Home » Sharavan : श्रावणात मांसाहार का करत नाही?

Sharavan : श्रावणात मांसाहार का करत नाही?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Sharavan
Share

अवघ्या काही दिवसातच हिंदू धर्मियांचा अतिशय पवित्र समजला जाणारा श्रावण महिना सुरु होत आहे. आषाढ महिना संपला की लगेच श्रावण सुरु होती. श्रावण महिना हा देवाधिदेव महादेव यांना समर्पित आहे. आषाढ मधील देवशयीन एकादशीपासून सृष्टीचे संचालक असलेले भगवान विष्णू हे पुढील चार महिन्यांसाठी निद्राधीन होतात. त्यांच्या निद्राधीन झाल्यानंतर चार महिने देवाधिदेव श्रीशंकर सृष्टीचे पालक बनतात अशी धार्मिक मान्यता आहे. भगवान विष्णू निद्राधिन असण्याच्या काळाला चातुर्मास म्हटले जाते. हे चारही महिने हिंदूंसाठी महत्वाचे असतात. मात्र श्रावणाला विशेष महत्व देण्यात आले आहे. (Marathi News)

श्रावण महिना हा संपूर्णपणे देवाला समर्पित असल्याने या काळात सतत देवाचे नामस्मरण, पूजा चालू असतात. याकाळात विविध धार्मिक पूजा देखील केल्या जातात. या महिन्याभरात आपण केलेली देवाची आराधना थेट त्याच्यापर्यंत पोहचते. त्यामुळे हा महिना खूपच पवित्र असतो. आता पवित्र महिना असल्याने श्रवणामध्ये अनेक नियम पाळले जातात. यातलाच एक मोठा आणि महत्वाचा नियम म्हणजे श्रावणात कोणीही मांसाहार करत नाही. श्रावणात नॉन व्हेज खाणे सर्वच लोकं टाळतात. यामागे धार्मिक कारण तर आहे, शिवाय वैज्ञानिक कारण देखील आहे. जाणून घेऊया श्रावणात मांसाहार हा करत नाही? (Todays Marathi Headline)

धार्मिकदृष्ट्या महत्वाचा असणारा श्रावण आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा मानला जातो. श्रावण महिना भगवान शंकराला अत्यंत प्रिय मानला जातो आणि या महिन्यात आध्यात्मिक शुद्धीकरणावर भर दिला जातो. या महिन्यात अनेक व्रत, उपवास देखील केले जातात. भगवान शिवाची आराधना केली जाते त्यामुळे मांसाहार करणे श्रावणात टाळले जाते. याशिवाय लोकं या महिन्यात उपवास करून सात्विक अन्न घेण्यावर भर देतात. ज्यामुळे मांसाहार केला जात नाही. म्हणून या महिन्यात मांसाहार आणि मद्यपान करणे टाळावे. (Top Trending News)

Sharavan

मात्र असे असले तरी यामागे काही वैज्ञानिक कारणं देखील आहेत. पावसाळा हा संसर्गजन्य आजारांसाठी देखील ओळखला जातो. पावसाळ्यात शरीराची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. या महिन्यात सूर्याची किरण खूप कमी वेळ असतात, पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता जास्त असते. यामुळे पाचन अग्नि मंद होते. यामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते. मुख्य म्हणजे हे आजार केवळ मनुष्यालाच होतात असे नाही तर प्राण्यांनाही होतात. असे असताना जर या ऋतूत मांसाहारी पदार्थ खाल्ले तर साहजिकच आपण अनेक आजारांना आमंत्रण देण्यास कारणीभूत ठरतो. (Latest Marathi News)

शिवाय श्रावण महिन्यात पचनक्रिया मंद झाल्याने मांसाहारी पदार्थ हे नीट पचत नाही आणि ते आतड्यांमध्ये जाऊन बसतात. परिणामी जेवण लवकर पचत नाही. आणि जेवण न पचल्यामुळे आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. मांसाहार हा तामसिक आहार समजला. शरीराला ते पचवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. जेव्हा शरीरावर पचनासाठी अतिरिक्त दबाव येतो तेव्हा गॅस, अपचन, आम्लता आणि जडपणा जाणवू शकते. म्हणूनच कायम डॉक्टर आणि तद्न्य कायम या महिन्यात मांसाहार टाळून शाकाहारी, सात्विक पदार्थांचेच सेवन करण्याचा सल्ला देतात. (Top Stories)

========

हे देखील वाचा : Deep Amavasya : ‘तिमिरातुनी तेजाकडे’ जाण्याचा संदेश देणारी दीप अमावस्या

========

सीफूडबद्दल सांगायचे झाले तर पावसाळा हा माशांच्या प्रजननाचा काळ असतो. हा माशांचा प्रजनन काळ असल्याने, या काळात त्यांच्यात अनेक बदल होतात. हे बदल माशांच्या गुणवत्तेवर परिणाम करतात. या काळात मासे न खाण्याचा सल्ला दिला जातो. पावसाळ्यात पाण्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढलेले असते. पाण्यात बॅक्टेरियाची संख्या वाढते. परिणामी, माशांद्वारे मानवांमध्ये संसर्ग पसरण्याचा आणि उलट्या, जुलाब होण्याचा धोका जास्त असतो. श्रावणात दारू पिणे देखील टाळले जाते. कारण या दिवसांमध्ये जर अल्कोहोल घेतले तर ते शरीरात उष्णता निर्माण करते आणि त्यामुळे रक्तदाबात चढ-उतार देखील होतात. (Social Updates)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.