एका वर्षात २४ एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशी ही वेगळी आणि अनेक कारणासाठी महत्वाची असते. एकादशी ही तिथी भगवान विष्णूंना समर्पित असते. यादिवशी भगवान विष्णूची षोडोपचारे पूजा केली जाते आणि संपूर्ण दिवस उपवास केला जातो. या दिवशी पूजा केल्याने व्यक्तीला शुभ फळ मिळतात, आणि एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे. आता लवकरच एकादशीची तिथी येत आहे. श्रावणात येणाऱ्या एकादशीला विशेष महत्व असते. या एकादशीला पुत्रदा एकादशी नावाने ओळखले जाते. या एकादशीचे व्रत वर्षातून दोनदा पाळले जाते. पहिले श्रावण महिन्यात आणि दुसरे पौष महिन्यात. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी साजरी केली जाते. या एकादशीला पवित्रोपण आणि पवित्र एकादशी असेही म्हटले जाते. (Putrada Ekadshi)
पंचांगानुसार, यंदा श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी अर्थात पुत्रदा एकादशीची तिथी सोमवार, ४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजून ४१ मिनिटांनी सुरु होणार असून, या तिथीची समाप्ती मंगळवार, ५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजून १२ मिनिटांनी होणार आहे. उदयतिथीनुसार किंवा उगवत्या सूर्याने पाहिलेल्या तिथीनुसार पुत्रदा एकादशीचे व्रत हे मंगळवार, ५ ऑगस्ट रोजी पाळले जाणार आहे. या पुत्रदा एकादशीला रवी आणि भाद्रवास योगाचा शुभ संयोग असणार आहे. रवी योगात लक्ष्मी नारायणाची पूजा केल्याने निरोगी आयुष्याचे आशीर्वाद मिळतील. यासोबतच व्यक्तीच्या आनंद आणि सौभाग्यात अपार वाढ होईल. (Marathi News)
ज्यांना संतती हवी आहे त्यांनी पुत्रदा एकादशीचे व्रत अवश्य करावे. असे मानले जाते की हे व्रत केल्यास भगवान विष्णूच्या विशेष कृपेने चांगले अपत्य प्राप्त होते. याशिवाय भगवान विष्णूंचा आशीर्वादही कायम राहतो. या दिवशी पती- पत्नी दोघांनी मिळून विष्णू देवाची पूजा करावी. पुत्रदा एकादशीला उपवास करुन मनोभावे पूजा केल्याने आयुष्यातील अनेक संकटे दूर होतात तसेच संतान प्राप्तीचे सुख मिळते. ही एकादशी श्रावण महिन्यात येते. या काळात भगवान विष्णू निद्रावस्थेत असतात. या दिवशी विधीनुसार भगवान विष्णुची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. (Todays Marathi Headline)
पुत्रदा एकादशीचे व्रत कसे करावे?
या एकादशीच्या व्रताची सुरुवात ही दशमी तिथीपासूनच अर्थात एकादशीच्या एक दिवस आधीपासूनच होते. उपवासाच्या एक दिवस आधी सात्विक अन्न जेवावे. एकादशीच्या दिवशी पहाटे लवकर उठून आंघोळ करावी, स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत, त्यानंतर मंदिरात दिवा लावून व्रत करण्याचा संकल्प घ्यावा. पूजेमध्ये धूप, दिवा, फुलांच्या माळा, अक्षता आणि नैवेद्य यासह १६ वस्तू देवाला अर्पण करा. पूजेत भगवान विष्णूला तुळस अर्पण करावी. यानंतर पुत्रदा एकादशीची व्रत कथा वाचून आरती करावी. (Shravan News)
एकादशीच्या दिवशी दीपदानाला खास महत्व असते. या दिवशी भगवान विष्णूचे नामस्मरण करून पवित्र नदी, तलावात दीपदान करावे किंवा तुळशी, पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावण्याचेही एकादशीला महत्त्व आहे. दिवे दान करण्यासाठी पिठाचे छोटे दिवे बनवले जातात. तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावून तो पिंपळाच्या किंवा वडाच्या पानावर ठेवून नदीत दिवा सोडावा. तसेच आपल्या क्षमतेनुसार गरजूंना दान करावे. (Top Stories)
पुत्रदा एकादशीच्या दिवशी काय करू नये
ज्यांनी पुत्रदा एकादशीचे व्रत केले आहे त्यांनी लसूण, कांदा विरहित अन्न जेवावे. मनाने आणि शब्दाने ब्रह्मचर्य पाळावे. दशमीपासून द्वादशीपर्यंत भगवान विष्णूचे ध्यान करावे. ज्यांनी या दिवशी उपास केला नाही अशा लोकांनी देखील एकादशीला तामसिक अन्न घेऊन नये. खोटे बोलणे, अनैतिक कृत्ये करणे, राग-लोभ इत्यादी गोष्टींपासून लांब राहावे. एकादशीच्या दिवशी वैष्णव धर्माचे पालन करावे लागते, त्यामुळे वांगी, सुपारी, मांस-दारू इत्यादी गोष्टींपासून दूर राहा. (Social News)
पुत्रदा एकादशी कथा १
पुराणकाळात महिष्मतीपुरी नावाचा एक शांतीप्रिय, धर्मप्रिय असा एक राजा था. मात्र त्याला स्वत:च मूल नव्हतं. मग त्याच्या शुभचिंतकांनी एक लोमेश ऋषीला याचे कारण विचारले असता, त्यांनी सांगितले की, मागच्या जन्मी महिष्मतीपुरी राजा हा एक अत्याचारी, निर्दयी असा राजा होता.
मागच्या जन्मी याच एकादशी दिवशी तहानलेला हा राजा पाणी पिण्यासाठी एक जलाशयाजवळ पोहोचला. तेव्हा तिथे नुकतीच बाळंतिण झालेली गाय पाणी पिण्यासाठी आली होती. मात्र राजाने तिला तेथून हटकले. त्याच्या ह्या दुष्कर्मामुळे तो याजन्मी पिता बनू शकणार नाही. त्यामुळे जर त्याला या शापातून मुक्त करायचे असेल तर, तुम्हाला हे व्रत करावे लागेल आणि त्याचे पुण्य तुमच्या राजाला द्यावे लागेल. तरच त्यांनी संततीप्राप्ती होईल. या ऋषीमुनींच्या निर्देशानुसार, प्रजासह राजानेसुद्धा हे व्रत केले. त्यानंतर काही काळानंतर राणीने एक गोंडस बाळाला जन्म दिला. तेव्हापासून एकादशीला श्रावण पुत्रदा एकादशीचे व्रत केले जाते. (Top Marathi HEadline)
पुत्रदा एकादशी व्रत कथा २
युद्धिष्ठर म्हणाला हे परमेश्वरा! पुत्रदा एकादशीचे व्रत कशासाठी केले जाते. विधी काय याबद्दल सांगावे. श्रीकृष्ण म्हणाले हे राजन! श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी असे म्हटले जाते. या दिनी विष्णूसह लक्ष्मीची पूजा केली जाते. या संपूर्ण संसारात पुत्रदा एकादशीच्या व्रताशिवाय श्रेष्ठ असे व्रत नाही. या दिवशी व्रत केल्याने मनुष्याला पुण्य लाभते. तसेच तो विद्वान आणि धनवान होतो. हे व्रत का केले जाते जाणून घेऊया (Latest Marathi News)
