अवघ्या काही दिवसातच श्रावणाचा पवित्र महिना सुरु होत आहे. भगवान शंकराला समर्पित असलेल्या या महिन्याचे हिंदू लोकांमध्ये मोठे महत्व असते. या महिन्यामध्ये भगवान शंकराच्या पूजा, आराधना आणि विविध व्रतवैकल्य केले जातात. आषाढी एकादशीनंतर जेव्हा भगवान विष्णू चार महिन्यांसाठी निद्राधीन होतात तेव्हा महादेव या विश्वाचा कारभार बघतात. त्यामुळे श्रावण महिन्याला मोठे महत्व आहे. या महिन्यात मंदिरांमध्ये, घरांमध्ये भगवान शंकराची पूजा केली जाते. याच श्रावण महिन्याच्या निमित्ताने सर्वच लोकं महादेवाच्या भक्तीत रंगणार आहेत. याच निमित्ताने आज आपण भगवान शंकराच्या मुलांबद्दल जाणून घेऊया. (Shravan News)
सामान्यपणे जर आपल्याला कोणी विचारले की, भगवान शंकरांना मुलं किती आणि त्यांचे नावे काय? तर आपल्या तोंडातून सहज उत्तर निघते की, गणपती आणि कार्तिकेय ही महादेवाची दोन मुलं आहेत. मात्र हे खरे असले तरी पूर्ण खरे नाहीये. अर्थात महादेवांना केवळ गणेश आणि कार्तिकेय हीच दोन मुले होते असे नाही. यांच्यासोबतच त्यांना अजूनही मुले होती. मग या दोघांसोबतच अजून त्यांना किती मुलं होती जाणून घेऊया.
कार्तिकेय
तारकासूर राक्षसाचा अत्याचार वाढला होता. इंद्र देवांसोबतच समस्त देवता तारकासुराच्या वधाची वाट बघत होते. मात्र तारकासुराचा वध शिवपुत्र करु शकत होता. शंकर कठोर तपस्या करत होते. शिवाच्या मनात पार्वतीबद्दल प्रेम उत्पन्न करण्यासाठी कामदेवाने मदत केली, पण याचा परिणाम उलटा झाला आणि शिवांना तपस्येतून मध्यात जागवल्यामुळे ते क्रोधात होते. याच रागात त्यांनी कामदेव यांना भस्म केले. शंकर-पार्वती यांच्या संबंधानंतर शंकराचे बीज अग्नीत पडले. परंतु ते इतके प्रखर होते की अग्नीही त्याला स्वीकारू शकला नाही. त्याने ते बीज गंगेचे पाण्यात टाकले.अग्नीतांडव थांबल्यानंतर गंगेच्या किनारी कमळाच्या फुलामध्ये सहा अपत्ये दिसू लागली. कृतिका नक्षत्रांमधून सहा कृतिका खाली अवतरल्या आणि सहा अपत्यांचा त्यांनी स्वीकार केला. पार्वतीने या सहा जणांना एकत्र जोडले. या मुलाला सहा तोंडे होती हाच आहे शिव-पार्वतीचा पुत्र कार्तिकेय. त्याने देवतांचे सेनापती पद स्विकारून तारकासूराचा विनाश केला. (Marathi News)
गणपती
पार्वती मातेने मातीपासून एक मूर्ती तयार केली आणि त्यात प्राण फुंकले. ती स्नान करण्यासाठी निघून गेली आणि पहारेकरी म्हणून त्या मूर्तीपासून तयार झालेल्या मुलाला ठेवले आणि सोबतच आदेश दिला की कोणालाही आत पाठवू नये. थोड्या वेळाने शंकर आले पण त्या मुलाने त्यांना आत जाऊ दिले नाही. त्यामुळे महादेव क्रोधित झाले आणि त्यांनी आपल्या त्रिशुळाने त्या मुलाचे डोके उडवले. पार्वती मातेने ते पाहिले आणि ती दुःख करू लागली. ते पाहून शिवांना लक्षात आले की, तो मुलगा त्यांचाच मुलगा होते. तेव्हा शंकरानी त्या मुलाला पुन्हा जिवंत करण्याचे ठरवले आणि गणांना आदेश दिला प्रथम ज्या प्राण्याचे मस्तक मिळेल ते घेऊन या. गणांना हत्ती दिसला त्यांनी त्याचे मस्तक आणून महादेवांना दिले. त्यांनी ते त्या मुलाला लावले आणि जिवंत केले. शिवशंकरांच्या गणांचा ईश म्हणून त्या बालकाचे नाव गणेश ठेवण्यात आले. (Todays Marathi Headline)
अशोकसुंदरी
अशोक सुंदरीचा जन्म कार्तिकेयानंतर झाला. शिवपुराण आणि पद्म पुराणातही अशोक सुंदरीचा उल्लेख आहे. असे म्हटले जाते की पार्वतीने तिच्या एकाकीपणावर मात करण्यासाठी अशोक सुंदरीची निर्मिती केली होती. हे वरदान कल्पवृक्षाने दिले होते जे लोकांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ओळखले जाते. इच्छा सांगितली आणि पार्वतीची इच्छा पूर्ण झाली. तिला एक सुंदर मुलगी मिळाली तिचे नाव अशोकसुंदरी ठेवण्यात आले. पार्वतीने मुलीला वरदान दिले तिचा विवाह देवराज इंद्रासारख्या शक्तिशाली तरुणाशी होईल. अशोक सुंदरीचा विवाह ययातीचा नातू नहुष बरोबर झाला. (Marathi Trending News)
=========
हे देखील वाचा : Shravan : श्रावणातल्या रविवारी करा आदित्यराणूबाईचे व्रत
=========
अयप्पा
दक्षिण भारतात भगवान विष्णूच्या मोहिनी रुपाबद्दल एक कथा प्रचलित आहे. शंकर भगवान विष्णुकडे जातात आणि त्यांना मोहिनीरुप दाखवावे अशी विनंती करतात. विष्णू त्यानुसार मोहिनीरूपात प्रकट होतात आणि त्या मोहजालात स्वतः महादेव देखील अडकतात. त्या दोघांच्या मिलनातून एका पुत्राचा जन्म होतो तो पुत्र म्हणजे अयप्पा होय. केरळमधील शबरीमला हे अयप्पा यांचे प्रमुख मंदिर मानले जाते. अयप्पाला हरीहरन असे देखील म्हणतात. हरी म्हणजे विष्णू आणि हरन म्हणजे शिवशंकर असा अर्थ आहे. (Top Marathi Headline)
अंधक
एकदा पार्वतीने शंकराचे दोन्ही डोळे झाकले. संपूर्ण पृथ्वीवर अंधकार झाला. पार्वतीच्या हातांना सुर्याच्या उष्णतेची झळ बसू लागली. शिवाची उष्णता आणि पार्वतीचा थंडावा यातून एक बाळ जन्माला आले. या बाळाचे नाव अंधक ठेवले गेले. या अंधक बाळाला एका असुराने दत्तक घेतेले, हा राक्षस महादेवाचा परम भक्त होता. अंधक मोठा झाला पण तो क्रुर होता. एकदा पार्वतीला पाहिल्यावर तिच्याशीच लग्न करायचे असे त्याने ठरवले. त्याने पार्वतीचा पाठलाग केला. पार्वतीने शंकराला बोलावले, हे पाहून भगवान शंकरांना राग आला आणि त्यांनी त्रिशूळाने अंधकासुराला मारले. त्याचे रक्त जेव्हा त्रिशुळाला लागले तेव्हा अंधकासुराला कळालं की तो कोणाचा मुलगा आहे. त्याला जेव्हा समजले तो महादेव आणि माता पार्वतीचा मुलगा आहे, त्याने आपल्या माता-पित्याची माफी मागितली. (Latest Marathi Headline)
जालंधर
शिव यांना एक चवथा मुलगा देखील होता ज्याचे नाव जालंधर होते. श्रीमद्मदेवी भागवत पुराणानुसार, एकदा भगवान शंकराने आपले तेज समुद्रात फेकले त्यामुळे जालंधर याचा जन्म झाला. असे म्हणतात की जालंधर मध्ये अफाट शक्ती होती. त्याच्या या शक्तीचे कारण म्हणजे त्याची पत्नी वृंदा होती. त्याची पत्नी वृंदा ही पती धर्म मानणारी होती त्यामुळे सर्व देव मिळून देखील त्या जालंधरला हरवू शकत नव्हते. एकदा जालंधर ने भगवान विष्णूला हरवून देवी लक्ष्मीला विष्णू कडून हिसकवून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वृंदा ने आपले पतिधर्म मोडले आणि त्यामुळे भगवान शिवाने जालंधराला ठार मारले. (Marathi Latest News)
मनसा देवी
शंभुमहादेवाची लाडकी कन्या अर्थात देवी मनसा. शंभोशंकराने नागलोकांचे साम्राज्य तिला प्रदान केले होते त्यामुळे सगळे साप तिचा आदर करत आणि तिच्या आज्ञेचे पालन करत.
ज्योती
शंभु महादेवाची आणखी एक कन्या जी ज्योती, ज्वाला किंवा ज्वालामुखी नावाने ओळखली जाते. शिवाच्या तेजस्वी रुपामुळे ज्योतीचा जन्म झाला. तर काही जण म्हणतात पार्वतीच्या कपाळातून झाला होता. तमिळनाडूच्या अनेक मंदिरात ज्वाला किंवा ज्योतीची पूजा केली जाते. ही शंकराची मुले असून सुकेश, भुमा आणि खुजा ही सुद्धा महादेवाची मुले म्हणून ओळखली जातात. (Social News)
=========
हे देखील वाचा : Nagpanchami : श्रावण महिन्याच्या पंचमी तिथीला साजरी होणारी ‘नागपंचमी’
=========
सुकेश
भगवान शंकराचा तिसरा मुलगा सुकेश होता. याचे दोन राक्षस भाऊ होते -‘ हेती आणि ‘प्रहेती’ प्रहेती संत बनला आणि हेती ने आपल्या साम्राज्याला वाढविण्यासाठी ‘काळ’ याची मुलगी ‘भया’ हिच्याशी लग्न केले. भया पासून ह्यांना विद्युतकेश नावाचा मुलगा झाला. ह्या विद्युतकेशाचे लग्न संध्या यांची मुलगी ‘सालकटंकटासह झाले. असे म्हणतात की सालकटंकटा एक व्यभिचारी होती. म्हणून तिला मूल झाल्यावर त्या मुलाला बेवारशी सोडले. विद्युतकेश याने देखील त्या मुलाचा सांभाळ तो कोणाचा मुलगा आहे हे माहीतच नाही, असे समजून केला नाही. पुराणानुसार भगवान शिव आणि आई पार्वतीने त्या बेवारशी मुलाला बघितल्यावर त्याला संरक्षण दिले आणि त्याचे नाव सुकेश ठेवले. या सुकेशमुळे राक्षस कुळ वाढले. (Social Updates)