भारतात अगणित मंदिरं आहेत. मुख्य म्हणजे प्रत्येक मंदिराचा आपला एका इतिहास आणि वैशिष्ट्य असते. तसे पहिले तर मंदिरांचा देश असलेल्या भारतामध्ये प्रत्येक देवाचे भरपूर मंदिरं आहेत, मात्र काही मंदिरांची खासियत ही जगात गाजताना दिसते. संपूर्ण सोन्याची मंदिरं देखील भारतात आहेत. जेव्हा सोन्याच्या मंदिरांचा विषय निघतो तेव्हा सर्वात आधी डोक्यात येते ते म्हणजे अमृतसरचे ‘सुवर्ण मंदिर’. संपूर्ण जगामध्ये हे मंदिर कमालीचे प्रसिद्ध आहे. याशिवाय दक्षिण भारतातील देखील अनेक मंदिरं सोन्याची आहेत. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा एका मंदिराबद्दल संगर आहोत, जे १५०० किलो सोन्याचे बनलेले आहे. (India)
दक्षिण भारतातील मंदिराची खासियत खूपच वेगळी आणि मोहक आहे. इथे असणारी मंदिरं त्यांची रचना, इतिहास, महत्व इतर मंदिरांच्या तुलनेत खूपच वेगळे असते. याच दक्षिण भारतात एका असे मंदिर आहे, जे संपूर्ण सोन्याचे बनलेले असून, ज्याची किंमत ३०० कोटींपर्यंत आहे. हे मंदिर आहे महालक्ष्मी देवीचे. आज गुरुपुष्यामृत योग आहे. आजच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते तिचे दर्शन घेतले जाते. याच निमित्ताने जाणून घेऊया या अतिशय सुंदर आणि आकर्षक मंदिराबद्दल. (Marathi News)
दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यातील वेल्लोर शहरात असलेले भव्य स्वर्णमंदिर श्रीलक्ष्मीला समर्पित असल्याने याला “महालक्ष्मी मंदिर” म्हटले जाते. तामिळनाडूच्या वेल्लोरपासून सुमारे ७ किमी अंतरावर, थिरुमलाईकोडी या ठिकाणी हे भव्य मंदिर आहे. चेन्नईहून येताना सुमारे १४५ किमीचा प्रवास करावा लागतो. मंदिराच्या बांधकामासाठी सुमारे १,५०० किलो शुद्ध सोन्याचा वापर करण्यात आला असून, प्रवेशद्वार हे मुख्य मंदिरापासून अंदाजे दीड ते दोन किमी अंतरावर आहे. या मार्गावरून चालत जाताना दोन्ही बाजूला दाट हिरवळ दिसते. या मंदिरातली महालक्ष्मीची मुख्य मूर्ती ७० किलो सोन्यातून तयार केलेली आहे. (Todays Marathi Headline)
१०० एकरपेक्षा जास्त भागामध्ये पसरलेल्या या मंदिर परिसरात चहूबाजूला हिरवळ आपले लक्ष वेधून घेते. मंदिराची रचना वृत्ताकार आहे. या मंदिर परिसरात देशातील सर्व प्रमुख नद्यांचे पाणी आणून ‘सर्व तीर्थम’ नावाचा तलाव निर्माण करण्यात आला आहे. महालक्ष्मीचे हे मंदिर पायापासून कळसापर्यंत पूर्णत: सोन्याचं बनविलेले आहे. हे मंदिर पाहिल्यानंतर खरंच या मंदिरात महालक्ष्मीचा निवास असल्याची खात्री पटते. नजर जाईल तिथपर्यंत सोनचं सोनं आपल्याला पाहायला मिळते. मंदिराच्या भिंती सोन्याच्या, मंदिराचे सर्व खांब सोन्याचे, मंदिराची चौकट सोन्याची आणि मंदिरातील देवीची मूर्तीही सोन्याचीच. कदाचित जगातले हे पहिले मंदिर असावे जिथं एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं वापरण्यात आले आहे. (Top Marathi Headline)
या मंदिराचे सौंदर्य तुम्ही कधीही जा तुमचे डोळे दिपवतेच. मात्र तरीही सकाळी जेव्हा सूर्याची पहिली किरणं मंदिरावर पडताच तेव्हा हे मंदिर झळाळून निघते. शिवाय रात्रीच्या वेळी हजारो विद्युत दीपांनी मंदिरचे सौंदर्य अधिकच खुलून निघते. महालक्ष्मीचे हे मंदिर बनविण्यासाठी तांब्याच्या हजारो प्लेट्सवर सोन्याचे भरपूर थर देण्यात आले आहेत. ७ वर्षे रोज ८०० कामगार हे मंदिर तयार करण्यासाठी काम करत होते. मंदिराच्या दर्शनी भागात १००८ दिव्यांची तांब्याचे १० स्तर असलेली दीपमाळ असून, ही दीपमाळ कासवाच्या पाठीवर उभारण्यात आली आहे. खास दिवशी १००८ दिव्यांची ही दीपमाळ लावण्यात येते. हे मंदिर वर्षभर सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत भाविकांसाठी खुले असते. (Latest Marathi News)
=========
Gurupushyamrut Yog : गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय आणि त्याचे महत्व
Ganesh Chaturthi : गणपती बाप्पाला दुर्वा का वाहिल्या जातात?
=========
लोकसभा, राष्ट्रपती भवन यांसारख्या ठिकाणी जसा तिरंगा फडकवला जातो, तसाच तिरंगा या मंदिरावरही फडकवला जातो. हे मंदिर केवळ हिंदूंसाठीच नाही तर सर्व धर्मीयांसाठी खुले आहे. २००७ साली या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. याची भव्यता अनेक प्राचीन मंदिरांनाही मागे टाकते. देशातील कोणत्याही भागातून तामिळनाडूतील वेल्लूर शहरापर्यंत बस, रेल्वे, विमानसेवा उपलब्ध आहेत. दक्षिण भारतातील सर्वात व्यस्त रेल्वे स्टेशन काटपाडी असून येथून महालक्ष्मी मंदिर फक्त सात किलोमीटर अंतरावर आहे. काटपाडी स्टेशन वेल्लूर शहरातीलच एक भाग आहे. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics