Shree Krishna Janmasthami : हिंदू देवी-देवतांची मनोभावे पूजा-प्रार्थना केली जाते. अशातच श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण येत्या 26 ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. या दिवशी भगवान कृष्णाची मोठ्या भक्तीभावे पूजा केली जाते. खरंतर, हा दिवस भगवान कृष्णांचा जन्मदिवस आहे. जाणून घेऊया देशातील वेगवेगळ्या ठिकाणी कशाप्रकारे जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो याबद्दल सविस्तर…
मथुरेतील श्रीकृष्ण जन्माष्टमी
मथुराच्या प्रत्येक कणात भगवान श्रीकृष्ण असल्याचे मानले जाते. येथे जन्माष्टमी दोन भागात साजरी केली जाते. पहिल झूलनोत्सव आणि दुसरा घाट. झूलनोत्सवच्या दिवशी मथुरातील नागरिक आपल्या घरी झोपाळा लावतात आणि त्यावर भगवान श्रीकृष्णाची मूर्ती ठेवतात. यानंतर भगवान श्रीकृष्णाला झोपाळ्यात झुलवले जाते. दूध, दही, मध, तूपाने श्रीकृष्णाला स्नान घातले जाते. यानंतर नवे वस्र आणि आभूषणही घातले जातात.
दुसऱ्या भागात घाट प्रथेनुसार त्या ठिकाणाच्या मंदिरांना एकाच रंगाने रंगकाम केले जाते. अथवा कृष्णाच्या जन्मावेळी प्रत्येक मंदिरात पूजा केली जाते. याशिवाय मंदिरात घंटानाद केला जातो. मथुरा-वृंदावनच्या मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमीवेळी वेगळा उत्साह दिसून येतो.
मध्य प्रदेशातील कृष्ण जन्माष्टमी
मध्य प्रदेशात देखील कृष्ण जन्माष्टमी मोठ्या आनंदात साजरी केली जाते. येथे गेल्या 100 वर्षांपासून प्रभू कृष्णाच्या जन्मानंतर त्यांची कुंडली तयार करण्याची परंपरा आहे. येथे प्रत्येक वर्षी प्रभूचे नामकरम केले जाते. यावेळी श्रीकृष्णाला वेगवेगळी नावे दिली जातात. (Shree Krishna Janmasthami)
द्वारकामधील जन्माष्टमी
द्वारका गुजरातमध्ये आहे. मथुरा सोडल्यानंतर भगवान श्रीकृष्ण द्वारका येथे येऊन अनेक वर्षे राहिल्याचे सांगितले जाते. या ठिकाणाला खूप पौराणिक महत्व आहे. असे मानले जाते की, द्वारका शहराला भगवान कृष्णाचा मोठा भाऊ बलराम यांनी उभारले होते. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी संपूर्ण शहराला द्वारकाला सजवले जाते. जन्माष्टमीच्या वेळी भजन, किर्तन आणि मंगल आरती कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
मुंबईतील श्रीकृष्ण जन्माष्टमी
मुंबईत गणेश चतुर्थी आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या वेळी वेगळा उत्साह दिसून येतो. मुंबईत दही हंडीचा कार्यक्रम मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो. यावेळी अनेक गोविंदा पथक दही हंडी फोडण्याचा थरार करताना दिसून येतात.