श्रावण महिना म्हणजे नुसता आनंद, उत्साह आणि जल्लोष. व्रतवैकल्यांचा महिना असलेल्या या महिन्यात अतिशय वेगवेगळे आणि आकर्षण सणवार, व्रत साजरी केली जातात. श्रावणातील सर्वात जास्त लोकप्रिय आणि प्रसिद्ध असणारे व्रत म्हणजे मंगळागौर. श्रावणातल्या प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीची पूजा केली जाते आणि अखंड सौभाग्याची मागणी यात करतात. जसे महत्व श्रावणातल्या सोमवाराला आहे, तसेच महत्व श्रावणातल्या मंगळागौरीला देखील आहे. नवविवाहित महिला हे व्रत करतात. व्रत झाल्यानंतर मंगळागौरीचे खेळ खेळण्याची प्रथा देखील खूपच लोकप्रिय आहे. (Mangalagaur Pooja)
आजच्या आधुनिक काळात देखील आपल्या जुन्या परंपरा, जुन्या पद्धती, जुने सणवार थोड्या वेगळ्या पद्धतीने का असेना साजरे केले जात आहे. ही खूपच चांगली गोष्ट आहे. उद्या अर्थात २९ जुलै रोजी श्रावणातला पहिला मंगळवार येत आहे. म्हणजेच उद्या पहिली मंगळागौर साजरी केली जाईल. दुसरी मंगळागौर ५ ऑगस्ट २०२५, तिसरी मंगळागौर १२ ऑगस्ट २०२५, चौथी मंगळागौर १९ ऑगस्ट २०२५ साजरी केली जाणार आहे.जाणून घेऊया या सणाबद्दल आणि याच्या महत्वाबद्दल. (Marathi)
श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित स्त्रीने पहिली पाच वर्षे पूजण्याचा सण आहे. लग्नाला पाच वर्षे पूर्ण होईपर्यंत प्रत्येक श्रावणातील मंगळावारी मंगळागौरीची पूजा करण्यात येते. नवविवाहित आणि सौभाग्यवती महिलांना बोलावून हा सण साजरा करण्यात येतो आणि पूजा झाल्यावर रात्री जागरण करण्यात येते. पतीपत्नी मधील आत्यंतिक प्रेम व निष्ठेचा आदर्श म्हणून शिवपार्वती या दांपत्याकडे पाहिले जाते. त्यांचा आशिर्वाद असावा त्यांची कृपादृष्टी असावी या हेतूने ही पूजा केली जाते. (Marathi News)
नवविवाहित महिला सकाळी स्नान करून स्वच्छ साडी नेसून पूजा करण्यासाठी बसतात. काही ठिकाणी जर ल्गनांतर पहिलीच मंगळागौर असेल तर जोडीने पूजेला बसले जातात. गुरुजींना बोलावून मंगळागौरीची अगदी षोडशोपचारे पूजा करण्यात येते. मंगळागौर अर्थात पार्वती आणि शेजारी महादेवाची पिंडही या पूजेमध्ये ठेवली जाते. पूजा झाल्यावर पुरणाच्या दिव्यांनी मंगळागौरीची आरती करण्यात येते. यानंतर एकत्र बसून सर्वजणी मंगळागौरीची कहाणी ऐकतात. त्यानंतर जेवण करून सवाष्णींना वाण दिले जाते. पूजेनंतर रात्री जागरण करण्यात येते. जागरणाच्या वेळी मंगळागौरीला विविध खेळ खेळले जातात. (Marathi Latest HEadline)
=========
हे देखील वाचा : Nagpanchami : श्रावण महिन्याच्या पंचमी तिथीला साजरी होणारी ‘नागपंचमी’
Shravan : श्रावणातला पहिला सोमवार महादेवाला अर्पण करा ‘ही’ शिवामूठ
=========
मंगळागौरची पूजा करताना वेगवेगळ्या झाडांच्या पत्री आणि फुले वापरले जातात. यात १६ प्रकराच्या पत्री असतात. या व्रतासाठी बेल, मोगरा, माका, धोत्रा, चाफा, बोर, दूर्वा, आघाडा, कण्हेर, जाई, डाळींब, शमी, तुळस, रुई, बकुळ, अशोक या वृक्षाची पाने व्हावी. या पूजेनंतर पुरणाचे किंवा पिठाच्या दिव्यांनी आरती केली जाते. तसेच रात्री जागरण करुन काडवाती पेटवून आरती म्हटली जाते. मंगळागौरीच्या व्रताचे उद्यापन हे पाच वर्षानंतर करण्यात येते. लग्न झाल्यापासून पाचव्या वर्षी श्रावणातील शेवटच्या मंगळवारी या व्रताचे उद्यापन करण्यात येते. आजच्या काळात अनेक महिला पाहिल्याचवर्षी या व्रताचे उद्यापन करतात. या उद्यापनाच्या वेळी आई – वडिलांना हे वाण देण्यात येते. (Todays Marathi Headline)
मंगळागौरीची कथा
आटपाट नगर होतं. तिथं एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई. अल्लख म्हणून पुकार करी. वाण्याची बायको भिक्षा आणी. “निपुत्रिकाच्या हातची भिक्षा आम्ही घेत नाही,” असें म्हणून तो चालता झाला. ही गोष्ट तिनं नवर्याला सांगितली. त्यानं तिला युक्ति सांगितली. “दाराच्या मागे लपून बस, अल्लख असे म्हणतांच सुवर्णाची भिक्षा घाल.” अशी भिक्षा झोळीत घातली. बोवाचा नेम मोडला. बाईवर फार रागावला. मूलबाळ होणार नाहीं असा शाप दिला. तिनं त्याचे पाय धरले. बोवांनी उःशाप दिला. बोवा म्हणालें, “आपल्या नवर्याला सांग. निळ्या घोड्यावर बस. निळा वस्त्रं परिधान कर. रानांत जा. जिथं घोडा अडेल तिथं खण. देवीचं देऊळ लागेल, तिची प्रार्थना कर. ती तुला हवा तसा पुत्र देईल.” असं बोलून तो बुवा निघून गेला. तिने आपल्या पतीला सांगितलं. (Shravan News)
वाणी रानांत गेला. घोडा अडला, तिथं खणल. देवीचं देऊळ लागलं. सुवर्णाचं देऊळ आहे. हिरेजडिताचे खांब आहेत. माणकांचे कळस आहेत. आंत देवीची मूर्ती आहे. मनोभावें पूजा केली. त्याला देवी प्रसन्न झाली, “वर माग” म्हणाली. “माझ्याकडे घरेदारे, गुरेढोरे, धन द्रव्य सर्व काही आहे; मात्र पोटी पुत्र नाहीं, म्हणून मी दुःखी आहे.” देवी तिला म्हणाली, “तुला संततीचं अर्थात पुत्र सुख नाही, मात्र मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे तर तुला वर देते. अल्पायुषी पुत्र मागितलास तर गुणी मिळेल, दीर्घायुषी मागितलास तर जन्माध होईल. कन्या घेतलीस तर बालविधवा होईल. जशी इच्छा तुझी असेल ते मागून घे.” त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला. देवीनं “माझ्या मागच्या बाजूस जा. तिथं एक गणपती आहे. त्याच्यामागं आंब्याचं झाड आहे. (Marathi Headline)
गणपतीच्या दोंदावर पाय दे, एक फळ घे, घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल.” असं सांगितलं. नंतर देवी अदृश्य झाली. वाणी देवळामागं गेला, गणपतीच्या बेंबीवर पाय दिला, झाडावर चढला; पोटभर आंबे खाल्ले; भरपूर घरी नेण्याकरितां घेतले. खाली उतरून त्याने पाहिले तर मोटेत आंबा एकच आहे. असं चार ते पाच वेळा घडलं. गणपतीला त्रास झाला. त्यानं सांगितलं, “तुझ्या नशिबीं एकच फळ आहे.” फळ घेऊन घरी आला, बायकोला खाऊ घातलं, ती गरोदर राहिली. तिच्या पोटी गर्भ वाढू लागला. नवमास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली. मुलगा झाला. (Marathi Top Headline)
उभयतांना मोठा आनंद झाला. दिवसामासां वाढूं लागला. आठव्या वर्षी मुंज केली. दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली. काशीयात्रेशिवाय लग्न करणं नाहीं असा माझा नवस आहे. असा जबाब दिला. काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविलं. मामाभाचे काशीला जाऊ लागले. जातां जातां काय झालं? वाटेनं एक नगर लागलं. तिथं काही मुली खेळत होत्या. त्यांत एकमेकीचं भांडण लागलं. त्यामध्ये होती एक सुंदर गोरी मुलगी होती, तिला दुसरी मुलगी म्हणाली, “काय द्वाड रांड आहे! काय द्वाड रांड आहे! तेव्हा ती गोरी मुलगी म्हणाली, ‘माझी आई मंगळागौरीचं व्रत करते, आमच्या कुळवंशामध्ये कोणीच रांड होऊ शकत नाही. (Top Marathi News)
मी तर तिची मुलगी आहे, मग मी कशी होईन.” हे भाषण त्याच्या मामानं ऐकलं आणि त्याच्या मनांत आलं हिच्याशी आपल्या भाच्याचे लग्न लावून द्यावे, म्हणजे तो दीर्घायुषी होईल. पण हे नक्की कसं घडवून आणायचं ? त्याच दिवशीं तिथं त्यांनीं मुक्काम केला. इकडे काय झालं ? त्याच दिवशीं त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाचे वेळेस नवरा मुलगा आजारी झाला. मुलाच्या आईबापांना पंचाईत पडली. पुढे जर कोणी प्रवासी मिळाला तर बरं होईल, त्याला आपण पुढे करू आणि वेळ साजरी करूं, म्हणून धर्मशाळा शोधू लागले. तर त्यांच्या मामाभाचे दृष्टीस पडले. मामापासून भाच्याला नेलं. गोरज लग्न लाविलं. (Marathi Trending News)
उभयतांना गौरीहरापाशी निजवलं. दोघं झोंपी गेली. मुलीला देवीनं दृष्टांत दिला. “अग अग मुली, तुझ्या नवर्याला दंश करायला सर्प येईल, त्याला पिण्याकरितां दूध ठेव. एक कोरा करा जवळ ठेव. दूध पिऊन सर्प क-यात शिरेल. आंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक. सकाळी उठून आईला ते वाण दे.” तिनं सर्व तयारी केली. दृष्टांताप्रमाणं घडून आलं. कांही वेळानं तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणूं लागला. लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली. पहाटेस उठून ताट घेऊन बि-हाडी गेला. मामाभाचे मार्गस्थ झाले. दुसरे दिवशीं काय झालं? हिनं सकाळीं उठून स्नान केलं, आपल्या आईला वाण दिलं. (Marathi Latest News)
आईने ते उघडून पाहू लागली, त्यामध्ये हार निघाला. आईनं कन्येच्या गळ्यांत हार घातला. पुढं पहिला वर मंडपात आला. मुलीला खेळयला आणलं. ती म्हणाली, “हा माझा नवरा नाहीं. मी त्याचे बरोबर खेळत नाही.” रात्रीची लाडवांची व आंगठीची खूण कांहीं पटेना. आईबापांना पंचाईत पडली. हिचा नवरा कसा सापडतो ? नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय आंगठी घालून मुलीनं धुवावे, आईनं पाणी घालावं, भावानं गंध लावावं, आणि बापानं विडा द्यावा, असा क्रम चालू केला, शेंकडो लोक येऊन जेवूं लागले. (Top Stories)
