श्रावण महिना सुरु होऊन काही दिवस झाले आहेत, अशातच आज श्रावणातला दुसरा सोमवार आहे. श्रावण म्हणजे महादेवाचा आराधनेचा अतिशय पवित्र महिना आहे. त्यामुळे या महिन्यात शिवाची पूजा करणे लाभदायक मानले जाते. संपूर्ण श्रावण महिना जरी महादेवाच्या पूजेसाठी उत्तम समजला जात असला तरी, श्रावणातल्या सोमवाराला जरा जास्तच महत्व असते. या दिवशी महादेवाला रुद्राभिषेक केला जातो. सोमवारचा उपवास केला जातो, महादेवाला बेलपत्र वाहिले जाते, शिवामूठ वाहिली जाते, कहाणी वाचली जाते. अशा विविध पद्धतीने श्रावणातला सोमवार साजरा केला जातो. आज ४ ऑगस्ट श्रावणातला दुसरा सोमवार जाणून घेऊया याच दुसऱ्या सोमवारचे महत्व आणि शिवामूठ कोणती वाहावी याबद्दल. (Marathi News)
श्रावणी सोमवारच्या दिवशी महादेवावची पूजा करताना आणि शिवामूठ अर्पण करताना पूजा केली जाते. सर्वप्रथम भगवान शंकरासमोर दिवा प्रज्वलित करा. देवाला अभिषेक करावा. देवाला स्वच्छ पुसून त्याच्या जागी ठेवावे. त्यानंतर महादेवाला भस्म अर्पण करा. शिवलिंगावर स्वच्छ कापसाचे वस्त्र अर्पण करावे. त्यानंतर महादेवाला प्रिय असलेल्या बेलपत्र, धोतऱ्याची फुलं, रूईची पानं, गोकर्ण फुलं आणि शमीची पाने वाहावी. प्रथम बेलपत्र अर्पण करावे, त्यानंतर इतर साहित्य एकामागोमाग अर्पण करत जावे. नंतर नैवेद्य दाखवावा. (Todays Marathi Headline)
शेवटी उजव्या हातात तीळ घेऊन शिवामूठ वाहावी. शिवामूठ वाहताना त्यावर थोडसे पाणी शिंपडावे आणि तीन वेळा श्रद्धेने शिवलिंगावर ती अर्पण करावी. शिवामूठ ही उजव्या हाताच्या अंगठ्याने देवावर वाहावी. पूजा पूर्ण झाल्यानंतर महादेवाची आरती. दुसऱ्या दिवशी ही वाहिलेली शिवामूठ महादेवाच्या मंदिरात ठेऊन यावी. अनेक ठिकाणी सोमवारी महादेवाला १०० किंवा अधिक बेलपत्र वाहण्याचाच देखील नियम असतो. महादेवाला बेल वाहताना ओम नमः शिवाय मंत्र म्हटलं देखील चालतो किंवा बेलपत्र वाहण्याचा खालील मंत्र म्हटलं तरी चालते. (Shravan Somvar)
नमो बिल्ल्मिने च कवचिने च नमो वर्म्मिणे च वरूथिने च
नमः श्रुताय च श्रुतसेनाय च नमो
दुन्दुब्भ्याय चा हनन्न्याय च नमो घृश्णवे॥
दर्शनं बिल्वपत्रस्य स्पर्शनम् पापनाशनम् ।
अघोर पाप संहारं बिल्व पत्रं शिवार्पणम् ॥
त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रिधायुधम् ।
त्रिजन्मपापसंहारं बिल्वपत्रं शिवार्पणम् ॥
अखण्डै बिल्वपत्रैश्च पूजये शिव शंकरम् ।
कोटिकन्या महादानं बिल्व पत्रं शिवार्पणम् ॥
गृहाण बिल्व पत्राणि सपुश्पाणि महेश्वर ।
सुगन्धीनि भवानीश शिवत्वंकुसुम प्रिय ॥
देवपुजेतील तिळाचे महत्व
आज दुसरा सोमवार असून आजच्या दिवशी शंकराला शिवामूठ म्ह्णून तीळ वाहिली जाते. शांत आणि सौम्य प्रकाशासाठी तीळाच्या तेलाचा दिवा लावतात. पणती, समई किंवा नंदादीप यामध्ये तीळाचे तेल वापरले जाते. धार्मिक कार्यात विशेषतः श्राद्धामध्ये काळे तीळ वापरतात. दानधर्मात तीळाचा किंवा तीळाच्या तेलाचा वापर करतात. देवाचं कार्यामध्ये तिला मोठे महत्व आहे. देवासमोर तिळाच्या तेलाचा दिवा दररोज लावणे देखील चांगले मानले जाते. (Marathi Top Headline)
========
Andhra Pradesh : दक्षिणेची काशी-श्रीकालहस्ती मंदिर !
=========
श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी अतिशय विशेष योग तयार होत आहे. आज सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योग तयार होणार आहेत, त्यामुळे हा दिवस अधिकच महत्त्वाचा राहील. अशा योगात भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने अधिक चांगले फळ मिळते. सर्व पापांचा नाश होतो आणि जीवनात सुख-समृद्धी वाढते.’सर्वार्थ सिद्धी योग’ हा भगवान शिवाच्या कपाळावर बसलेला चंद्र चित्रा नक्षत्रात वृश्चिक राशीत भ्रमण करतो तेव्हा हा योग तयार होतो. हा योग सोमवारी सकाळी ५:४४ ते सकाळी ९:१२ पर्यंत राहील.(Marathi News)
कथा श्रावण सोमवार शिवामूठीची
आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता, त्या राजाला चार सुना होत्या. तीन आवडत्या होत्या एक नावडती होती. आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडतीला जेवायला उष्ट खरगटं, नेसायला जाडें भरडे, राहावयास गुरांचे घर आणि गुराख्याचे काम देत असत. पुढे श्रावणमास आला पहिला सोमवार आला त्या दिवशी त्या नावडतीची नागकन्येशी आणि देवकन्येशी भेट झाली, ते कुठं जात आहेत अशी विचारणा केल्यावर कळालं महादेवाच्या देवळात शिवामूठ वाहायला जात आहेत. (Top Stories)
नावडतीने विचारलं त्याने काय होतं ? भक्ती होते आणि इच्छित कार्य सिद्धीस जातं,मुलबाळ होतं,नावडती माणसं आवडती होतात, वडीलधाऱ्यांचा आशिर्वाद मिळतो. यानंतर नागकन्या आणि देवकन्येने नावडतीला विचारलं तू कोणाची कोण ? नावडतीने सांगितले राजाची सून, मी देखील तुमच्या सोबत येते.नावडती त्यांच्याबरोबर देवळात गेली. (Top Trending News)
नागकन्या आणि देवकन्या वसा वसू लागल्या, नावडतीने विचारलं काय बोलताय, तेव्हा त्यांनी सांगितलं शिवामूठीचा वसा वसतो आहोत. या वसाला नेमकं काय करावं ? मूठ चिमूट तांदुळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी. गंध फूल घ्यावं, दोन बेलाची पाने घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरादेवा, सासूसासऱ्या, दिराभावा,नणंदाजावा, भ्रतरा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा असे म्हणून तांदूळ वहावेत. संध्याकाळपर्यंत उपास नाही निभवला तर दूध प्यावं, संध्याकाळी आंघोळ करावी. देवाला बेल वहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा पाच वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यास जव आणि पाचव्यास सातू शिवमूठीकरीता घ्यावे. (Latetst Marathi Headline)
पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्येने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी नावडतीस घरून आणायला सांगितलं. त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली. संपूर्ण दिवस उपवास केला. जावानणंदानीं उष्टं माष्टं पान दिलं ते तीनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढे दुसरा सोमवार आला , नावडतीने घरातून सर्व सामान घेतला, पूढे नागकन्येबरोबर जाऊन मनोभावे पूजा केली, आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासूसासऱ्या,दिराभावा, नणंदाजावा,नावडती आहे आवडती कर रे देवा, असे म्हणून तिळ वाहिले. (Top Marathi News)
संपूर्ण दिवस उपवास केला, शंकराला बेल वाहिलं,दूध पिऊन निजून राहिली, संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं तुझा देव कुठे आहे. नावडतीने सांगितले माझा देव लांब आहे, वाटा कठीण आहेत कांटे कुटे आहेत साप वाघ आहेत तेथे माझा देव आहे. पुढं तिसरा सोमवार आला, पूजेचं सामान घेतलं, देवाला जाऊ लागली,घरची माणसं मागे जाऊ लागली. नावडती तुझा देव दाखव म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही परंतु सर्वांना पुष्कळ काटेकुटे लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे.(Latest Marathi Headline)
नावडतीला चिंता पडली देवाला प्रार्थना केली देवाला तिची करूणा आली. नागकन्या, देवकन्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडिताचे खांब झाले, सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं, नावडती पूजा करू लागली गंधफूल वाहू लागली नंतर शिवमूठ घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा,सासूसासऱ्या, दिराभावा, नणंदाजावा,नावडती आहे आवडती कर रे देवा, असे म्हणून शिवाला वाहिली. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढले. दागिने घालायला दिले, खुंटीवर पागोटं ठेवून तळे पाहायला गेले. नावडतिची पूजा झाली. (Top News)
========
Varanasi : तिळभांडेश्वर मंदिराचे रहस्य !
=========
पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले. राजा परत आला, माझं पागोटं देवळी राहिलं घेऊन येतो म्हणाला देवळाजवळ आला देऊळ अदृश्य झालेलं होतं तेथे एक लहान देऊळ होतं आणि एक पिंड होती. त्यावर नावडतीने केलेली पूजा होती. जवळ खुंटीवर पागोटं होतं ते घेऊन ते बाहेर आले सुनेला विचारू लागलं हे असं कसं झालं ? सूनेने सांगितलं माझ्या गरिबाचा हाच देव, मी देवाला प्रार्थना केली त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी नेलं नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना होवो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics