ घ्या आरोग्याची काळजी

========

मेकअपच्या नकारात्मक परिणामांपासून चेहऱ्याला वाचवण्यासाठी, दररोज मेकअप करण्याच्या सवयीला टाळा. कधीतरी मेकअप करणे चांगले असते, मात्र रोज मेकअप नका करू. खूप जास्त हेवी मेकअप टाळा, आणि लाइट मेकअप करायला सुरुवात करा. रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावरचा मेकअप काढा. यासाठी मेकअप रिमूव्हरचा वापर करू शकता किंवा फेसवॉशनेही चेहरा धुता येईल. दररोज मेकअप करत असाल तर, मेकअप काढल्यानंतर रोज चेहऱ्यावर झोपण्याआधी मॉयश्चरायझर ला. मुख्य म्हणजे भरपूर पाणी प्या जेणेकरून तुमची त्वचा नेहमीच हायड्रेट राहील. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.