श्रावणी शुक्रवारी जिवतीची पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी येतो तो श्रावणी शनिवार. श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थ वृक्षाची पूजा करण्याची प्रथा आहे. उद्या अर्थात २६ जुलै रोजी श्रावणातला पहिला शनिवार असणार आहे. २०२५ साली श्रावणात पाच शनिवार येत आहे. पहिला शनिवार २६ जुलै रोजी, दुसरा शनिवार २ ऑगस्ट रोजी, तिसरा शनिवार ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी, तर चौथा शनिवार १६ ऑगस्ट गोपाळकाल्याच्या दिवशी आणि शेवटचा पाचवा शनिवार २३ ऑगस्ट श्रावणी अमावस्येच्या दिवशी येत आहे. (Marathi News)
श्रावण महिना सुरु झाला की घरांमध्ये जिवतीचा कागद लावला जातो. या जिवतीच्या कागदातील प्रत्येक देवतेचे वेगळे महत्त्व आहे आणि वेगळ्या वारी हे देव पुजले जात. या जिवतीच्या कागदात पहिला फोटो असतो तो नृसिंह देवाचा. याच नृसिंह देवाचे पूजन श्रावणी शनिवारी केले जाते. तसेच या दिवशी अश्वत्थ मारुती पूजन करण्याची परंपरा देखील प्रचलित आहे. दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावे. त्यामुळे त्या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो. पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णूपूजा झाली असे मानले जाते. शनिवार हा मारुतीचा वार असल्यामुळे श्रावणात मारुतीरायाला तेल, शेंदूर, रुईच्या पानांची माळ अर्पण केली जाते. (Sharavn News)
पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे. तसेच मारुती नसल्यास पिंपळाची आणि मारुतीची अशा वेगवेगळ्या पूजादेखील केल्या जातात. मारुतीचा वार शनिवार आहे. त्यामुळे श्रावणात मारुतीरायाला न विसरता तेल, शेंदूर, रुईच्या पानांची माळ घातली जाते. पिंपळाच्या पूजेने सर्व तऱ्हेच्या पीडांचा परिहार होतो अशी मान्यता आहे. यज्ञ आणि पित्र अश्वत्थ वृक्षामध्ये वास करतात अशी आपल्या संस्कृतीची पूर्वापार श्रद्धा आहे. (Todays Marathi HEadline)
वेदकाळापूर्वीच्या सिंधु संस्कृतीत अश्वत्थ वृक्षाला निर्मितीचे प्रतीक मानले गेले होते. त्यामुळे त्या काळापासूनच हा वृक्ष पूजनीय ठरला आहे. पुढे ऋग्वेद काळातही यज्ञकर्मात अग्निमंथनासाठी लागणारी उत्तरारणी अश्वत्थापासून बनविली जात असे. उपनिषद काळात अश्वत्थ हे देवस्थान मानले गेले. त्याबद्दलची एक कथा पद्यपुराणात आढळते. (Top Marathi HEadline )
कथा
एकदा भगवान विष्णूने धनंजय नामक विष्णूभक्त ब्राह्मणाची सत्त्वपरीक्षा घेण्याचे ठरविले. त्यानुसार त्याने धनंजयाला दरिद्री केले. परिणामी त्याच्या साऱ्या नातलगांनी त्याला एकाकी पाडले. ते थंडीचे दिवस होते. थंडीपासून स्वत:चे रक्षण व्हावे ह्या हेतूने धनंजय सुकी लाकडे गोळा करून शेकोटी पेटवीत असे. एकदा अशीच लाकडे तोडत असताना त्याने पिंपळाची एक फांदी तोडली. तत्क्षणी तिथे विष्णू प्रकटले. त्यांनी धनंजयाला ‘तू फांदी तोडण्यासाठी कुऱ्हाडीचे जे घाव पिंपळावर घातलेस त्यामुळे मी रक्तबंबाळ झालो आहे, मलाच जखमा झाल्या आहेत’ असे सांगितले. ते ऐकून दुःखी होऊन धनंजयाने त्याच कुऱ्हाडीने स्वत:ची मान तोडून प्रायश्चित्त घेण्याचे ठरविले. त्याची ही भक्ती पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले. त्यांनी धनंजयांला रोज अश्वत्थची पूजा करण्यास सांगितले. त्याप्रमाणे धनंजय रोज भक्तिपूर्वक अश्वत्थाची पूजा करू लागला. पुढे कुबेराने त्याचे दारिद्र्य नष्ट करून त्याला विपुल धनद्रव्याने श्रीमंत केले. (LAtest Marathi NEws)
पिंपळाच्या झाडाची पूजा कशी करतात?
शनिवारी पिंपळाच्या झाडाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. पिंपळाच्या झाडाला तीन वेळा प्रदक्षिणा घालावी. त्यानंतर पिंपळाच्या झाडाची काही पाने अलगद तोडून ती घरी आणून गंगाजलाने धुवावी. पाण्यात हळद घालून घट्ट मिश्रण तयार करावे आणि हे मिश्रणाने उजव्या हाताच्या करंगळीने पिंपळाच्या पानावर ‘ह्रीं’ लिहावे. नंतर त्याला उदबत्ती, दिवा ओवाळावा. पिंपळाच्या झाडाच्या पूजेच्या वेळी वेळी ‘ॐ अश्वत्थाय नम:।’ ‘ॐ ऊध्वमुखाय नम:।’ ‘ॐ वनस्पतये नम:।’ म्हणावे. सोबतच ‘श्रीपंचमुखहनुमतकवच’, संकटमोचन श्री हनुमान स्तोत्र आणि ओम श्री रामदूताय हनुमंताय महाप्रणाय महाबलाय नमो नमः’ या मंत्रांचे पठण करावे. (Marathi Trending NEws)
श्रावणी शनिवारी नृसिंह देवाची देखील पूजा केली जाते. प्रल्हादासाठी विष्णूंनी नृसिंह अवतार घेतला होता. हा नृसिंह अवतार खांबातून प्रगटला होता. त्याचे प्रतीक म्हणून घरातील खांब किंवा भिंतीवर नृसिंहाचे चित्र काढून त्याची पूजा केली जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी एका खांबावर अथवा भिंतीवर नृसिंहाचे चित्र काढावे. किंवा नृसिंहाची प्रतिमा लावावी. त्यावर तिळाच्या तेलाचे किंवा गाईच्या तुपाचे थेंब शिंपडून प्रोक्षण करावे. त्यानंतर साधी हळद, आंबेहळद, चंदन, लाल आणि निळी किंवा पिवळी फुले वाहून नृसिंहाची पूजा करावी. कुंजरा नावाची पालेभाजी आणि तांदळाची खिचडी, असा नैवेद्य दाखवावा. (Top Marathi News)
श्रावणी शनिवारची कथा
एक नगर होतं. तिथे एक ब्राह्मण राहात होता. त्याला एक मुलगा – सून होती. मुलगा प्रवासाला गेला होता. ब्रह्मण व त्याची बायको दररोज देवळात जात होते. सून घरात स्वयंपाक करून ठेवायची. सासूसार्यांना आल्यावर वाढायची व उरलंसुरलं स्वत: खात होती. असं होतां होतां श्रावण मास आला आणि संपत शनिवार आला. (Marathi Latest NEws)
त्या दिवशी त्यांच्या घरी एक मुलगा आला. बाई बाई, मला न्हाऊं घाल, माखू घाल. सून बाई म्हणाली, बाबा घरामध्ये तेल नाही. तुला न्हाऊ कशानं घालू? माझ्या पुरतं घागरीत तेल असेल, थोडं शेंडीला लावून न्हाऊ घाल. जेवू घाल माखू घाल. घागरीत हात घालून तेल काढलं, त्याला न्हाऊ घालून जेवू घालतं, उरलं, सुरलं आपण खाल्ल. असे चार शनिवार झाले. चवथ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून जातेवेळी घरभर तांदूळ फेकून अदृश्य झाला. इकडे घराचा वाडा झाला. गोठभर गुरं झाली. धान्याच्या कोठ्या भरल्या. दासी बटकींनी घर भरलं! सासूसासरे देवाहून आले, तर घर काही ओळखेना. हा वाडा कोणाचा? सून दारात आरती घेऊन पुढं आली. मामांजी, सासूबाई इकडे या! अंग, तू कोणाच्या घरात राहिली आहेस? (Top Stories)
=========
हे देखील वाचा : Shravan : श्रावण महिना कधीपासून सुरु होतोय? पहिला श्रावणी सोमवार कधी?
Nagpanchami : श्रावण महिन्याच्या पंचमी तिथीला साजरी होणारी ‘नागपंचमी’
=========
तिनं सर्व हकीकत सांगितली. शनिवारी एक मुलगा आला, बाई बाई, मला न्हाऊ घाल, माखू घाल. बाबा, घरामध्ये तेल नाही, तुला न्हाऊ कशानं घालू? माझ्यापुरतं घागरीत तेल असेल, थोडं शेंडीला, लावून न्हाऊ घाल, जेवू घाल. घागरीत हात घालून तेल काढलं. त्याला न्हाऊ घातलं. जेवू घातलं. उरलंसुरलं आपण खाल्लं असे चार शनिवार झाले. चवथ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून जातेवेळी घरभर तांदूळ फेकून अदृश्य झाला. इकडे मोठा वाडा झाला. तुम्ही चुकाल म्हणून मी दारात उभी राहिले. असं म्हणून त्यांची आरती केली. सर्वजण घरात गेली. त्यांना जसा मारूती प्रसन्न झाला, तसा तु्हां आम्हां होवो. (Social Updates)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics