आपण सर्वच गणपती बाप्पाचे भक्त आहोत. प्रथम पूजनीय गणेश कायम आपले लाडके दैवत आहे. बुद्धीची आणि कलेची देवता म्हणून ओळख असलेला बाप्पा आपल्याला देखील प्रसन्न व्हावा आणि त्याचे आशीर्वाद कायम आपल्यावर राहावे म्हणून अनेक लोकं संकष्टी चतुर्थी करतात. प्रत्येक महिन्यात येणारी चतुर्थी गणपतीला समर्पित असते. प्रत्येक महिन्यात दोन वेळा चतुर्थी येतात. शुक्ल पक्षात येणार्या चतुर्थीला ‘विनायक चतुर्थी’ आणि कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला ‘संकष्टी चतुर्थी’ म्हणतात. जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते, तेव्हा तिला ‘अंगारकी चतुर्थी’ म्हणून ओळखले जाते. या दिवसाला ‘अंगारकी संकष्टी चतुर्थी’, असे म्हणतात. (Marathi News)
महिन्याला येणाऱ्या चतुर्थीला महत्व असतेच मात्र अंगारकी चतुर्थी ही कायम खास असते. मंगळवार हा गणपती बाप्पाचा वार समजला जातो आणि त्याच दिवशी येणारी ही चतुर्थी अनेक कारणांमुळे महत्वाची ठरते. मुख्य म्हणजे एका वर्षात मोजक्याच अंगारकी चतुर्थी येतात. यंदा देखील लवकरच अंगारकी चतुर्थीचा योग्य येणार आहे. ही अंगारकी चतुर्थी खूपच खास असेल कारण श्रावणात महिन्यात अंगारकीचा योग्य येणार आहे. (Todays Marathi Headline)
कधी आहे अंगारकी चतुर्थी?
श्रावण महिन्यातील अंगारकी चतुर्थी १२ ऑगस्ट, २०२५ मंगळवारी आहे. अंगारकी चतुर्थी ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी येते. या दिवशी उपवास केल्याने भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात. श्रावण महिना हिंदू दिनदर्शिकेतील एक पवित्र महिना आहे आणि या महिन्यात अंगारकी चतुर्थी येणे विशेष शुभ मानले जाते. या दिवशी, भक्त उपवास करतात, गणपतीची पूजा करतात आणि रात्री चंद्रोदया झाल्यावर उपवास सोडतात. यंदा २१ वर्षांनी श्रावण महिन्यात अंगारकी चतुर्थी आली आहे, त्यामुळे या दिवसाचे महत्व आणखीन वाढले आहे. (Top Marathi Headline)
=========
Shravan Somvar: १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक पूर्वाभिमुख घृष्णेश्वर महादेव मंदिर
=========
अंगारकी चतुर्थीला गणपतीची विधिवत पूजा केली जाते आणि उपवास ठेवला जातो. अंगारकी चतुर्थीला उपवास केल्याने वर्षभर चतुर्थी केल्याचे फळ मिळते तर सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणेशाचे स्वरूप चतुर्मुखी आणि चतुर्भुज असते असे देखील मानले जाते. गणेशाच्या या रूपाला संकटमोचन गणेश देखील म्हणतात. अंगारकी चतुर्थीला ‘ॐ गं गणपतये नमः’ आणि ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्रांचा जप करावा. शक्य असल्यास, गणेश अथर्वशीर्षाचे पठण करावे. (Top Marathi Headline)
अंगारक म्हणजेच मंगळदेवाने गणेशाचे तप केले होते, त्यामुळे गणपतीने प्रसन्न होऊन मंगळवारी चतुर्थीला तिथी येईल त्या दिवशी अंगारकी गणेश चतुर्थी म्हणून ओळखले जाणार असे वरदान दिले. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची विधिवत पूजा करावी, अथर्वशीर्ष म्हणत गणपतीला अभिषेक करावा. या दिवशी उपवास करावा. चंद्रोदया नंतर गणपती श्लोक वाचून हा उपवास सोडला जातो. या दिवशी गणेशाला लाल सिंदूर लावा आणि दुर्वा अर्पण करा. असे केल्याने मंगळ दोष संपतात अशी मान्यता आहे.(Latest Marathi News)
अंगारकीची सुरुवात कशी झाली ?
गणेश पुराण या ग्रंथात दिलेल्या कथेनुसार, अंगारक या भारद्वाज ऋषी पुत्राने कठोर तप करुन गणपतीला प्रसन्न केलं. गणपतीने याने अंगारक याला वर दिला होता की, तुझं नाव हे ‘अंगारक’ म्हणून नेहमी लोकस्मरणात राहील. गणपती अंगारक ऋषींवर जेव्हा प्रसन्न झाले, तो दिवस चतुर्थीचा होता. या कथेनुसार, अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतंही संकट येत नाही आणि जरी संकट आले तरी त्याचे निवारण होते. (Marathi Trending Headline)
मान्यता आहे की अंगारक म्हणजेच, आकाशात दिसणार मंगळ ग्रह. गणेशाने मंगळाला वर दिला की, तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी ठरेल. त्या दिवसापासून अंगारकी चतुर्थी या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. नंतर मंगळाने गणपतीचं एक मंदिर बांधले आणि तिथे गणपतीची मूर्ती स्थापन केली आणि याच मूर्तीला मंगलमूर्ती असे नाव मिळाले. (Top Trending News)
अंगारकी चतुर्थी श्लोक
गणेशाय नमस्तुभ्यं,
सर्व सिद्धि प्रदायक ।
संकष्ट हरमे देवं,
गृहाणार्घ्यम् नमोऽस्तुते ॥
कृष्णपक्षे चतुर्थ्यातु ,
सम्पूजितं विधूदये।
क्षिप्रं प्रसीद देवेश,
अंगारकाय नमोऽस्तुते ॥
अंगारकी चतुर्थीची कथा
कृतयुगात अवंती नगरीत वेदवेत्ते अग्निहोत्री ऋषी भरद्वाज हे महान गणेशभक्त असून त्यांनी त्या युगापासूनच मानवसृष्टी ला गणेश पूजेचे महत्त्व पटवून दिले होते. ह्या ऋषींकडूनच पृथ्वीच्या गर्भातून अंकारक नामक, जास्वंदी वृक्षाच्या सानिध्यात रक्तवर्णीय भौमपुत्र जन्माला आला होता जो सात वर्षांचा झाल्यावर पृथ्वीनं त्याला पुन्हा भरद्वाज ऋषींच्या स्वाधीन केले होते. ऋषींनी त्याचे उपनयन केले, वेद शिकविले आणि गणेशमंत्र देऊन उपासना करायला सांगितलं. त्यानंतर हा मुलगा अरण्यात गेला. त्यानं एक सहस्त्र वर्षे तप करून गणेशाला प्रसन्न करून घेतले. आणि हाच तो दिवस होता मंगळवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीचा. “स्वर्गात राहून अमृतप्राशन करायचा आणि त्रैलोक्यात विख्यात व्हायाचे वरदान ” त्यानं प्रसन्न झालेल्या श्रीगणेशा कडे मागितीला. (Top Marathi News)
========
Shravan : आजचा दुसरा श्रावणी सोमवार, आज कोणती शिवामूठ वाहणार?
========
यावर गणेशानं सुद्धा आपल्या परम भक्ताला हे वरदान दिले की, “ह्यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवार ची संकष्टी चतुर्थी ही तुझ्याच अंकारीका ह्या नांवाने ओळखली जाऊन संबंधित उपासकास २१ संकष्टी केल्याची फलप्राप्ती ह्या चतुर्थीमुळे मिळेल. आणि तुझ्या ह्या सहस्र वर्षाच्या तपश्चर्येचे पुण्य युगानुयुगे त्यांच्यातही वाटले जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील. ते ऋणमुक्त होतील”. “अशाप्रकारे त्रैलोक्यात तू सुविख्यात होशील आणि तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम, अकारका सारखा लाल आहेस म्हणून अंकाकर व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगळ ह्या नांवे तुला ब्रम्हांडातल्या आकाशात ग्रहांमध्ये स्थान मिळेल व तू सदैव अमृत पान करशील”. (Top Stories)
त्यामुळेच गणेशाच्या ह्या वरदानामुळे तेंव्हा पासून अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले. म्हणूनच ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्टी चतुर्थी चे व्रत/उपवास करणे जमत नसल्यास अशांनी अंगारकी मात्र न विसरता व न चुकता आवर्जून करावी की ज्यामुळे २१संकष्टी केल्याची फलश्रुती नक्कीच लाभणार असे वेदवचन ही दिले गेले आहे. (Social News)
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कोणताही दावा करीत नाही आणि अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics