सध्या पवित्र असा श्रावण महिना सुरु आहे. श्रावण महिना महादेवाच्या उपासनेचा काळ. या संपूर्ण महिन्यात शंकराची भक्ती केल्याने, पूजा केल्याने मोठे लाभ मिळतात. सृष्टीचे संहारक म्हणून महादेवाची ओळख आहे. मात्र आषाढी एकादशीनंतर निद्रिस्त झालेल्या सृष्टीचे पालक असलेल्या भगवान विष्णूंच्या जागी महादेव या जगाचे पालकत्व स्वीकारतात आणि चार महिने सृष्टीला चालवतात. शिवाची भक्ती केल्याने मनुष्याच्या पापांचे क्षालन होते, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्याला उत्तम आरोग्य लाभते. त्यामुळे श्रावणात इतर सणांसोबतच शिवाची पूजा करणे अनिवार्य असते. (Shravan NEws)
जेव्हा जेव्हा आपण भगवान शंकराचे स्मरण करतो, तेव्हा तेव्हा आपल्या डोळ्यासमोर गळ्यात सर्प, डोक्यावर जटा आणि चंद्र, कपाळावर तिसरा डोळा, वल्कले परिधान केलेली, संपूर्ण अंगाला भस्म असलेली एक आकृती उभी राहते. या सर्व गोष्टी देवाची ओळख आहे, आणि यांच्याशिवाय भोलेनाथ देखील अपूर्ण आहेत. मात्र तुम्हाला माहित आहे का, की या सर्व गोष्टी शिवाकडे असण्याला देखील एक खास कारण आहे. प्रत्येक गोष्टीमागे एक कारण, इतिहास दडला आहे. भगवान शिवाला आपण कधीच त्रिशूल शिवाय पाहिलेले नाही. त्यांच्या हातात कायम त्रिशूल असतो, जर मंदिरात शिवलिंग असेल तर त्याच्या जवळ त्रिशूल लावलेला असतोच. या त्रिशूल शिवाय देव अपूर्ण आहे. मात्र शिवाकडे त्रिशूल असण्यामागे नक्की काय कारण आहे? का महादेव कायम स्वतःकडे त्रिशूल बाळगता? चला जाणून घेऊया याच त्रिशूळाची कहाणी. (Marathi News)
त्रिशूळ हे भगवान शिवाचे प्रमुख अस्त्र आहे. त्रिशूळाकडे पाहा… तीन तीक्ष्ण टोक दिसतात. तसे पाहिले तर हे अस्त्र संहाराचे प्रतीक आहे. परंतु वास्तवात त्रिशूलामागे फार मोठा गूढ अर्थ दडला आहे. शिवपुराणाच्या मान्यतेनुसार संपूर्ण सृष्टीच्या प्रारंभाच्या वेळी भगवान शिव ब्रह्मनादातून प्रकट झाले होते. त्यांच्याबरोबर रज, तम आणि सत् गुण ही तीन गुणेही प्रकट झाली, या तीन गुणांच्या संयोगाने शिव शूल बनला, ज्याने त्रिशूळ निर्माण केला. तर विष्णु पुराणात विश्वकर्माने सूर्याच्या भागातून त्रिशूळ तयार केला होता असा उल्लेख आहे. (Todays Marathi Headline)
असे मानले जाते की रज, तम आणि सत् गुण यांच्यातील संतुलनाशिवाय सृष्टी कार्य करू शकली नसती. हे तीन गुण त्रिशूलामध्ये समाविष्ट आहेत अशी मान्यता आहे. यासोबतच महादेवाच्या त्रिशूळाचाही तीन कालखंडाशी संबंध असल्याचे दिसून येते. हे भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ यांचे प्रतीक देखील आहे. (Marathi Trending NEws)
त्रिशुळाची उत्पत्ती कशी झाली?
असे म्हटले जाते की त्रिशूल हे भगवान शिवाच्या शक्तीचे प्रतीक आहे. वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी शंकर कायम हा त्रिशूल एक शस्त्र म्हणून आपल्यासोबत ठेवतात. समुद्रमंथनादरम्यान भगवान शिवाला भगवान विष्णूकडून त्रिशूळ भेट म्हणून मिळाले असल्याचे सांगितले जाते. तर काही पौराणिक कथांमध्ये असेही सांगितले जाते की भगवान शिवाला देवी दुर्गाकडून त्रिशूळ मिळाला आहे. त्रिनेत्र, त्रिपुंड्र असलेल्या शिवाला तीन पानांचा बेल वाहिला जातो त्याचप्रमाणे त्रिशुळाची तीन टोके शंकराला त्रिकालज्ञानी बनवतात. त्रिशुळ म्हणजे फक्त तीन पाती नाहीत तर ते एक शिवशक्तीच्या ऊर्जेचे प्रतिक आहे. (Marathi Latest News)
विष्णुपुराणांमध्ये त्रिशुळाबद्दल काय सांगितले आहे?
विष्णुपुराणानुसार विश्वकर्मा यांनी त्रिशुळाची निर्मिती केली असल्याचे सांगितले जाते. याबद्दल एक पौराणिक कथा देखील प्रचलित आहे. देवतांचे शिल्पकार विश्वकर्मा यांची कन्या संजनाचा विवाह सूर्य देवासोबत झाला होता. मात्र सुर्यदेवाच्या अफाट तेजामुळे संजनाला त्यांच्याबरोबर राहणे शक्य होत नव्हते. म्हणून काही काळानंतर तिने आपली छाया सूर्यदेव आणि पुत्रांजवळ सोडली आणि ती निघून गेली. जेव्हा सूर्य देव आणि विश्वकर्मा यांना याबद्दल समजले तेव्हा त्या दोघांनी मिळून यावर काय उपाय करता येईल याचा विचार केला. (Top Marathi News)
========
हे देखील वाचा :
Nagpanchami : नागपंचमीच्या दिवशी ‘हे’ उपाय करा आणि कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवा
Shravan : श्रावणातल्या रविवारी करा आदित्यराणूबाईचे व्रत
=========
तेव्हा विश्वकर्मा यांनी सूर्यदेवाला घासले आणि त्याचे तेज कमी केले जेणेकरून संजना विना कष्ट त्याच्याबरोबर राहू शकेल. सूर्यदेवाला घासून काढलेल्या तेजापासून विश्वकर्म्याने सुदर्शन चक्र, त्रिशूळ अशी दैवी शस्त्र तयार केली. पुढे त्यांनी सुदर्शन चक्र भगवान विष्णूला तर त्रिशूळ भगवान महादेवांना भेट दिले. त्रिशुळातील तीन टोक या तीन प्रवृत्तींचे प्रतिनिधीत्व करतात. त्रिशुळाची तीन टोके म्हणजे तीन शक्ती आहेत. ब्रह्मांडाचा विचार केला तर ब्रह्मा, विष्णू, महेश असे समजावे. प्रकृतीच्या दृष्टीने विचार केला तर निर्माण, जीवन आणि विनाश आहे. स्वर्गलोक, भूलोक आणि पाताळलोक असे त्रिलोक सांगितले जातात. (Social Updates)