इकडे मामाभाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केला. तीर्थयात्रा केल्या. ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्याला मूर्च्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौर आडवी झाली. त्या दोघांचं युद्ध झालं. यमदूत पळून गेले. गौर तिथं अदृश्य झाली. भाचा अचानक जागा झाला, त्यावेळी त्याने आपल्या मामाला सांगितले की, “मला अशा प्रकारचं स्वप्न पडलं.” मामा त्याला म्हणाला, “आता हे ठीक झालं. तुझावरचं विघ्न टळलं. उद्यां आपण घरी जाऊ.” परत येऊ लागले. लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. (Top Marathi Stories)
दासींनीं येऊन सांगितलं. “इथं अन्नछत्र आहे तिथं जेवायला जा.” ते म्हणाले, “आम्ही परान्न घेत नाही.” दासींनीं यजमानणीस सांगितलं. त्यांनी पालखी पाठवली. आदरातिथ्यानं घरी नेलं. पाय धुतांना मुलीनं नवर्याला ओळखलं. नव-यानं अंगठी ओळखली. आईबापांनीं विचारलं. “तुझ्याजवळ खूण काय आहे?” त्यांनं लाडवांचं ताट दाखवलं. सर्वांना आनंद झाला. भोजनसमारंभ झाला. मामाभाचे सून घेऊन घरीं आले. सासूनं सुनेचे पाय धरले. “तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला,” असं म्हणाली. तिनं सांगितलं. “मला मंगळागौरीचं व्रत असता. ही सगळी तिचीच कृपा.” सासर आणि माहेरची सर्व माणसं एकत्र आली आणि त्यांनी व्रताचं उद्यापन केलं. जशी मंगळागौरी देवी तिच्यावर प्रसन्न झाली, तशी ती तुम्हांला आम्हांवर होवो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो, हीच देवाची प्रार्थना करा. अशी धर्मराजाला श्रीकृष्णानं सांगितलेली ही कथा साठां उत्तरांची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. (Social Updates)
=========
हे देखील वाचा : Shravan : महादेवाच्या पूजेतील बेलपत्राचे महत्व
=========
मंगळागौरीची आरती
जय देवी मंगळागौरी। ओंवाळीन सोनियाताटीं।। रत्नांचे दिवे। माणिकांच्या वाती। हिरेया ज्योती।।धृ।।
मंगळमूर्ती उपजली कार्या। प्रसन्न झाली अल्पायुषी राया।। तिष्ठली राज्यबाळी । अयोषण द्यावया। ।1।।
पूजेला ग आणिती जाईजुईच्या कळ्या । सोळा तिकटीं सोळा दूर्वा।।
सोळा परींची पत्री । जाई जुई आबुल्या शेवंती नागचांफे।।
पारिजातकें मनोहरें । नंदेटें तगरें । पूजेला ग आणिली।।2।।
साळीचे तांदुळ मुगाची डाळ। आळणीं खिचडी रांधिती नारी।।
आपुल्या पतीलागीं सेवा करिती फार ।।3।।
डुमडुमें डुमडुमें वाजंत्री वाजती। कळावी कांगणें गौरीला शोभती।।
शोभली बाजुबंद। कानीं कापांचे गवे। ल्यायिली अंबा शोभे।।4।।
न्हाउनी माखुनी मौनी बैसली। पाटाबाची चोळी क्षीरोदक नेसली।।स्वच्छ बहुत होउनी अंबा पुजूं लागली ।।5।।
सोनिया ताटीं घातिल्या पंचारती। मध्यें उजळती कापुराच्या वाती।।
करा धूप दीप। आतां नैवेद्य षड्रस पक्वानें । तटीं भरा बोनें ।।6।।
लवलाहें तिघें काशीसी निघाली। माउली मंगळागौर भिजवूं विसरली।।
मागुती परतुनीयां आली। अंबा स्वयंभू देखिली।।देउळ सोनियाचे । खांब हिरेयांचे। कळस वरती मोतियांचा ।।7।।
(टीप : वरील सर्व बाबी माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.)