Side effects of bread eating- ब्रेड हा जगातील सर्वाधिक प्रसिद्ध फुड्सपैकी एक आहे. कारण तो बनवण्याची प्रक्रिया ही अतिशय सोप्पी आहेच. पण त्याची चव ही तितकीच छान असून तो खाल्ल्यानंतर पोट ही भरल्यासारखे वाटते. हलकासा गोड आणि तुरट अशी चवीमुळे आपल्याला तो विविध पदार्थांसोबत नेहमीच खाल्ला पाहिजे असे वाटत असते. परंतु तुम्हाला माहिती आहे का दररोज ब्रेड खाण्याची सवय ही तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. कारण ब्रेडमध्ये मैदा आणि साखर असते म्हणजेच ब्रेडमध्ये कार्ब्स आणि साखरेचे प्रमाण हे अधिक असते. त्यामध्ये समतुल्य प्रमाणात ना पोषक तत्व असतात ना कॅलरीज, अशातच तुमचे वजन ही ब्रेडमुळे वाढू शकते. तर याचबद्दल आपण आज अधिक जाणून घेऊयात.
पोषक तत्वांची कमतरता
तुम्ही व्हाइट ब्रेड खा किंवा ब्राउन अथवा सौराडो यामध्ये पुरेशा प्रमाणात पोषक तत्व नसतात. पण त्यात कॅलरीज खुप प्रमाणात असल्याने तुमचे वजन काही प्रमाणात वाढण्याची शक्यता असते.
ग्लूटनचा अधिक स्तर
ब्रेड हा मैदा किंवा गव्हाच्या पिठाने तयार केलेला असो,त्यामध्ये ग्लुटनचे प्रमाण अधिक असते. ग्लूटन असे एक प्रोटीन आहे जे ब्रेडला टेक्चर देण्यास मदत करते. काही लोकांना यामुळे एलर्जी सुद्धा होते. कारण ग्लुटन ओळखणे सोप्पे नसते, ज्यामुळे पोट फुगणे, पोटात दुखण्यासारखी समस्या होऊ शकते.
हे देखील वाचा- फक्त खाणं नव्हे तर मुलांमध्ये लठ्ठपणाची ‘ही’ सुद्धा कारणे असू शकतात

अधिक प्रमाणात कार्ब्स
ब्रेडमध्ये कार्ब्सचे प्रमाण अधिक असते. परंतु उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींसाठी आणि मधुमेह असलेल्यांसाठी फायदेशीर तो ठरत नाही. कारण कार्बोहायड्रेट्समध्ये रक्तातील साखर वाढवण्याचे काम करते.
वजन वाढण्यास ठरतो जबाबदार
ब्रेडमध्ये आपण जसे पाहिले कार्बोहायड्रेट्स अधिक असतात आणि त्यासोबत मीठ आणि रिफाइंड साखर ही वापरली जाते. जी आरोग्यासाठी हानिकारक असते. ब्रेड दररोज खाल्ल्याने वजन वाढू शकते. सफेद ब्रेडमध्ये रिफाइन्ड मैदा आणि साखर अधिक प्रमाणात असते. त्यामुळे तुमच्या रक्तातील साखर वेगाने वाढू शकते.(Side effects of bread eating)
-हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक
ब्रेडमध्ये सोडियमचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे तुमचा रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. अशातच जर तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर ब्रेडचे सेवन करणे टाळा. तसेच यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी ही हानिकारक ठरतो.
परंतु जर तुम्हाला ब्रेड खाणे अतिशय आवडत असेल तर तुम्ही होलग्रेन ब्रेड, होलव्हिट ब्रेड, ब्रेड विथ फ्लेक्स सीड्स अशा प्रकारचे ब्रेड्स तुम्ही खाऊ शकता. त्याचसोबत दररोज ब्रेड खाण्याऐवजी तुमच्या नाश्तामध्ये विविध पद्धतींच्या गोष्टी खा.