Home » बारा ज्योतिर्लिंग – सोरटीसोमनाथ

बारा ज्योतिर्लिंग – सोरटीसोमनाथ

by Correspondent
0 comment
Shree Somnath Jyotirlinga Temple | K Facts
Share

हजारो वर्षांपूर्वी विक्रमसंवत्सरात आकाशातून मोठ्या प्रमाणात उल्कापात झाला. तेव्हा त्यापासून हजारो शिवलिंग निर्माण झाले. त्यापैकी बारा ज्योतिर्लिंग हे महत्त्वाचे मानले जातात.

सोरटीसोमनाथ (Shree Somnath Jyotirlinga Temple)
सोमनाथ (गुजरात – वेरावळ
)

गुजरात मध्ये सौराष्ट्रात वेरावळ बंदरावर वसलेले सोरटी सोमनाथ मंदिर (Somnath temple) हे एक महत्त्वपूर्ण हिंदू मंदिर असून त्याची गणना बारा ज्योतिर्लिंगांमध्ये केली जाते. देशातील प्राचीन तीर्थस्थळांत सोमनाथ मंदिराचा समावेश होतो. त्याचा उल्लेख स्कंदपुराण, श्रीमद्भागवतगीता, शिवपुराणात आढळतो. वेद, ऋग्वेदात ही सोमेश्वर महादेवाचा महिमा वर्णिला आहे.

सोरटीसोमनाथाची आख्यायिका
पुराणात या मंदिराच्या अनुषंगाने एक कथा आहे. चंद्राचे सोम असे नाव होते. तो दक्षाचा जावई होता. एकदा त्यांनी दक्षाची अवहेलना केली. त्यामुळे राग येऊन दक्षाने त्यांचा प्रकाश दिवसादिवसाने कमी होत जाईल असा शाप दिला. अन्य देवतांनी दक्षाला उःशाप देण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी सरस्वती नदी समुद्राला जिथे मिळते, तेथे स्नान केल्यास या शापाचा परिणाम रहाणार नाही, असे सांगितले. त्यानंतर सोमाने सौराष्ट्रातील या ठिकाणी येऊन येथे स्नान केले आणि भगवान शिवाची आराधना केली. शंकर येथे प्रकट झाले आणि त्यांनी त्याचा उद्धार केला. त्यामुळे हे स्थान सोमनाथ या नावाने प्रसिद्ध झाले.

Jay Somnath
Jay Somnath

भौगोलिक माहिती
गुजराच्या सौराष्ट्रात वेरावळनजीक सोमनाथ हे श्रीशंकराचे मंदिर आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी सोमनाथ अग्रस्थानी आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या स्तंभाचे टोक ज्या दिशेने आहे त्या दिशेस दक्षिणेकडील अंटार्टिकापर्यंत जमिनीचा एकही तुकडा नाही.

ऐतिहासिक माहिती
हे मंदिर ऐतिहासिकदृष्ट्याही महत्त्वाचे आहे. हे मंदिर एवढे वैभवशाली होते की गझनीच्या मोहम्मदाने त्यावर अनेकदा आक्रमण करून ते लुटले. या मंदिराचा विध्वंसही त्याने केला होता. नंतर मधल्या काळात इंदूरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी त्याच्या जीर्णोद्धाराला मदत केली होती. सध्या अस्तित्वात असलेले मंदिर हे भारताचे पाहिले उपपंतप्रधान व लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अथक प्रयत्नातून साकार झाले आहे.

हे मंदिर कैलास महामेरू प्रसाद शैलीत बनविले गेले आहे. हे मंदिर गर्भगृह, सभामंडप आणि नृत्यमंडप या तीन प्रमुख भागांमध्ये आहे. याच्या शिखरावरील कलशाचे वजन दहा टन आहे. ध्वजाची उंची 27 फूट आहे. इतिहासकारांच्या मते सोमनाथ मंदिराला 17 वेळा नष्ट करण्यात आलं आहे आणि प्रत्येकवेळी या मंदिराची पुनर्रचना करण्यात आली आहे.

कसे पोहचाल?
हवाई मार्ग:

सोमनाथपासून 55 किलोमीटरवर केशोड नावाच्या स्थानाहून सरळ मुंबईसाठी हवाईसेवा आहे. केशोड आणि सोमनाथ दरम्यान बस आणि टॅक्सी सेवा आहे.

रेल्वे मार्ग:
सोमनाथहून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन वेरावळ असून ते सात किलोमीटरवर आहे. येथून अहमदाबाद आणि गुजरातच्या अन्य ठिकाणी जाता येते.

रस्ता मार्ग:
सोमनाथ वेरावळहून सात किलोमीटर, मुंबईहून 889, अहमदाबादपासून 400, भावनगरहून 266, जुनागढहून 85, पोरबंदरहून 122 किलोमीटरवर आहे. पूर्ण गुजरातमधून येथे येण्यासाठी बस सेवा उपलब्ध आहे.

शब्दांकन – शामल भंडारे.

=====

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.