Shweta Tripathi Education : ओटीटीवरील प्रसिद्ध अभिनेत्री गोलू गुप्ता म्हणजेच श्वेता त्रिपाठी नुकत्याच मिर्झापूरच्या सीरिजमुळे चर्चेत आहे. मिर्झापूरमध्ये कमालीचा अभिनय केल्यानंतर गोलूच्या भुमिकेला प्रेक्षकांनी पसंत केले आहे. उत्तम अभिनयच नव्हे तर गोलूचे शिक्षणही दमदाक आहे. जाणून घेऊया श्वेता त्रिपाठीचे शिक्षण किती आहे याबद्दल सविस्तर… श्वेता त्रिपाठी भारतीय अभिनेत्री असून मुख्य रुपात हिंदी सिनेमा आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर बहुतांशवेळा झळकली आहे.
श्वेता त्रिपाठीची शिक्षण
शालेय शिक्षण : 6 जुलै 1985 रोजी जन्मलेली श्वेता त्रिपाठीने आपले शिलाय शिक्षण दिल्ली पब्लिक स्कूल आर.के. पुरम नवी दिल्ली येथून पूर्ण केले आहे. श्वेता त्रिपाठीची आई निवृत्त शिक्षिका आहे. याशिवाय वडिल आयएएस अधिकारी आहेत.
महाविद्यालयीन शिक्षण
श्वेता त्रिपाठीने महाविद्यालयीन शिक्षण नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी येथून फॅशन कॅम्युनिकेशनमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर श्वेता त्रिपाठी करियर बनवण्यासाठी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. अभिनयात हळूहळू यश मिळाल्यानंतर आज श्वेता त्रिपाठीला ओखळले जाते.
करियरमधील अन्य महत्वाच्या गोष्टी
श्वेता त्रिपाठीने अभियनात एण्ट्री करण्याआधी नाटक आणि फॅशन डिझाइनरच्या रुपात काम केले आहे. नाटकात उत्तम अनुभव मिळवल्यानंतर टेलिव्हिजन आणि नंतर फिल्म इंडस्ट्रीमध्ये तिला उत्तम ओखळ मिळली. श्वेताने आपले शिक्षण आणि नाटकच्या माध्यमातून घेतलेल्या अनुभवाचा वापर करत स्वत:ची फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओखळ निर्माण केली आहे. (Shweta Tripathi Education)
करियरची सुरुवात
श्वेता त्रिपाठीने आपल्या करियरची सुरुवात वर्ष 2011 मध्ये आलेल्या त्रिशा सिनेमातून केली होती. या सिनेमात काम केल्यानंतर श्वेताने विक्की कौशल सोबत मसान सिनेमात मुख्य भुमिका साकारली होती. यानंतर श्वेताची हळूहळू बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण होत गेली.