Home » Shravan : श्रावण महिना कधीपासून सुरु होतोय? पहिला श्रावणी सोमवार कधी?

Shravan : श्रावण महिना कधीपासून सुरु होतोय? पहिला श्रावणी सोमवार कधी?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Shravan
Share

मराठी महिन्यातील पाचवा आणि अतिशय महत्वाचा असा श्रावण महिना लवकरच सुरु होत आहे. अतिशय पवित्र आणि धार्मिक महत्व असलेल्या या महिन्याची वर्षभर लोकं वाट बघतात. श्रावणात आठवड्यातील प्रत्येक दिवसाला एक खास महत्व असते. श्रावण महिना सुरु झाला की सणांची रेलचेल सुरु होतो. एकापाठोपाठ एक सर्व सण सुरु होतात. अतिशय पवित्र आणि प्रसन्न वातावरण श्रावणात पाहायला मिळते. महादेवाला समर्पित असलेल्या या महिन्यात अनेक मोठे सण सुद्धा साजरे केले जातात. (Shravan News)

आषाढ महिना सुरु झाला की प्रत्येक घरामध्ये श्रावणाची तयारी सुरु होते. श्रावण अतिशय पवित्र महिना असल्याने या महिन्यात अनेक पूजा आणि विविध प्रकारचे धार्मिक विधी घरांमध्ये सहज होताना दिसतात. सगळीकडे सध्या श्रावण महिना सुरु असल्यामुळे लगबग पाहायला मिळत आहे. महादेवाच्या मंदिरांमध्ये सफाई, रंगरंगोटी चालू आहे. घरांमध्ये देखील या महिन्यात कोणते धार्मिक विधी करायचे, यावर चर्चा चालू असतील. मात्र हा श्रावण महिना नक्की सुरु कधी होतोय? चला जाणून घेऊया. (Marathi News)

२०२५ या वर्षातला श्रावण महिना येत्या २५ जुलैपासून सुरु होणार आहे. २५ जुलै श्रावण शुक्ल प्रदिपदेपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. तर, २३ ऑगस्ट २०२५ ला श्रावण अमावस्येला या तिथीची समाप्ती होणार आहे. गुरुवार २४ जुलै रोजी दीप अमावस्या असेल आणि त्यानंतर लगेच २५ तारखेपासून श्रावण महिना सुरु होईल. (Todays Marathi Headline)

Shravan

श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असून, या महिन्यात उपवास, पूजा आणि धार्मिक कार्यांना खास महत्त्व असते. महाराष्ट्रात मराठी पंचांगानुसार आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्येनंतर हा श्रावण सुरु होणार आहे. दरम्यान उत्तर भारतात श्रावण महिना लवकर सुरू होतो. उत्तरेत श्रावण सुरु झाल्यानंतर साधारणपणे १५ दिवसांनी महाराष्ट्रात तो सुरू होतो. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, झारखंडसह उत्तर आणि पूर्व भारतात श्रावण महिना आधीच सुरू झाला आहे. (Latest Marathi News)

========

हे देखील वाचा : Sharavan : श्रावणात मांसाहार का करत नाही?

========
जसे की श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित आहे, त्यानुसार या महिन्यातील सोमवाराला अनन्यसाधारण महत्व असते. सोमवार हा महादेवाचा वार म्हणून ओळखला जातो. त्यामुळे श्रवणातील सोमवारी शिवभक्तांमध्ये तर एक वेगळा उत्साह असतो. यादिवशी लोकं उपवास करतात आणि भगवान शंकराची मनोभावे पूजा करतात. श्रावण महिन्यातील सोमवाराला “श्रावणी सोमवार” म्हणून ओळखले जाते. यंदाच्या श्रावण महिन्यात ४ श्रावणी सोमवार आले आहेत. (Top Marathi News)

पहिला सोमवार – २८ जुलै २०२५ – शिवामूठ – तांदूळ

दुसरा सोमवार – ४ ऑगस्ट २०२५ – शिवामूठ – तीळ

तिसरा सोमवार – ११ ऑगस्ट २०२५ – शिवामूठ – मूग

चौथा सोमवार – १८ ऑगस्ट २०२५ – शिवामूठ – जव

श्रावणी सोमवारच्या दिवशी शंकराची विशेष पूजा केली जाते. शंकराला दुग्धाभिषेक केला जातो. काही जणं यादिवशी निर्जल उपवास करतात, काही फक्त फळं खातात तर काही या दिवशी तिखट मीठ खात नाही. या दिवशी शंकराच्या मंदिरांमध्ये आणि घरी देखील देवाला १०८ बेल वाहिला जातो, शिवाय दुधाचा नैवेद्य दाखवला जातो. श्रावणातील सोमवारी शंकराच्या पिंडीवर शिवामूठ देखील वाहण्याची प्रथा आहे. शिवामूठ म्हणजे त्या त्या सोमवारी शंकराला वैशिष्ट्य धान्य अर्पण करणे. शंकराची पूजा केवळ मंदिरात जाऊनच करता येते असे नाही. अनेक घरांमध्ये महादेवाची पूजा घरीच केली जाते, आणि त्यानंतर संपूर्ण पूजा आणि शिवामुठीचे धान्य जमेल तेव्हा मंदिरात जाऊन ठेवले जाते. पूजा झाल्यावर श्रावणी सोमवारची कथा देखील वाचली जाते. (Top Stories)

========

हे देखील वाचा : Deep Amavasya : ‘तिमिरातुनी तेजाकडे’ जाण्याचा संदेश देणारी दीप अमावस्या

========

श्रावणात सोमवाराला जेवढे महत्व आहे, तेवढेच महत्व इतर वारांना देखील आहे. जसे की श्रवणातल्या मंगळवारी नवविवाहित महिलांची मंगळागौर साजरी केली जाते. या दिवशी नवीन लग्न झालेल्या मुली मंगळागौरीची पूजा करून अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करतात. याशिवाय बुधवार हा बृहस्पतीचा असतो. शुक्रवार देवीचा, शनिवार मारुतीचा आणि रविवारी सूर्यनारायणाची आणि आदित्य राणूबाईची पूजा केली जाते. (Social Updates)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.