Home » ‘मी जिवंत आहे’ श्रेयस तळपदेने केली संतापजनक पोस्ट

‘मी जिवंत आहे’ श्रेयस तळपदेने केली संतापजनक पोस्ट

by Jyotsna Kulkarni
0 comment
Shreyas Talpade
Share

सध्या संपूर्ण जग हे सोशल मीडियामय झाले आहे. अनेक लोकं या सोशल मीडियाच्या इतके आधीन झाले आहे की, आयुष्यातली छोट्यातली छोटी बाब देखील या प्लॅटफॉर्मवर शेअर करतात. रोज सकाळी उठल्यावर आधी हातात फोन घेऊन सोशल मीडिया चेक केले जाते. भलेही या सोशल मीडियाची अनेक चांगली उपयुक्त ठरणारी बाजू असली तरी नेहमीच नाण्याला दोन बाजू असतात. त्यामुळे या सोशल मीडियाची दुसरी बाजू देखील आहे जिचा त्रास अनेकदा मोठ्या प्रमाणावर लोकांना होताना दिसतो.

याच प्लॅटफॉर्मचा वापर करून विविध चुकीच्या गोष्टी घडताना आपण रोजच बघतो. सोबतच याच मार्गाचा वापर करून अनेक चुकीच्या आणि गंभीर बातम्या, अफवा देखील पसरवल्या जातात. याचा मोठा फटका कलाकारांना जास्त बसत असतो. अनेकदा कलाकारांच्या बाबतीत अशा अफवा मोठ्या प्रमाणावर पसरताना दिसतात. आता अभिनेता श्रेयस तळपदेचेच घ्या ना. श्रेयसचे निधन झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरत आहे. या अफवांमुळे श्रेयसला आणि त्याच्या कुटुंबाला मोठ्या प्रमाणावर संकटाना आणि समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबद्दल श्रेयसने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27)

श्रेयसने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले, “मी सर्वांना सांगू इच्छितो की मी जिवंत, आनंदी आणि निरोगी आहे. ज्या पोस्टमध्ये माझ्या मृत्यूचा दावा केला जात होता, त्या पोस्टची मला माहिती मिळाली. मला माहीत आहे की, विनोदाचे स्वतःचे महत्त्व आहे. परंतु, जेव्हा त्याचा गैरवापर केला जातो, तेव्हा खूप मोठे नुकसान होऊ शकते. कोणत्याही गोष्टीला मर्यादा असतात. विनोद म्हणून सुरू झालेल्या गोष्टीने आता प्रत्येकजण तणावात आहे आणि ज्यांना माझी काळजी आहे, विशेषत: माझ्या कुटुंबियांच्या भावनांशी लोक खेळ खेळताना दिसत आहेत.

मला एक लहान मुलगी आहे, जी दररोज शाळेत जाते. ती माझ्या तब्येतीबद्दल काळजीत असते आणि मला सतत प्रश्न विचारत राहते की, मी बरा आहे का? तिला हे सतत जाणून घ्यायचे असते की मी कसा आहे. या खोट्या बातम्या तिला अधिक दुःखी करतात आणि तिला असेच आणखी प्रश्न विचारण्यास भाग पाडतात. जे या प्रकारचा मजकूर टाकत आहेत, त्यांनी ते आताच थांबवावे आणि त्याचा काय परिणाम होईल याचा विचार करावा. काही लोक खरंच माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना करतात आणि अशा प्रकारे विनोदाचा वापर होताना पाहून मनाला अतिशय वाईट वाटतं.

=======

हे देखील वाचा : कोलकाता घटनेवर किरण मानेंची सणसणीत पोस्ट

=======

फक्त विशिष्ट व्यक्तीलाच याचा फटका बसतो असे नाही, तर त्याच्याशी संबंधित असलेले लोकं जसे की, कुटुंब आणि खासकरून लहान मुलं ही परिस्थिती पूर्णपणे समजून घेऊ शकत नाहीत. कृपा करून हे थांबवा. हे असे कुणासोबतही करू नका. हे असे तुमच्या बाबतीत घडावे, असे मला बिलकुल वाटत नाही. म्हणूनच कृपया संवेदनशील व्हा.”

दरम्यान श्रेयस तळपदेला मागील वर्षी १५ डिसेंबर २०२३ रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. त्याला सिनेमाच्या सेटवर त्याला त्रास होऊ लागला होता. १० मिनिटांसाठी त्याचे हृदयही बंद पडले होते. मात्र सुदैवाने वेळीच उपचार झाल्याने तो वाचला. उपचारानंतर तो बरा झाला आणि आता ठणठणीत आहे. पण तरीही आज त्याला तो हयात असल्याचे पोस्ट करून सांगावे लागत आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.