भद्रावती नावाच्या नगरीत सुकेतुमान नामक राजा राज्य करत होतो. त्याला संतान प्राप्ती नव्हती. त्याच्या पत्नीचे नाव शैव्या असे होते. तिला संतान नसल्यामुळे ती नेहमी दु:खी असायची. राजाकडे अफाट संपत्ती होती. धन, हत्ती, घोडे, धान्य सगळं होते परंतु राजाला कुठल्याच गोष्टीत समाधान प्राप्त होत नव्हते. मी गेल्यानंतर माझ्या राज्याचा सांभाळ कोण करेल, माझे पिंडदान कोण करेल या विचारात राजा नेहमी असायचा. मुलगा नसल्यामुळे आपण आपल्या पूर्वजांचे आणि देवाचे ऋण कसे फेडायचे याचा विचार राजा करायचा. आपल्याला संतान व्हायला हवी असे राजाला नेहमी वाटायचे. त्यासाठी काही तरी प्रयत्न करायला हवे असे राजाला सारखे वाटत. याविचारात राजा नेहमीच असायचा. (Trending News)
राजाने या विचारापोटी आत्मदहन करण्याचा निश्चय केला. परंतु, आत्महत्या करणे हे पाप असल्यामुळे त्याने त्याचा विचार मागे घेतला. एके दिवशी राजा घोड्यावर बसून जंगलात निघून गेला व तेथील झाडा-फुलाना न्याहाळू लागला. जंगलात त्यावेळी मोर, वाघ, सिंह, माकड, साप आदी मुक्तसंचार करत होते. हत्ती त्याच्या पिल्लासह फिरत होता. राजाला जंगलात येऊन बराच कालावाधी होऊन देखील घरी परत जाण्याचे नाव घेत नव्हता. जंगलातील दृश्य पाहून तो विचार करत होता- ‘मी आजपर्यंत यज्ञ केले, ब्राम्हण देवताला भोजन करून तृप्त केले तरी ही माझ्या वाट्याला दु:खच का आले असावे?’ (Top Marathi News)
विचारात मग्न असलेल्या राजाला पाण्याची तहान लागली. राजा इकडे-तिकडे पाण्याचा शोध घेऊ लागला. थोड्याच अंतरावर राजाला एक एक सरोवर दिसले. त्या सरोवरात सुंदर कमळ उमलले होते. हंस व मगर विहार करत होते. सरोवराच्या चहुबाजुंनी ऋषींचा आश्रम होता. त्याच वेळी राजाचा उजवा डोळा फडफडायला लागला. राजाला शुभशकुन प्राप्त होणार असल्याची जाणीव झाल्याने तो घोड्यावरून उतरून ऋषीमुनींना नतमस्तक होऊन त्यांच्यासमोर विराजमान झाला. ज्या व्यक्तीने पुत्रमुख पाहिले आहे, तो धन्य आहे. अशा व्यक्तीला पृथ्वीलोकात यश व परलोकात शांती लाभत असते. पुर्वजन्माच्या पुण्याईने व्यक्तीला पुत्र, धनप्राप्ती होत असते. (Latest Marathi HEadline)
========
हे देखील वाचा : Grishneshwar Temple : घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे महात्म्य !
Temple : रक्षाबंधनाच्याच दिवशी उघडणारे वंशीनारायण मंदिर
========
राजाला पाहाताच ऋषीचे म्हटले – ‘हे राजन! आम्ही आपल्यावर अत्यंत प्रसन्न झालो आहोत. आपल्या मनात येईल ती इच्छा तुम्ही मागा. हे ऐकताच राजाने त्यांना विचारले. महाराज आपण कोण आहात, येथे येण्यामागचा तुमचा उद्देश काय? ऋषीमुनींनी सांगितले हे राजन आज संतान देणारी पुत्रदा एकादशी आहे. आम्ही विश्वदेव असून या सरोवरात स्नान करण्यात आलो आहे. ऋषींचे शब्द ऐकून राजा म्हणाला ‘ऋषीदेवता मला संतान नाही, माझ्यावर कृपा करा, मला पुत्रप्राप्तीचे वरदान द्या.’ (Top Marathi Stories)
ऋषीमुनी म्हणाले -‘हे राजन! आज पुत्रदा एकादशी आहे. हे व्रत आपण अवश्य करावे. भगवंताच्या कृपेने आपल्याला लवकरच संतान सुख मिळेल. ऋषीमुनींचे वाक्य ऐकून राजाने त्या दिवशी एकादशीचे व्रत केले व द्वादशीला या व्रताचे उद्यापन केले. ऋषीमुनींना दंडवत करून राजा महलात परतला. काही दिवसातच राणीला दिवस गेले. नऊ महिन्यानंतर राजाच्या घरी मुलाने जन्म घेतला. (Social Updates)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics