श्रावणात शिवपूजनाला अत्यंत महत्त्व आहे. स्त्रिया उपवास, व्रते, उपासना, नामस्मरण करतात. धार्मिक पथ्ये पाळतात. श्रावण महिना सुरू झाला, की देवघराजवळ जिवतीचा कागद चिकटविला जातो. श्रावण महिन्यात प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आहे. श्रावणी सोमवार, मंगळागौर, बुध-बृहस्पती पूजन झाल्यावर येतो तो श्रावणी शुक्रवार. श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी जिवतीची पूजा किंवा जरा-जिवंतिका पूजन केले जाते. मात्र यातल्याच एका शुक्रवारी वरदलक्ष्मीचे व्रत करण्याची रीत आहे. (Marathi News)
उद्या अर्थात ८ ऑगस्ट रोजी श्रावणातला तिसरा शुक्रवार आहे. श्रावणातल्या प्रत्येक वाराला मोठे महत्व आहे. यातलाच एक महत्वाचा वार म्हणजे शुक्रवार. श्रावणातल्या शुक्रवारी जिवंतिका पूजन करण्याची खूपच जुनी आणि मोठी प्रथा आहे. मात्र श्रावणातला तिसरा शुक्रवार जरा वेगळा असतो. या दिवशी जिवंतिका नाही तर वरदलक्ष्मीचे व्रत केले जाते. नक्की वरदलक्ष्मीचे व्रत नक्की काय असते?, ते का करतात?, कसे करतात?, या व्रताचे महत्व काय? या सर्वच प्रश्नांची उत्तरं पाहूया. (Todays Marathi Headline)
या व्रतामध्ये माता लक्ष्मीच्या वरदलक्ष्मी स्वरूपाची पूजा केली जाते. ज्यामुळे सौभाग्य, समृद्धी, आरोग्य आणि कुटुंब सुख प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. वरदलक्ष्मी व्रत माता लक्ष्मीच्या आठ स्वरूपांपैकी एक असलेल्या वरदलक्ष्मीच्या पूजेसाठी समर्पित आहे. ही पूजा सौभाग्य, संपत्ती आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी केली जाते. वरदलक्ष्मी व्रताला इच्छापूर्ती व्रत म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत पाळल्याने विवाहित महिलांना अखंड सौभाग्य प्राप्त होते. वरदलक्ष्मीचे व्रत हे प्रामुख्याने रोगमुक्ती मिळण्यासाठी केले जाते. (Top Trending News)
श्रावणी शुक्रवारी जिवतीची पूजा आणि जरा-जिवंतिका पूजन यासह वरदलक्ष्मीचे व्रत केले जाते. हे व्रत श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील दुसऱ्या शुक्रवारी किंवा काही ठिकाणी पौर्णिमेच्या आधीच्या शुक्रवारी केले जाते. म्हणजेच शुक्रवार, ८ ऑगस्ट २०२५ रोजी हे व्रत आचरावे. सुरुवातीला घराची साफसफाई करावी. शुचिर्भूत होऊन सौभाग्य अलंकार परिधान करून पूजेची तयारी करावी. वरदलक्ष्मी व्रताचा संकल्प करावा. चौरंग मांडून त्यावर कलश ठेवून वरदलक्ष्मीचे आवाहन करावे. देवीची श्रीसूक्तयुक्त पूजा करावी. देवीला नैवेद्य दाखवावा. पूजेला आलेल्या स्त्रियांना वाण द्यावे. यानंतर वरदलक्ष्मीची कहाणीचे पठण किंवा श्रवण करावे. या दिवशी संपूर्ण दिवस उपास करावा, असे सांगितले जाते. सुवासिनीची खणा-नारळाने ओटी भरावी. (Latest Marathi News)
