सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये एकदिवसीय सामने सुरु आहेत. याआधी या दोन्ही देशांमध्ये कसोटी सामन्यांची शृंखला देखील रंगली होती. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियामध्ये होत आहेत. मात्र नुकत्याच पार पडलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर कॅच घेताना गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला ऑस्ट्रेलियातील सिडनीमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्कॅनमध्ये त्याला स्प्लीनला म्हणजेच प्लीहा दुखापत झाल्याचे दिसून आले. सध्या सोशल मीडियावर श्रेयस अय्यरचा एक झेल पकडतानाचा एक व्हिडिओ कमालीचा व्हायरल होत आहे. हा झेल पकडतानाच त्याला दुखापत झाली. (Shreyas Iyer)
दुखापत झाल्यानंतर श्रेयसला सिडनीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अंतर्गत रक्तस्राव झाल्याने त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. मिळणाऱ्या माहितीनुसार ड्रेसिंग रुममध्ये जाताच श्रेयस बेशुद्ध पडला आणि त्याची स्थिती चिंताजनक झाली. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. जेव्हा स्कॅन झाले तेव्हा स्कॅनमध्ये त्याच्या ‘प्लीहा’ला जखम झाल्याचे समोर आले आहे. (Marathi)
मैदानात झेल पकडताना श्रेयस जमिनीवर आदळल्याने त्याच्या बरगडीला जबर मार लागला. यामुळे त्याच्या प्लीहा या महत्त्वाच्या अवयवाला इजा झाली आहे. श्रेयस अय्यर सध्या सिडनीमध्ये उपचार घेत आहे. त्याला झालेली ही दुखापत साधी वाटत असली तरी ती जीवघेणी ठरू शकते. अनेकांनी तर आता पहिल्यांदाच ‘प्लीहा’ या अवयवांबद्दल ऐकले असले. त्यामुळे प्लीहा म्हणजे काय?, त्याला मार लागल्याने काय होते?, या अवयवाचे कार्य काय? आदी सर्वच गोष्टींची आपण या लेखातून माहिती करून घेऊया. (Marathi News)
‘प्लीहा’ म्हणजे काय?
स्प्लीन अर्थात प्लीहा हा शरीराच्या डाव्या बाजूला, बरगड्यांच्या खाली आणि पोटाच्या वर असणारा एक लहान अवयव आहे. त्याला हिंदीत ‘टिली’ तर मराठीत ‘प्लीहा’ म्हणतात. प्लीहाचे प्राथमिक कार्य रक्त शुद्ध करण्याचे आहे. प्लीहा जुन्या किंवा खराब झालेल्या लाल रक्तपेशी काढून टाकते आणि शरीराला संसर्गापासून वाचवण्यासाठी नवीन पांढऱ्या रक्तपेशी तयार करते. प्लीहा हा शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीचा एक महत्त्वाचा भाग आहे. (Todays Marathi HEadline)

ते रक्तातील बॅक्टेरिया आणि विषाणू ओळखण्यास आणि नष्ट करण्यास मदत करते. प्लीहा रक्त साठवते आणि गरज पडल्यास शरीराला रक्त पुरवते. जेव्हा दुखापत किंवा अपघातामुळे शरीराला रक्त कमी होते तेव्हा हे राखीव रक्त उपयोगी पडते. जेव्हा रक्त प्लीहामधून शुद्ध होऊन शरीरात वाहते तेव्हा पांढऱ्या रक्तपेशी कोणत्याही संसर्गाशी लढण्यास समर्थ होतात. लाल रक्तपेशींचं आयुष्य अंदाजे 120 दिवस असतं, त्यानंतर प्लीहा त्यांना नष्ट करते. डाव्या बाजूला जोरात पडल्याने किंवा बरगडीला गंभीर दुखापत झाल्याने प्लीहाला इजा पोहोचू शकते आणि शरीरात रक्तस्राव होऊ शकतो. यालाच डॉक्टर splenic laceration असे म्हणतात. (Marathi Top News)
प्लीहाला झालेल्या दुखापतीमुळे डाव्या ओटीपोटात वरच्या बाजूला तीव्र ते अतितीव्र वेदना होतात. कोणीतरी पोटावर मोठ्या प्रमाणावर दाब टाकत असल्यासारखे वाटत असते. जर प्लीहा फुटला तर अंतर्गत रक्तस्त्राव होतो. अशाप्रकारचा अंतर्गत रक्तस्राव होणे ही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती आहे. जर अंतर्गत रक्तस्त्राव वाढला तर रुग्णाची प्रकृती खालावून अगदी मृत्यू देखील होऊ शकतो. (Latest Marathi Headline)
प्लीहाला इजा झाल्यानंतर त्यावर उपचार कोणते?
प्लीहाच्या किरकोळ दुखापतींसाठी, डॉक्टर सहसा बेड रेस्ट आणि देखरेखीची शिफारस करतात. जर रक्तस्त्राव गंभीर असेल तर शस्त्रक्रिया करायला देखील सांगितले जाऊ शकते. या शस्रक्रियेला स्प्लेनेक्टोमी म्हणतात. या शस्त्रक्रियेत प्लीहाचा काही भाग किंवा संपूर्ण भाग काढून टाकला जातो. प्लीहा काढून टाकल्यानंतर देखील व्यक्ती जिवंत राहू शकते, मात्र ती खूपच संवेदनशील बनते. अशा व्यक्तींना कोणताही संसर्ग अधिक जलद आणि प्रखर होऊ शकतो. अशा परिस्थितीत, रुग्णाने भविष्यातील संसर्ग टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेतली पाहिजे, कारण प्लीहा नसल्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत होते. प्लीहा शरीराला रोगांपासून वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. (Top Trending News)
========
Heart Attack : हार्ट अटैकचे आधीचे इशारे शरीर काही तासांपूर्वीच देतं चेतावणी, ओळखल्यास वाचू शकते जीव
========
तज्ञ अशा रुग्णांना कायम सल्ला देतात की, प्लीहाच्या दुखापतीतून बरे झाल्यानंतर, रुग्णाने किमान काही आठवडे कोणत्याही शारीरिक हालचाली किंवा खेळांपासून दूर राहावे. प्लीहाची दुखापत बरी होण्यासाठी किमान सहा ते बारा आठवडे लागतात. रुग्णासाठी औषधे, निरोगी आहार आणि पुरेशी विश्रांती अतिशय गरजेची आहे. जर ताप, पोटदुखी किंवा थकवा यासारखी लक्षणे पुन्हा दिसून आली तर ताबडतोब वैद्यकीय मदत घ्यावी. प्लीहाचा आकार लहान असू शकतो, परंतु त्याचे कार्य फार महत्त्वाचे असते. या अवयवाला झालेली कोणतीही दुखापत ही वैद्यकीय आणीबाणीच समजली जाते. अशा परिस्थितीत, शक्य तितक्या लवकर उपचार घेणे आवश्यक आहे, अन्यथा व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
