Home » Shravan : आज पहिला श्रावणी शुक्रवार, जाणून घ्या जिवतीची पूजा करण्याची पद्धत

Shravan : आज पहिला श्रावणी शुक्रवार, जाणून घ्या जिवतीची पूजा करण्याची पद्धत

by Jyotsna Kulkarni
0 comment
Shravan
Share

आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली. आज श्रावणातला पहिला दिवस आणि पहिला श्रावणी शुक्रवार. व्रत वैकल्यांचा महिना म्हणून ओळख असलेल्या या महिन्यातला प्रत्येक दिवस महत्वाचा असतो. या महिन्यातल्या प्रत्येक दिवसाला खास महत्व असते. आज श्रवणी शुक्रवार अर्थात जिवतीची शुक्रवार. श्रवणातल्या शुक्रवाराला देखील मोठा मान आहे. श्रावणात येणाऱ्या प्रत्येक शुक्रवारी जिवतीची पूजन केले जाते. हे पूजन आपल्या संततीच्या संरक्षणासाठी केले जाते. या दिवशी मुलांना औक्षण करण्याची देखील प्रथा आहे. तर श्रावण महिन्यातील शुद्ध पक्षात येणाऱ्या शेवटच्या शुक्रवारी वरदलक्ष्मी व्रत करतात. (Shravan)

श्रावण महिना सुरू झाला की, त्याच्या पहिल्याच दिवशी अनेक घरांमध्ये देवघराजवळ जिवतीचा किंवा जीवंतिकेचा कागद चिकटविला जातो. श्रावणातल्या चारही शुक्रवारी जिवतीची पूजा करण्याची पूर्वीपासून चालत आलेली प्रथा आहे. ही पूजा संततीरक्षणार्थ मानली जाते. जिवतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची पूजा करावी, असे सांगितले जाते. जिवतीचे चित्र श्रावण महिन्याच्या सुरुवातीस लावले जाते आणि वाराप्रमाणे त्याची पूजा केली जाते. (Marathi News)

पहिल्या शुक्रवारी जीवतीचे चित्र लावून स्त्रिया त्याची पूजा करतात. या महिन्यातल्या प्रत्येक शुक्रवारी सायंकाळी सुवासिनींना घरी बोलावून त्यांना हळद-कुंकू लावले जाते. त्यांना दूध, साखर, गूळ, फुटाणे प्रसाद म्हणून दिले जातात. ज्यांच्या घरी सुगड (मातीचे भांडे) यावरील गौरी असतात ते कुटुंबीय श्रावण शुक्रवारी हा मुखवटा पूजेसाठी काढतात. भाद्रपदमध्ये गौरीपर्यंत त्या मुखवट्याची दर शुक्रवारी पूजा करण्यात येते. त्यामध्ये सोळा काड्या दुर्वा व आघाडा, कापसाच्या वस्त्रमाळा यांचा समावेश असतो. (Todays Marathi News)

आज पहिला श्रावणी शुक्रवार आहे. यंदा श्रावणात पाच शुक्रवार आले आहेत. दुसरा श्रावणी शुक्रवार येत्या १ ऑगस्टला, तिसरा श्रावणी शुक्रवार ८ ऑगस्टला, चौथा श्रावणी शुक्रवार १५ ऑगस्टला आहे तर पाचवा आणि शेवटचा श्रावणी शुक्रवार २२ ऑगस्ट रोजी आहे. या सर्व शुक्रवारच्या दिवशी जिवतीची विधीवत पूजा केली जाते. श्रावण शुक्रवारी जिवतीची पूजा करताना “जरे जीवन्तिके देवि बालयुक्ते प्रमोदिनी। रक्षाव्रते महाशक्ति पूर्णकामे नमोस्तुते।।” हा श्लोक म्हटला जातो. जिवतीच्या लावलेल्या कागदाची पूजा केली जाते. या पूजेसाठी दूर्वा, फुले, आघाड्याची पाने मुख्य असतात. या तिन्ही गोष्टींची माळ करून ती जिवतीला घातली जाते.  यासह २१ मण्यांचे कापसाचे गेजवस्त्र घालावे. गंध, अक्षता वाहाव्यात. तसेच पुरणाचे ५ – ७ किंवा ९ असे दिवे करून लक्ष्मीमातेची व जिवतीची आरती म्हटली जाते. विड्यांच्या पानांबरोबर सुपारी व फळे ठेवून दुध-साखर आणि चणे-फुटाण्याचा नैवेद्य दाखवला जातो. (Marathi Latest NEws)

Shravan

धूप, दीप अर्पण करावे. साखरेचा, चणे-फुटाण्यांचा आणि पुरणा-वरणाचा नैवेद्य दाखवावा. यानंतर आरती करावी. जिवतीची पूजा झाल्यानंतर घरातील मुलांना पाटावर बसवून त्यांचे औक्षण करावे. मुले परगावी असल्यास चारही दिशांना औक्षण करून अक्षता टाकाव्या म्हणजे परगावी असलेल्या मुलांचे औक्षण केल्यासारखे होईल. त्या दिवशी देवीची ओटी भरावी. शिवाय घरात ज्या सवाष्ण येतात त्यांची देखील ओटी भरली जाते. (Top Marathi News)

जिवतीची कथा १

पौराणिक कथेनुसार, जरा ही मूळची राक्षसी होती. ती मगध देशात राहत होती. मगधचा राजाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असलेला मुलगा झाला. त्यामुळे जन्मताच त्याला नगराबाहेर फेकून देण्यात आले. त्यावेळी जरा राक्षसीनीने दोन वेगवेगळे भाग असलेल्या त्या मुलाला एकत्र केले आणि त्याला जीवदान दिले. म्हणून ते बालक ‘जरासंध’ या नावाने ओळखले जाऊ लागले. पुढे मगध देशात जरा राक्षसीचा महोत्सव केला जाऊ लागला. सगळे तिला अनेक मुलांची आई समजू लागले. घरोघरी तिची पूजा होऊ लागली. तेव्हापासून जिवतीची पूजा केली जाऊ लागली. (Top Trending News)

जिवतीची कथा २

ऐका, शुक्रवारा, तुमची कहाणी. आपटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्या राजला मुलगा नव्हता. तेव्हा राणीनं एका सुईणीला बोलावून आणलं. अगं अगं सुईणी, मला नाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचुप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन! सुईणीनं गोष्ट कबूल केली. ती त्या तपासावर राहिली. गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली, तेव्हा ती सुईण तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली की, बाई बाई, तू गरीब आहेस, तुझं बाळंतपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव, मी तुझं बाळंतपण फुकट करीन! तिनं होय म्हणून सांगितलं. नंतर ती सुईण राणीकडे आली. (Latest Trending News)

बाईसाहेब, बाईसाहेब, आपल्या नगरात अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे, तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे, लक्षणं सर्व मुलाचीच दिसताहेत. तेव्हा आपल्या घरापासून तो तेथपर्यंत काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं. आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी. मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन. असं ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला आणि जसेजसे दिवस होत गेले, त्याप्रमाणे डोहळ्याचं डंभ केलं. पोट मोठं दिसण्याकरिता त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं. नऊ मास भरताच बाळंतपणाची तयारी केली. (Shravan News)

इकडे ब्राह्मणीणबाईचं पोट दुखू लागलं. सुईणीला बोलावू आलं. त्याबरोबर तुम्ही पुढं व्हा, मी येते म्हणून सांगितलं. धावत धावत राणीकडे आली. पोट दुखण्याचं ढोंग करायला सांगितलं. नंतर ब्राह्मणाच्या घरी आली. बाई बाई, तुझी आहे पहिली खेप. डोळे बांधलेस तर भिणार नाहीस. नाही बांधलेस तर भय वाटेल. असं सांगून तिचे डोळे बांधले. ती बाळंत झाली, मुलगा झाला. सुइणीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठविला व तिनं एक वरवंटा घेऊन त्यास एक कुंचा बांधला आणि तिच्यापुढं ठेवला. मग बाईचे डोळे सोडले. तुला वरवंटाच झाला असं सांगू लागली. तिनं नशिबाला बोल लावले, मनामध्ये दु:खी झाली. सुईण निघून राजवाड्यात गेली. राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. मुलाचं कोडकौतुक होऊ लागलं. (Social News)

Shravan

इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला. श्रावणमासी दर शुक्रवारी जिवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं, जय जिवती आई माते, जिथं माझं बाळ असेल,तिथं खुशाल असो. असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे, ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे. हिरवं लुगडं नेसणं, हिरव्या बांगड्या लेणं वर्ज्य. कारलीच्या मांडवाखालून जाणं वर्ज्य केलं. तांदुळाचं धूण वलांडणं बंद केलं. याप्रमाणं ती नेहमी वागू लागली. (Top Marathi stories)

इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशी ती न्हाऊन आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती, तेव्हा ह्याची नजर तिजवर गेली. हा ‍मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायचीम्हणून निश्चय केला. रात्री तिच्या घरी आला. दारात गाय वासरू बांधली होती. चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला. वासराला वाचा फुटली. ते आपल्या आईला म्हणालं, कोण्या पाप्यानं माझ्या शेपटावर पाय दिला! तेव्हाती म्हणाली, जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही, तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला निर्भल काय? हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासनू काशीस जाण्याची परवानगी घेतली. कांशीस जाऊ लागला. जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला. (TOp Stories)

त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती, पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात असत. राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला. पाचवीचा दिवस होता. राजा दारात निजला होता. सटवी रात्री आली आणि म्हणू लागली, कोण गं मेलं वाटेत पसरलं आहे? जिवती उत्तर करिते, अगं, अगं, माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे, मी काही त्याला वलांडू देणार नाही. मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करीत बसले होते, त्यांनी हा संवाद ऐकला. इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर ब्राह्मणानं येऊन राजाचे पाय धरले. तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला, आजचे दिवस मुक्काम करा, अशी विनंती केली. राजानं ती मान्य केली. त्याही रात्री याप्रमाणं प्रकार झाला. दुसरे दिवशी राजा चालता झाला। इकडे ह्यांचा मुलगा वाढता झाला. (social Updates)

पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली. गयावर्जनाची वेळ आली, पिंड देतेवेळी ते घ्यायला दोन हात वर आले. असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणांना विचारलं. ते म्हणाले,घरी जा, सार्‍या गावातल्या बायकापुरुषांना जेवायला बोलाव, म्हणजे याचं कारण समजेल. मनाला मोठी चुटपूट लागली. घरी आला मोठ्या थाटाचं मावंद केलं, त्या दिवशी शुक्रवार होता. गावात ताकीद दिली, घरी कोणी चूल पेटवू नये, सगळ्यांनी जेवायला यावं. ब्राह्मणीला मोठं संकट पडलं. राजाला निरोप धाडला, मला जिवतीचं व्रत आहे. माझे नेम पुष्कळ आहेत. ते पाळले तर जेवायला येईन! राजानं कबूल केलं. जिथं तांदुळाचं धूण होतं ते काढून तिथं सारवूऩ त्यावरून ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत, कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही. दर वेळेस जिथं बाळ असेल तिथं खुशाल असो, असं म्हणे. (Social News)

पुढे पानं वाढली. मोठा थाट जमला. राजाने तूप वाढायला घेतलं. वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला. तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेम सुटून पान्हा फुटला. तिच्या स्तनांतून दुधाच्या धारा फुटल्या, त्या ह्याच्या तोंडात उडाल्या. तो हातची तपेली ठेवून रूसून निजला. काही केल्या उठेना. तेव्हा आई गेली, त्याची समजूत करू लागली. तो म्हणाला असं होण्याचं कारण काय? तिनं सांगितलं, ती तुझी खरी आई, मी तुझी मानलेली आई- असं सांगून सर्व हकीकत सांगितली. नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढं त्यानं आपल्या आई-बापास राजवाड्यानजीक मोठा वाडा बांधून देऊन त्यासुद्धा आपण राज्य करू लागला. तर जशी जिवती तिला प्रसन्न झाली, तशी तुम्हा आम्हा होवो. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.(Trending Stories)

=========

हे देखील वाचा : Shravan : श्रावण महिना कधीपासून सुरु होतोय? पहिला श्रावणी सोमवार कधी?

Nagpanchami : श्रावण महिन्याच्या पंचमी तिथीला साजरी होणारी ‘नागपंचमी’

=========

जिवतीची आरती
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।
सुखी ठेवी संतति विनति तवचरणी ।
श्रावण येतांचि आणूं प्रतिमा । गृहांत स्थापूनि करू पूजना ।
आघाडा दुर्वा माळा वाहूंया । अक्षता घेऊन कहाणी सांगू या ।
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । सुखी ठेवी संतति विनति तवचरणी ।। १ ।।

पुरणपोळीचा नैवेद्य दावूं । सुवासिनींना भोजन देऊं ।
चणे हळदीकुंकू दूधहि देऊं । जमूनि आनंदे आरती गाऊं ।
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । सुखी ठेवी संतति विनति तवचरणी ।। २ ।।

सटवीची बाधा होई बाळांना । सोडवी तींतून तूचि तयांना ।
माता यां तुजला करिती प्रार्थना । पूर्ण ही करी मनोकामना ।
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । सुखी ठेवी संतति विनति तवचरणी ।। ३ ।।

तुझिया कृपेने सौख्य नांदू दे । वंशाचा वेल नीट वाढूं दे ।
सेवा हे व्रत नित्य घडूं दे । मनींचे हेतू पूर्ण होऊंदे ।
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । सुखी ठेवी संतति विनति तवचरणी ।। ४ ।।

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.