दक्षिण भारतातील तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेशातील गृहिणी वरदलक्ष्मीची पूजा मोठ्या भक्तिभावाने करतात. या व्रताला वरमहालक्ष्मी, वरालक्ष्मी व्रत या नावाने देखील ओळखले जाते. देशभराच्या विविध भागात हे व्रत विविध नावाने ओळखले जाते. महाराष्ट्रात वरदलक्ष्मी व्रत नावाने लक्ष्मी देवीचे पूजन केले जाते. कर्नाटकात तर या व्रताचा उत्साह काही औरच असतो. अतिशय मोठ्या स्वरूपावर हे व्रत येथे साजरे केले जाते. या व्रतात अनेक भागात देवीची प्रतिकृती तयार केली जाते. देवीला सुंदर साडी नेसवली जाते. नानाविध दागिने, कमरपट्टा, हार, नथ घालून देवीचा शृंगार केला जातो. गणेश आणि लक्ष्मीची पूजा केली जाते. वरदलक्ष्मीची मनोभावे भक्ती करणार्यांच्या घरामध्ये धन-धान्य यांची समृद्धी होऊन संतती भाग्यशाली बनेल, असे श्री वरदलक्ष्मी देवीचे वचन आहे. (Top Marathi News)
वरदलक्ष्मी व्रतकथा
एकदा कैलासावर शिव-पार्वती सारीपाट खेळत होते. त्यावेळी एक डाव कोणी जिंकला याबद्दल त्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला. अखेर तिथे उपस्थित असलेल्या चक्रनेमी नावाच्या आपल्या गणाला भगवान शिवशंकरांनी निर्णय विचारला असता त्याने भगवान शिवशंकरांच्या बाजूने निर्णय दिला. त्यावेळी रागावलेल्या पार्वतीमातेने त्या गणाला, तू कुष्ठरोगी होशील, असा शाप दिला. परंतु, शिवाने त्याचा निर्णय योग्य होता, हे पार्वतीच्या लक्षात आणून दिले. तसेच त्याला उ:शाप देण्यास सांगितले. तेव्हा पार्वती देवीने, एका सरोवराच्या काठावर काही देवस्त्रिया वरदलक्ष्मीचे व्रत करीत असतील. त्यांना विचारून चक्रनेमीने ते व्रत केल्यास तो रोगमुक्त होईल, असे सांगितले. त्याप्रमाणे चक्रनेमीने एका सरोवराच्या काठी वरदलक्ष्मीचे व्रत करणाऱ्या देवस्त्रियांना त्या व्रताबद्दलची माहिती विचारून हे व्रत केले. परिणामी तो रोगमुक्त झाला, अशी वरदलक्ष्मी व्रत कथा पुराणात आढळून येते. (Social News)
=========
हे देखील वाचा : Raksha Bandhan 2025 : रक्षाबंधनावेळी राखी बांधताना दोरीला तीन गाठच का मारतात?
Narali Purnima : जाणून घ्या नारळी पौर्णिमा सणाचे महत्व
Rakshabandhan : भावा बहिणीचे प्रेमळ नाते अधोरेखित करणारे ‘रक्षाबंधन’
===========
आरती लक्ष्मीची
जयदेवी जयदेवी श्रीलक्ष्मीमाते । प्रसन्न होऊनि आतां वर दे आम्हांते।। धृ. ।।
श्रीविष्णुकांते तव विश्वावरि सत्ता । स्थिरचर दौलत देसी लक्ष्मीव्रत करितां ।। १ ।।
जननी तुजऐसी या नाही त्रिभुवनीं । सुरवर वंदिती मस्तक ठेवुनि तव चरणी ।। २ ।।
कृपाप्रसादें तुझिया लाभे सुखशांति । चिंताक्लेशहि जाती नुरते आपत्ती ।। ३ ।।
वैभव ऐश्वर्याचें आणि अपार द्रव्याचें । देसी दान दयाळे सदैव सौख्याचे ।। ४ ।।
यास्तव मिलिंदमाधव आरती ओवाळी । प्रेमें भक्तिभावें लोटांगण घाली ।। ५ ।।
जयदेवी जयदेवी श्रीलक्ष्मीमाते ।।
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics