Home » Shravan : जगातील एकमेव असे मंदिर जिथे महादेवासमोर नंदी नाही!

Shravan : जगातील एकमेव असे मंदिर जिथे महादेवासमोर नंदी नाही!

by Jyotsna Kulkarni
0 comment
Shravan
Share

सध्या श्रावण महिना सुरु झाला आहे. या महिन्यात विविध व्रत वैकल्यांसोबतच महादेवाची पूजा करणे आणि महादेवाच्या मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेऊन तिथे पूजा करणे अतिशय लाभदायक मानले जाते. अतिशय पवित्र महिना असलेला श्रावण भगवान शिवाला समर्पित आहे. या संपूर्ण महिन्यात शंकराची मनोभावे पूजा केली जाते आणि त्यांना प्रसन्न केले जाते. आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू निद्राधीन झाल्यानंतर चार महिने या सृष्टीचे पालकत्व भगवान शिव सांभाळतात. (Marathi NEws)

यालाच चातुर्मास म्हणतात. याच चातुर्मासात येणाऱ्या श्रावण महिन्याचे महत्व अधिक असते. या महिन्यात वार कोणताही असला तरी महादेवाची पूजा करण्याचे फळ व्यक्तीला मिळतेच, त्यामुळे अनेक लोकं या महिन्यात महादेवांच्या महत्वाच्या आणि मोठ्या मंदिरांमध्ये जाऊन पूजा देखील करतात. याच निमित्ताने आज आपण जाणून घेऊया महाराष्ट्रातील एका अशा शंकराच्या मंदिराबद्दल ज्याचा इतिहास अतिशय जाज्वल्य तर आहे, शिवाय हे जगातील एकमेव असे मंदिर आहे, जिथे महादेवांसमोर नंदी नाहीये. (Todays Marathi Headline)

आता महादेवाचे मंदिर म्हटले की, त्यांच्या मूर्तीसमोर किंवा शिवलिंगासमोर नंदी असतो. नंदी देवाचे वाहन असल्याने त्याला शिवाच्या मंदिरात मान दिलाच जातो. मात्र आज आम्ही तुम्हाला ज्या मंदिराबद्दल सांगणार आहोत त्या शंकराच्या मंदिरात नंदीच नाहीये. मात्र का या मंदिरात नंदी नाहीये? कुठे आहे हे मंदिर? नंदी नसण्यामागे काय कारण आहे? चला जाणून घेऊया या सर्वच प्रश्नांची उत्तरं. (Latest Marathi News)

Shravan

हे आगळे वेगळे मंदिर आहे, महाराष्ट्रातील कुंभ नगरी असलेल्या नाशिकमध्ये. आम्ही बोलत आहोत गोदावरी नदीच्या तटाजवळ असलेल्या ‘कपालेश्वर महादेव मंदिरा’बद्दल. पुराणात असे म्हटले आहे की, भगवान शिव येथे काही काळ वास्तव्यास होते. हे देशातील पहिले मंदिर आहे जेथे नंदी भगवान शंकरासमोर नाही. श्रीरामांचे वास्तव असलेले शहर, मंदिरांचे शहर आणि कुंभमेळ्यासाठी नाशिक हे जगभरात ओळखले जाते. याच नाशिकमध्ये अनेक ऐतिहासिक मंदिरं पाहायला मिळतात. यातलेच एक मंदिर म्हणजे ‘कपालेश्वर महादेव मंदिर’. (Top Marathi Headline)

या मंदिराला ७०० वर्षांची परंपरा आहे. कपालेश्वर महादेव या मंदिरात नंदी नसण्यामागे काही पुरातन संदर्भ आणि अख्यायिका सांगितल्या जातात. पद्मपुराणात याबद्दल एक अशी कथा सांगितली जाते की, ब्रह्मदेवाला पाच मुखे होती. त्यातील चार मुखे वेदांचा जप करत असत आणि पाचवा मुख नेहमी दुष्कर्म करत असे. एकदा इंद्रसभेत ब्रह्मदेवाचे पाचवे मुख महादेवांबद्दल वाईट बोलू लागले. त्यामुळे महादेव क्रोधित झाले आणि त्यांनी ते मुख ब्रह्मदेवाच्या धडापासून वेगळे केले. आणि म्हणून ब्रह्मदेवाच्या हत्येचे पाप महादेवांना मिळाले. (Marathi Trending News)

या पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी महादेवांनी संपूर्ण विश्वात भ्रमण केले परंतु ब्रह्महत्यापासून मुक्त होण्याचा उपाय त्यांना सापडला नाही. भटकंती करत नाशिक येथील सोमेश्वरला गेल्यावर महादेवांना एका वासराने मोक्षाचा उपाय सांगितला होता. या वासरालाही आपल्या मालकाला मारण्याचे पाप होते. वासराचे रूप दुसरे कोणी नसून नंदीच होते. त्यांनी महादेवांना गोदावरीच्या रामकुंडात स्नान करण्यास सांगितले. तेथे स्नान केल्याने ब्रह्महत्येच्या पापातून महादेवांची मुक्तता झाली. नंदीमुळे महादेव ब्रह्मदेवाला मारण्याच्या अपराधातून मुक्त झाले. यामुळे महादेवांनी त्यांना आपले गुरू मानले. नंदी आता महादेवाचा गुरू झाला असल्याने महादेवाने त्यांना या मंदिरात स्वतःसमोर बसण्यास नकार दिला. तेव्हापासून येथे नंदीची मूर्ती बसविण्यात आलेली नाही. (Marathi Latest Headline)

१२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतल्यानंतर जितके पुण्य मिळते तितकेच पुण्य श्रीकपालेश्वर महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर मिळते. या मंदिरातील वातावरण अतिशय प्रसन्नमय आहे.मंदिर पुरातन असल्यामुळे पूर्णतः काळ्या पाषाणात मंदिराचे बांधकाम झाले आहे. पूर्वी या टेकडीवर महादेवांची पिंड होती. पण आता तिथे मोठे मंदिर आहे. पेशव्यांच्या कार्यकाळात या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. या मंदिराला ५२ पायऱ्या आहेत. वर गेल्यानंतर देवाचे दर्शन मिळते. या मंदिराच्या पायऱ्या उतरताच समोर गोदावरी नदी वाहताना दिसते. त्यातच प्रसिद्ध रामकुंड आहे. या कुंडात भगवान रामाने आपले वडील राजा दशरथ यांचे श्राद्ध केले होते. याशिवाय या परिसरात अनेक मंदिरे आहेत. (Social Updates)

=========

हे देखील वाचा : Shravan : श्रावणातल्या रविवारी करा आदित्यराणूबाईचे व्रत

=========

नाशिकच्या या कपालेश्वर महादेव मंदिरात श्रावणातल्या सोमवारी तसंच, शनिवार आणि प्रदोषाच्या दिवशी महादेवांची पालखी काढली जाते. महादेवांच्या या कपालिक पिंडीचं दर्शन घेतल्यास सर्वपातकांचा नाश होतो, अशी मान्यता आहे. श्रावणी सोमवार, महाशिवरात्री याव्यतिरिक्त इतर दिवशी देखील या महादेव मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी बघायला मिळते. महाशिवरात्रीनिमित्त मंदिराच्या गाभाऱ्यात शिव उपासक दूध, दही, मध, फळांचे रस याने महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केला जातो. गोदावरी नदीच्या पलीकडे, प्राचीन सुंदर नारायण मंदिर आहे. वर्षातून एकदा हरिहर महोत्सव होतो. त्यावेळी कपालेश्वर आणि सुंदर नारायण या दोघांचे मुखवटे गोदावरी नदीवर आणले जातात, जिथे ते एकमेकांमध्ये भेटतात. आणि अभिषेक होतो. (Top Stories)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.