प्रभू श्रीराम हे तमाम भारतीयांचे अराध्य दैवत आहे. याच प्रभू श्रीरामांच्या जन्मभूमीला आणि इतर धार्मिक स्थळांना एकत्रित भेट देण्याची संधी मिळाली तर….ही संधी सर्वच श्रीराम भक्तांना मिळणार आहे. कारण रामनवमीपूर्वी भारतीय रेल्वेनं रामायण यात्रा (Ramayana Yatra) चालू केली आहे. 7 एप्रिलपासून सुरु होणारी ही यात्रा (Ramayana Yatra) तब्बल 18 दिवसांची असणार आहे. यासाठी IRCTC च्या ऑनलाईन बुकींवरुन आपली सिट बुक करता येणार आहे. या प्रवासादरम्यान रामभक्तांना सर्व सुविधा IRCTC तर्फे प्रदान करण्यात येणार आहेत. रामनवमीपूर्वी IRCTC ची रामभक्तांना ही एक भेट असणार आहे. 7 एप्रिलपासून ही रामायण यात्रा (Ramayana Yatra) सुरु होणार आहे. IRCTC ने जाहीर केलेल्या या श्री रामायण यात्रेला भाविक रामनवमीनंतर लगेचच जाऊ शकतात. ही रामायण यात्रा ट्रेन भाविकांना अयोध्येपासून माता सितेच्या जनकपूरपर्यंत रामाशी संबंधित या तीर्थक्षेत्रांपर्यंत घेऊन जाणार आहे.
भारतीय रेल्वे तीर्थक्षेत्र पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘भारत गौरव डिलक्स एसी टुरिस्ट ट्रेन’ ही योजना IRCTC तर्फे सुरु करण्यात आली आहे. यात 18 दिवसांची ‘श्री रामायण यात्रा’ (Ramayana Yatra) सुरू होणार आहे. यासंदर्भात रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार रामायण यात्रा ट्रेन 7 एप्रिल रोजी दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकावरून आपला प्रवास सुरू करेल. प्रभू श्री रामाच्या जीवनाशी संबंधित प्रमुख ठिकाणांमधून ही ट्रेन प्रवास करेल. 7 एप्रिल रोजी नवी दिल्ली येथून ‘रामायण यात्रा’ (Ramayana Yatra) ट्रेन सुरु होऊन उत्तर प्रदेशातील अयोध्या, प्रयागराज आणि वाराणसीसह भगवान रामाच्या जीवनाशी संबंधित अनेक प्रमुख ठिकाणांना भेट देईल. ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या पर्यटकांना अयोध्येत थांबा दिला जाईल. यावेळी भाविक श्री रामजन्मभूमी मंदिर, हनुमान मंदिर आणि शरयू आरतीचे साक्षीदार होतील. त्यानंतर ही ट्रेन नंदीग्राम, सीतामढी, जनकपूर, बक्सर, वाराणसी, प्रयागराज, चित्रकूट, नाशिक, हम्पी, रामेश्वरम, भद्राचलम, नागपूर आणि इतर अनेक ठिकाणांहूनही जाईल. ‘देखो अपना देश’ आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या भारत सरकारच्या व्हिजनला चालना देण्यासाठी असा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
भारतीय रेल्वेने भारत गौरव टुरिस्ट ट्रेन्स चालवण्यासाठी अशा अन्यही ट्रेन चालू करण्याचा मानस व्यक्त केला आहे. भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ही रामायण ट्रेन डिलक्स एसी प्रकारात चालवली जाणार आहे. त्यात AC-I आणि AC-II श्रेणीचे डबे यासारख्या आधुनिक सुविधा आहेत. यात एकूण 156 पर्यटक प्रवास करु शकणार आहेत.या ट्रेनमध्ये प्रवाशांना 1AC कूप, 1AC केबिन आणि 2AC मध्ये प्रवास करण्याची सुविधा मिळेल. ज्यांच्या ट्रिपल शेअर तिकिटाची किंमत 1,11,910 रुपयांपासून ते 1,44,390 रुपयांपर्यंत असेल. त्याच वेळी, त्यांच्या सिंगल शेअरची किंमत 1,29,165 रुपये ते 1,61,645 रुपये आहे. जर कोणाला IRCTC श्री रामायण यात्रा (Ramayana Yatra) मध्ये बुकिंग करायचे असेल तर त्यांनी लगेच IRCTC च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. भाविक IRCTC च्या प्रादेशिक आणि स्थानिक केंद्रांना देखील भेट देऊन आपले तिकिट बुक करु शकतात.(Ramayana Yatra)
=======
हे देखील वाचा : आता जैसलमेरची सैर होणार पर्यटकांसाठी आकर्षित
=======
या ट्रेनचा पहिला थांबा अयोध्या असेल, त्यानंतर नंदीग्राममधील भारत मंदिर, बिहारमधील सीतामढी, जेथे पर्यटक सीतेचे जन्मस्थान आणि नेपाळमधील जनकपूर येथील राम जानकी मंदिराला भेट देतील. सीतामढीनंतर, ट्रेन बक्सर, वाराणसीकडे जाते, जिथे पर्यटक काशी विश्वनाथ मंदिर आणि कॉरिडॉर, तुळशी मंदिर आणि संकट मोचक हनुमान मंदिराला भेट देतील. त्यानंतर ही गाडी प्रयागराज, शृंगवरपूर आणि चित्रकूट, नाशिक, हम्पी, रामेश्वरम, भद्राचलम, नागपूरला जाईल आणि प्रवासाचा शेवटचा थांबा दिल्ली असेल. ट्रेनमध्ये दोन डायनिंग रेस्टॉरंट्स, एक आधुनिक स्वयंपाकघर, डब्यांमध्ये शॉवर क्यूबिकल्स, सेन्सर-आधारित वॉशरूम, फूट मसाजर्स आदी सुविधा देण्यात येणार आहेत. ट्रेनच्या प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षकांची सोय आहे. पर्यटक दिल्ली, गाझियाबाद, अलीगढ, टुंडला, इटावा, कानपूर आणि लखनौ रेल्वे स्थानकांवरून चढू किंवा उतरू शकतात. या रामायण ट्रेनचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.
सई बने