Home » Shravan : श्रावणी रविवारी साजरा होणारा कानबाई उत्सव

Shravan : श्रावणी रविवारी साजरा होणारा कानबाई उत्सव

by Jyotsna Kulkarni
0 comment
Shravan
Share

आता श्रावण म्हटले की व्रतवैकल्ये आलीच. श्रावणातील प्रत्येक दिवस हा विविध व्रतांची आणि पूजनासाठी ओळखला जातो. या महिन्यातला प्रत्येक दिवस खास असतो आणि या दिवशी एका खास देवाची पूजा केली जाते. सगळ्यांना आवडणारा रविवार देखील श्रावणात खूपच महत्वाचा समजला जातो. या दिवशी सूर्यपूजनाला विशेष महत्व असते. या दिवशी आदित्यराणूबाईचे व्रत केले जाते. मात्र यासोबतच या श्रावणी रविवारी अजून एका मोठा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. श्रावणी रविवारी महाराष्ट्रातील खान्देशमध्ये कानबाईचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्याची परंपरा आहे. खान्देशात रोट, कानबाई या उत्सवाचे एक वेगळेच स्वरूप पाहायला मिळते. (Marathi News)

खान्देशची कुलदैवत मानल्या जाणाऱया कानबाई मातेच्या सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. खान्देशसह नंदुरबार जिल्ह्यात श्रावणातील पहिल्या रविवारी मोठ्या उत्साहात हा सण साजरा होतो. आपण जर पाहिले तर कायमच खान्देश आपल्या अनोख्या परंपरांसाठी अनोख्या सणासाठी ओळखला जातो. खान्देशच्या आपल्या पूर्वापार चालत आलेल्या सर्वच गोष्टी उत्तम पद्धतीने जपल्याचे आजही आपल्याला दिसते. श्रावण महिना सुरु होण्याआधीच खान्देशमध्ये कानबाई उत्सवाची तयारी सुरु होते. दिवाळीच्या आधी जशी घरांमध्ये स्वच्छता होते, तयारी होते अगदी तशीच तयारी या सणाला देखील केली जाते. (Top Marathi News)

Shravan

खान्देशातील काही भागात श्रावणातल्या पहिल्या रविवारीच हा कानबाई उत्सव होतो, तर काही ठिकाणी नागपंचमी झाल्यानंतर येणाऱ्या रविवारी कानबाई बसवल्या जातात. कानुमातेचा उत्सव म्हणजे घरातील एकोपा दर्शवणारा उत्सव. कानुमातेच्या उत्सवानिमित्त, कानुमातेच्या रोट खानाच्या निमित्ताने का होईना घरातील सर्व सदस्य एकत्र असतात.भाऊबंदकीतील सदस्य एकत्र येतात. मग आता कानबाई म्हणजे काय? हा उत्सव का आणि कसा साजरा करतात? याबद्दल आपण जाणून घेऊया. (Shravan News)

रोट म्हणजे सव्वा – सव्वा मूठ गहू घेऊन दळून आणलेले पीठ. ही पीठ संपेपर्यंत तेच खावे लागते. एकत्र कुटुंब असेल तर रोटांसाठी घरातील लहान मोठ्या सर्वच पुरुषांना मोजुन प्रत्येकाची सव्वा मूठ असे धान्य म्हणजे गहू, चण्याची दाळ घेतले जाते. हे धान्य दळून आणले जाते. मात्र ते दळण्यापूर्वी आधी चक्कीवाल्याला रोटांचे पीठ दळण्यासाठी आणणार असल्याचे सांगितले जाते. मग तो चक्की धुऊन पुसून ठेवतो. मग चक्कीवरुन पीठ दळून आणले जाते. या दिवसाच्या जेवणाची खास गोष्ट म्हणजे या दिवशी चण्याच्या दाळीचाच स्वयंपाकात जास्त वापर केला जातो. कानबाईच्या दिवशी घरात पुरण पोळी, खीर, कटाची आमटी, चण्याची दाळ घालून केलेली गंगाफळ/ लाल भोपळ्याची भाजी असा मेनू असतो. मुख्य म्हणजे या जेवणात कोणत्याही प्रकारे कांदा लसूण खाल्ला जात नाही. (Todays Marathi Headline)

कानबाई ही नारळाचा वापर करून बसवली जाते. कानबाईचे नारळ पूर्वापार चालत आलेले असते किंवा ते परनुन आणलेले असतात. ‘कानबाई नारळ परनुन आणणे’ म्हणजे पूर्वीच्या काळी एखाद्या खेड्यात ठरवून गावचे पाटील लोक गावोगावी एका खास आमंत्रण पाठवायचे. ज्या घरातल्या स्त्रीला काही कापलेले, भाजलेले नाही. जिच्या अंगावर एकही डाग नाही अशा सवाष्णींना निवडले जायचे. अशा स्त्रिया त्यांच्या सासरी असल्या तर त्यांच्या सासरकडचे लोकं त्यांना घेऊन जायचे. या सर्व स्त्रिया जमल्यानंतर गावात मोठा उत्सव व्हायचा. त्या स्त्रियांना वस्त्र अलंकारांनी सजवून त्यांची पूजा केली जायची. संपूर्ण गावं जेवायला असायची.(Marathi Trending News)

Shravan

इथे या सर्व सवाष्णींनी स्पर्श केलेला नारळ घेऊन तोच वर्षानुवर्षे कानबाईच्या पुजेत वापरला जायचा. आता चाळीसगावजवळ उमरखेडला कानबाईचे मंदिर बांधण्यात आले आहे. ज्यांना पहिल्यांदा कानबाई बसवायची असेल ते नारळ घेऊन तिथल्या मूर्तीला स्पर्श करुन आणतात. मग हाच नारळ कानबाईच्या पूजेसाठी वापरला जातो. पिठामध्ये साजुक तुप घालुन दुधात मळलेली कणिक यादिवशी वापरली जाते. नैवेद्याला अर्थातच पुरणपोळ्या, पुरणाचेच दिवे, देवीचा सगळा साज म्हणजे भंडारा, वेणी, फणी, आरसा, बांगड्या, टिकली, पोळपाट लाटणे, तवा हे सगळं कणकेचेच केले जाते. हे सर्व पदार्थ काशाच्या ताटात ठेवून देवीला ओवाळले जातात. रात्री जागरण केले जाते. फुगड्या घातल्या जातात, गाणी म्हटली जातात. काही जणांकडे फक्त रोट असतात. मग ते रोट परातीत घेऊन कानबाईच्या दर्शनाला येतात. (Top MArathi Headline)

घरी कानबाईच्या दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला लाह्या फुटाण्यांचा प्रसाद दिला जातो. काहींकडे हातापायाची कानबाई असते तर काहींकडे कानबाई- रानबाई अशा दोघी बहिणी दोन वेगवेगळ्या चौरंगावर बसवतात. कानबाईचा उत्सव हा एकाच दिवसाचा असतो. दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी लवकर उठून कानबाईच्या विसर्जनाची तयारी होते. कानबाईची आरती करुन अंगणात चौरंग नेऊन ठेवतात. आजूबाजूच्या सगळ्या कानबाया एका ठिकाणी जमतात आणि एकाच वेळेस निघतात. ढोल ताशांच्या गजरात कानबाईचा चौरंग डोक्यावर घेऊन बायका नदीवर विसर्जनासाठी निघतात. कानबाईचा आणि ज्या स्त्रीने तिला डोक्यावर घेतले त्या स्त्रीचा नमस्कार करण्यासाठी खूप गर्दी होते. (Marathi Latest News)

Shravan

नदीवर विसर्जनाच्या ठिकाणी कानबाईचे पुन्हा आरती केली जाते. कानबाईच्या नारळा व्यतिरिक्त सगळ्याचे विसर्जन होते. नदीतलीच वाळू घेऊन त्यावर कलश, कानबाईचे नारळ घेऊन घरी परततात. नैवेद्याचे पुरणाचे दिवे मोडून त्यांचा बारीक चुरमा केला जातो. या चुरम्यामध्ये दही, दुध, तुप घातले जाते. हा चुरमा आणि पुरणपोळ्या वगैरे देवीला आदल्या दिवशी दाखवलेला नैवेद्य हे एका ताटातच देवीचा प्रसाद म्हणून फक्त घरातलेच लोक खातात. मात्र लग्न झालेल्या मुलींना हा प्रसाद वर्ज्य असतो. (Top Stories)

=========

हे देखील वाचा : Shravan : श्रावणातल्या रविवारी करा आदित्यराणूबाईचे व्रत

=========

कानबाई झाल्यावर दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी पण रोटांचेच जेवण असते. रोट संपेपर्यंत जेवून हात धुतलेले पाणी आणि उष्ट्या ताटातील पाणी खड्डा करुन त्यात ओतले जाते. काहीही उष्ट गटारीत किंवा इकडे तिकडे पडू दिले जात नाहीत. पौर्णिमेच्या आत हे रोट संपवावे लागतात. जर पौर्णिमा आली आणि हे पीठ संपले नाही तर उरलेले पीठ खड्डा करुन त्यात पुरतात. (Social Updates)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.