भारताचे पहिले मतदार म्हणून ओळख असणाऱ्या श्याम सरन नेगी (Shyam Saran Negi) यांचे नुकतेच काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्यावर राजकीय इतमामात अंत्यंसंस्कार ही केले गेले. या दरम्यान किन्नोर पोलिसांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर सुद्धा दिला. नेगी यांच्या अंत्यंसंस्कारासाठी हजारो लोक सहभागी झाली होती. मात्र कसे झाले श्याम सरन नेगी भारताचे पहिले मतदार याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? तर याच संदर्भात आपण आज अधिक जाणून घेऊयात.
भारताच्या पहिल्या मतदाराला मिळाले दीर्घायुष्य
१९५१ नंतर प्रत्येक वेळी निवडणूकीसाठी नेगी यांनी मतदान केले. तर त्यांच्या निधनाच्या बातमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा ट्विट करत शोक व्यक्त केला होता. त्याचसोबत फक्त त्यांच्या राज्यापूर्तेच नव्हे तर देशातील सर्व लोकांनी ही त्यांना श्रद्धांजली दिली.

तो हा आहे काळ…
भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर पहिल्या निवडणूकीच्या मतदानाची तारीख १२ फेब्रुवारी १९५२ ठरवण्यात आली होती. तो असा काळ होता जेव्हा आदिवासी भागात खुप बर्फ पडायचा. याच कारणास्तव ज्या ठिकाणी लोक राहतात तेथे सार्वत्रिक निवडणूकीच्या ४ महिन्यापूर्वी म्हणजेच २५ ऑक्टोंबर १९५१ रोजी मतदानाचा निर्णय घेण्यात आला. शिक्षक असल्याकारणास्तव श्याम सरन नेगी यांना सुद्धा निवडणूकीसाठी ड्युटी लावण्यात आली होती.नेगी यांना आपल्या ड्युटीपूर्वी आपले मत मतपेटीत बंद करायचे होते. त्यानुसार त्यांनी मतदान ही केले आणि आपल्या ड्युटीवर ही त्यांना जायचे होते. सकाळी ६ वाजल्याच्या आसपास श्याम सरन नेगी यांनी मतदान अधिकाऱ्यांना लवकरात लवकर मत टाकण्यास सांगितले होते. जेणेकरुन पायीच निवडणूक ड्युटीसाठी दुसऱ्या मतदान केंद्रावर पोहचता येईल. अशातच श्याम सरन यांनी सकाळी ६.१५ वाजल्याच्या आसपास आपले मत मतदान पेटीत बंद केले. नेगी यांच्याआधी कोणीच संपूर्ण स्वातंत्र्य देशात मतदान केले नव्हते.
दरम्यान, देशाचे पहिले मतदार श्याम सरन नेगी (Shyam Saran Negi) यांनी आयुष्यात लोकसभा निवडणूकीसह एकूण ४४ वेळा मतदान केले. तर २ नोव्हेंबर २०२२ रोजी आयुष्यातील अखेरचे मतदान केले. २००७ मध्ये देशाला पहिल्यांदा कळले की, भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर सर्वात प्रथम मतदान करणारे हे हिमाचल मधील आदिवासी जिल्ह्यातील किन्नोर येथील श्याम सरन नेगी आहेत. त्यावेळी निवडणूक आयोगाने हा रेकॉर्ड शोधण्याचा प्रयत्न केला की, प्रथम मतदान कोणी केले होते.
हे देखील वाचा- देशातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी एकच युनिफॉर्मबद्दलचा पीएम मोदींनी का मांडला विचार?
याबद्दल अधिक शोध घेतल्यानंतर त्यांना असे कळले की, एका आदिवासी परिसरातील एका व्यक्तीने पहिले मतदान केले होते. तर खास गोष्ट अशी की, नेगी यांना वयाच्या ९० व्या वर्षी कळले की, ते देशाचे पहिले मतदाता आहेत.