गणपती बाप्पांची मंदिरे फक्त देशातच नाहीत, तर जगभरात आहेत. अशा काही खास गणेश मंदिरांमध्ये राजस्थानचे अनोखे मंदिरही बाप्पाच्या सोहळ्यासाठी सज्ज झाले आहे. निसर्ग सौंदर्याची देणगी लाभलेल्या माउंट आबू येथील हे मंदिर तेथील बाप्पाच्या मूर्तींसाठी प्रसिद्ध आहे. माउंट आबू येथील या अनोख्या सिद्धी विनायक मंदिरामधील गणेशाची मूर्ती ही गायीच्या शेणापासून तयार केलेली आहे. हे मंदिर अत्यंत निसर्गरम्य अशा ठिकाणी आहे. (Rajasthan)
घनदाट जंगलात एका टेकडीवर असलेल्या या मंदिरात जाण्यासाठी 105 पाय-या चढाव्या लागतात. आता पावसाळ्यात हा सर्व परिसर हिरव्या नवलाईनं नटलेला असतो. श्री गणेश चतुर्थीला या मंदिरात राजस्थानसह देशभरातील गणेश भक्त गर्दी करतात, आणि अनोख्या हजारो वर्षापूर्वीच्या गणेशमूर्तीसमोर नतमस्तक होतात. राजस्थानच्या माउंट अबू येथील सिद्धी विनायक मंदिरात आत्तापासून भाविकांनी गर्दी केली आहे. या मंदिरातील श्री गणेशाची मूर्ती ही गाईच्या शेणापासून बनवलेली आहे. हे मंदिर तेथील अनोख्या परंपरेसाठी प्रसिद्ध आहे. येथील मंदिरात विराजमान असलेली मूर्ती देशातील एकमेव मूर्ती आहे जी, गायीच्या शेणापासून तयार केलेली आहे. (Social News)
यामुळे स्थानिक या मंदिराला गोबर गणेश मंदिर असेही म्हणतात. प्राचीन काळी येथे हवन केले जात असत. या हवनात गायीच्या शेणापासून तयार केलेली मूर्ती स्थापित केली जात असे. त्या हवनामध्ये या मूर्तीचे कुठलेही नुकसान झाले नाही. तेव्हापासून या मूर्तीची येथे गोबर गणेशाच्या रूपात देवाची पूजा केली जाते. या मंदिराची उभारणी कधी झाली याची नेमकी नोंद नाही. मात्र 1994 मध्ये महंत नरसिंह दासजी यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. जीर्णोद्धार करण्यापूर्वी, शेणापासून बनवलेल्या मूर्तीची तूपात सिंदूर मिसळून विधिवत पूजा करण्यात आली. विशेष म्हणजे, त्यावेळी श्री गणेश मूर्तीवर लावलेले सिंदूर अद्याप उतरलेले नाही. या मंदिरात गणेश चतुर्थीला देश-विदेशातून हजारो भाविक येथे येतात. राजस्थान व्यतिरिक्त, महाराष्ट्र आणि गुजरातमधूनही भाविक दर्शनासाठी येतात. (Rajasthan)
या सिद्धी विनायक मंदिराबाबत काही अख्यायिकाही सांगण्यात येतात. त्यानुसार, स्कंद पुराणानुसार, भगवान गणेशाचा जन्म गौरी शिखर पर्वतावर म्हणजेच अर्बुद पर्वतावर झाला होता. याला पर्वत अबू या प्राचीन नावाने ओळखले जाते. जेव्हा माता पार्वतीने भगवान शिव यांच्याकडे पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद मागितला होता, तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीला पुण्यंक नावाचे व्रत करण्यास सांगितले होते. त्यानंतर माता पार्वतीने अर्बुदा पर्वताच्या ईशान शिखरावर बसून पुत्रप्राप्तीसाठी पुण्यंक व्रत केले. जेव्हा हे व्रत यशस्वी झाले तेव्हा गणेशाचा जन्म गौरी शिखरावर झाला. येथेच आता सिद्धि विनायक मंदिर आहे. येथील गोबर गणेशाची ही मूर्ती जगातील एकमेव गणपतीची मूर्ती आहे जी गायीच्या शेणापासून बनलेली आहे. या प्राचीन गणेशाला इच्छापूर्ती गणेश म्हणूनही ओळखले जाते. कारण भाविकांनी मागितलेली इच्छा श्री गणेश पूर्ण करतात, असे भाविक सांगतात. (Social News)
=======
Khlong Khuan Ganesha : या देशात आहे, सर्वात उंच गणेशमूर्ती !
=======
माउंट अबूमधील या गणेश मंदिराचे वर्णन अर्बुदा खंडात देखील आहे. त्यानुसार हे मंदिर 32 तीर्थांपैकी पहिले मुख्य तीर्थ आहे. स्कंद पुराणात असे वर्णन आहे की या पर्वतावर गणेशाचा जन्म झाल्यामुळे, त्याचे दर्शन घेतल्याने पापांचा नाश होतो आणि व्यक्ती वैकुंठ लोकाला प्राप्त होते. म्हणूनच भक्तांची या स्थानावर गाढ श्रद्धा असून श्री गणेश चतुर्थीला येथे भाविक मोठ्या संख्येनं येतात. या मंदिरातील गणेशाची ही मूर्ती आजही भव्य स्वरूपात आहे. गायीच्या शेणापासून बनवलेली ही गणेशाची मूर्ती 4500 वर्षे जुनी असल्याचे सांगण्यात येते. या मंदिरात गणेश चतुर्थीला मोठा मेळाही भरतो. साधारण पंधरा दिवस हा सोहळा या मंदिर परिसरात साजरा होतो. (Social News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics