तुम्ही कधी विचार केला आहे का की, जगातील कोणताही व्यक्ती मृत्यूपुर्वीच आपल्या मरणाची तयारी करतो. हे ऐकून थोडे विचित्र वाटते पण हे खरे आहे. जगातील एक ठिकाण असे आहे जेथे लोक आपल्या मृत्यूसाठी लागणाऱ्या वस्तूंची मनापासून आणि आनंदाने खरेदी करतात. यामध्ये कपड्यांपासून ते कफन कसे असावे याचा समावेश असतो. खरंतर हा एक फेस्टिव्हलच असतो त्याला शुकात्सु फेस्टा (Shukastu-Festa) असे म्हटले जाते.
अंत्यसंस्कारासाठी कामी येणारे सामान खरेदी करण्याचा हा फेस्टिव्हल जापान मध्ये साजरा केला जातो. येथे जिवीत असताना कबर आणि कफन खरेदी करण्याची बाब ऐकून प्रत्येकजण विचारात पडला की ही खरंच हैराण करणारी गोष्ट आहे. जापान मधील टोक्यो मध्ये प्रत्येक वर्षी १६ डिसेंबरला अंत्यसंस्काराची जत्रा असते. यामध्ये लोक मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन सामान खरेदी करण्यासाठी येत असतात.
लोक फुलांनी भरलेल्या कफनमध्ये झोपून फोटो काढतात आणि आपल्यासाठी ती कफन ही खरेदी करतात. लोक आपल्यासाठी कपडे ही निवडतात. मृत्यूबद्दल अशा पद्धतीचा सण साजरा करणे विचित्र आहे. पण टोक्यो मध्ये शुकात्सु फेस्टिव्हल मध्ये लोकांच्या मृत्यूची तयारी करण्यासंदर्भात शिकवले जाते. जापानी भाषेत शुकात्सु म्हणजे आपल्या अंताची तयारी करणे असा होतो.(Shukastu-Festa)
या व्यवसायाला एंडिंग इंडस्ट्री असे म्हटले जाते. याच्या माध्यमातून लोकांना शिकवले जाते की, मृत्यू नंतर काय होते. भले हा मृत्यू आणि अंत्यसंस्कारासंदर्भातील फेस्टिवल आहे पण यामध्ये फक्त वृद्धच नव्हे तर तरुण सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. या फेस्टिव्हल मध्ये त्यांचा ही उत्साह अधिक दिसून येतो.
हे देखील वाचा- जगातील ‘ही’ शहरं अचानक नकाशातून झालीत गायब
या फेस्टिव्हलदरम्यान देशातील बड्या-बड्या ५० कंपन्या येथे येतात. कबरी संदर्भातील सामानाची विक्री करतात. ऐवढेच नव्हे तर या फेस्टिव्हलला प्रत्येक वर्षी ५ हजार लोक आवर्जून उपस्थिती लावतात. लोकांकडून कफन सुंदर असावे म्हणून त्याचे डिझाइन ही खास पद्धतीने केले जाते. आपल्या शरिराच्या आकारानुसार सुद्धा तुम्हाला येथे कफन निवडण्याची परवानगी असते. आणखी महत्वाची बाब म्हणजे कफनमध्ये झोपल्यानंतर मेकअप काय असेल किंवा कपडे कसे असतील याचा सुद्धा विचार केला जातो. या फेस्टिव्हलमध्ये आलेल्या लोकांना स्वातंत्र्य असते की, ते आपल्यासाठी आधीपासूनच कफन खरेदी करु शकतात.