भाजप पक्षाचा स्वघोषित नेता श्रीकांत त्यागी याच्याबद्दल सध्या सोशल मीडियात ते न्यूज चॅनलवर जोरदार चर्चा सुरु आहे. खरंतर त्याचा एका महिलेसोबत वाद झाल्यानंतरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा वाद एका बाजूला राहिला पण आता त्याला पकडण्यासाठी लाखोंचे बक्षीस आणि उत्तर प्रदेशातील पोलिसांनी ८ टीम सुद्धा तयार केल्या होत्या. श्रीकांत त्यागी (Shrikant Tyagi) याच्या गुन्हेगारीचा रेकॉर्ड आता समोर आले आहेत. त्यामुळेच त्याच्यावर आता गँगस्टर कायद्याअंतर्गत केस सुरु होणार आहे.
श्रीकांत त्यागी याने नोएडा येथील एका सोसायटीत झाडं लावण्याच्या वादावरुन महिलेसोबत गैरवर्तवणूक केली. त्याने महिलेला धक्का देण्यासह शिवीगाळ ही केला. भाजप श्रीकांत त्यागी पासून आता दूर झाला आहे. पक्षाच्या नेत्यांकडून असे सांगितले जात आहे की, त्याचा भाजपशी कोणताही संबंध नव्हता. तर श्रीकांत त्याचे याचे सोशल मीडियावरील अकाउंट्स तर वेगळीच कहाणी सांगतात. त्याने आपल्या अधिकृत ट्विटरवर स्वत:ला भाजपचा कार्यकर्ता असल्याचे म्हटले आहे. त्याचसोबत त्याचे काही दिग्गद पदाधिकाऱ्यांसोबत ही फोटो आहेत. श्रीकांत त्यागी याने घटनेनंतर आपले ट्विटर अकाउंट लॉक केले.

नोएडा पोलिसंनी त्याच्या एकूण ३ कार जप्त केल्या आहेत. त्याचसोबत घटनेनंतर पळ काढल्यानंतर पोलिसांनी त्याला ट्रेस करण्यासाठी पोलिसांनी त्याच्या पत्नीसह चार जणांना सुद्धा ताब्यात घेतले होते. पोलिसांनी श्रीकांत त्यागी याच्या पत्नी व्यतिरिक्त भाऊ, ड्रायव्हर आणि मॅनेजरला सुद्धा ताब्यात घेतले. तर आता पोलिसांनी त्यागी याचा शोध घेत त्याला अटक केली आहे.
हे देखील वाचा- मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय? कशाप्रकारे केली जाते पैशांची चोरी
श्रीकांत त्यागीवर एकूण ९ गुन्ह्यांची नोंद
शिविगाळ केल्यानंतरच्या व्हिडिओनंतर पोलिसांनी त्याची गुन्ह्याची कुंडली काढण्यास सुरुवात केली. त्यामध्ये असे समोर आले की, त्याच्या विरोधात कलम ३०७ अंतर्गत काही गंभीर कलमाअंतर्गत असे एकूण नऊ गुन्ह्यांची नोंद आहे. त्यागी वरील पहिला गुन्हा २००७ मध्ये खंडणीवसूलीचा करण्यात आला होता. दुसरा गुन्हा २००७ मध्येच गुंड कायद्याअंतर्गत, तिसरा २००८ मध्ये मारहाण, जीवे मारण्याची धमकी आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. चौथा गुन्हा २००९ मध्ये शांतता भंग, पाचवा गुन्हा २००९ मध्येच दंगा करत सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केल्याचा आरोप. सहावा आरोप असा की, २०१५ मध्ये मारहाण आणि धमकी दिल्याचा गुन्हा, सातवा २०२० मध्ये मारहाण, धमकी आणि हत्येचा प्रयत्न, आठवा गुन्हा २०२२ मध्ये महिलेसोबत गैरवर्तवणूक, धमकी देणे, शिविगाळ आणि आता नववा गुन्हा हा फसवणूकीचा दाखल करण्यात आला आहे. तर त्यागीवर असा ही आरोप आहे की, श्रीकांत त्यागी (Shrikant Tyagi) आपल्या कारवर आमदाराचा स्टिकर लावून फिरत होता.
श्रीकांत त्यागी हा मूळ रुपात नोएडा येथील भंगेल येथे राहणारा आहे. भंगेलमध्ये श्रीकांत त्यागाचा खुप दबदबा आहे. काही वर्षांपूर्वी नोएडा अथॉरिटीने त्याच्या जमिनीवर अधिग्रहण केले होते. त्या दरम्यान श्रीकांत त्यागी याला कोटी रुपयांची नुकसान भरपाई अथॉरिटीकडून मिळाली होती. त्याच पैशातून त्यागीने मोठ्या गाड्या आणि संपत्ती खरेदी केले होती. त्याचे भंगेल मार्केटमध्ये ५० हून अधिक दुकान सुद्धा आहेत. परंतु असे सांगितले जाते की, श्रीकांत याने बहुतांश अवैध जागांवर आपला कब्जा केला आहे.