Home » Shravan : महादेवाच्या पूजेतील बेलपत्राचे महत्व

Shravan : महादेवाच्या पूजेतील बेलपत्राचे महत्व

by Jyotsna Kulkarni
0 comment
Shravan
Share

आज श्रावणातला पहिला सोमवार आहे. श्रावण महिना सुरु झाल्यांनतर प्रत्येक जणं याच सोमवारची आतुरतेने वाट बघत असतो. जरी पूर्ण श्रावण महिना आणि या महिन्यात कधीही शंकराच्या पूजेला महत्व असले तरी सोमवारची विशेषतः जरा जास्तच असते. या दिवशी सकाळी लवकर उठून शंकराच्या मंदिरात किंवा घरी असलेल्या शिवलिंगाची पूजा केली जाते. देवाला दुग्धाभिषेक करून पांढरे फुल आणि बेल वाहिला जातो. शंकराला बेल अतिशय प्रिय आहे. त्यामुळेच अनेक घरांमध्ये श्रावणातल्या सोमवारी शंकराला १०८ बेलपत्र वाहण्याची देखील पद्धत असते. बेलपत्र वाहताना ‘ॐ नमः शिवाय’ चा जप करत हे वाहिल्यास खूपच शुभ मानले जाते. आज आपण शंकराच्या पूजेतील बेलपत्राचे महत्व आणि बेलपत्राची माहिती याबद्दलच जाणून घेऊया. (Shravan Somvar)

श्रावन महिन्यात भगवान शंकराच्या पूजेमध्ये बेलपत्राचे विशेष महत्त्व आहे. मात्र शिवाला बेलपत्रच का वाहिले जाते? यामागे एक खास कारण असल्याचे सांगितले जाते. किंबहुना यामागे एक पौराणिक कथा खूपच प्रचित आहे. समुद्रमंथनातून बाहेर पडलेल्या हलाहल विषामुळे संपूर्ण जग संकटात सापडले होते. या विषामुळे संपूर्ण सृष्टी नष्ट झाली असती. अशा वेळेस भगवान शिवांनी सृष्टीचे रक्षण करण्यासाठी ते विष पिऊन जगाला वाचवण्याचे ठरले. त्यांनी ते विष पिऊन आपल्या घशात ठेवले. मात्र या विषाचा परिणाम महादेवांना देखील जाणवू लागला. (Marathi News)

या विषामुळे भगवान शंकराच्या शरीराचे तापमान वाढू लागले, त्यांच्या शरीराची लाहीलाही होऊ लागली आणि संपूर्ण सृष्टी आगीसारखी जळू लागली. त्यामुळे पृथ्वीवरील सर्व प्राण्यांचे जीवन जगणे कठीण झाले आहे. शंकरांचा त्रास कमी करण्यासाठी प्रत्येक जणं प्रयत्न करू लागला, मात्र कोणालाही यश मिळत नव्हते. शेवटी या विषाचा प्रभाव दूर करण्यासाठी काही देवतांनी शिवाला बेलपत्र खाऊ घातले. बेलपत्र खाल्ल्याने महादेवांना आराम मिळू लागला आणि विषाचा प्रभाव कमी झाला. बेलपत्रामुळे भोलेनाथांना आराम मिळाला आणि त्यांना बरे वाटले म्हणूनच तेव्हापासून शिवाला बेलपत्र अर्पण केले जाऊ लागले. (Todays Marathi Headline)

Shravan

बेलपत्राच्या उत्पत्तीची कहाणी
बेलपत्राच्या उत्पत्तीची कथा स्कंद पुराणात सांगितली आहे. त्या कथेनुसार, एकदा पार्वती देवीच्या घामाचे काही थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातून बेलाच्या झाडाची निर्मिती झाली. बेलवृक्षाच्या मूळाशी गिरिजा देवी, खोडात महेश्वर देवी, फाद्यांमध्ये दक्षयायनी देवी, पानांमध्ये पार्वती देवी, फुलांमध्ये गौरी देवी आणि फळांमध्ये कात्यायणी देवीचा वास असतो, अशी मान्यता आहे. तसेच यामध्ये महालक्ष्मी देवीचा वास असतो, असेही सांगितले जाते. शिव-पार्वती पूजनात अर्पण केलेल्या बेलाच्या पानामुळे दोन्ही देवतांचे शुभाशिर्वाद मिळतात आणि जर ही पूजा जोडप्याने केली असेल तर त्यांचे वैवाहिक आयुष्य सुकर होते, अविवाहित लोकांचे लग्न लवकर होते. अशी मान्यता आहे. (Marathi Headline)

आणखी एक आख्यायिका सांगितली जाते. माता पार्वती या भोलेनाथांना प्रसन्न करू शकल्या नाहीत. तेव्हा एका बेलपत्रावर त्यांनी रामाचे नाव लिहून भगवान शंकरांना अर्पण केले. त्यानंतर त्यांच्यावर भोलेनाथ प्रसन्न झाल्यावर त्यांनी पार्वती मातेशी विवाह केला. म्हणूनच बेलपत्राशिवाय भगवान शंकराची उपासना पूर्णच होत नाही. (Top Marathi Headline)

बेलाचे पान अर्पण केल्यानेसुद्धा महादेव प्रसन्न होतात. बेलाच्या पानामध्ये तीन पाने एकत्र जोडलेली आहेत. हे तीन पानं ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जातात. या बेलाच्या पानांचा संदर्भ बऱ्याच पुराणात केला आहे. शिवपुराणात बेलपत्राबद्दल म्हटले आहे की बेलाचे पान हे भगवान शंकराचे प्रतीक आहे. खुद्द भगवान शिव देखील या बेलाच्या पानांचा महिमा मान्य करतात. शिवाय असे देखील म्हटले आहे की, जो कोणी बेलाच्या झाडाच्या मुळाजवळ शिवलिंग ठेऊन त्याची पूजा करतो तो नेहमी आनंदी राहतो, त्याच्या कुटुंबावर कधीही संकट येत नाही. (Social News)

Shravan

महादेवांना बेलाचे पान अर्पण करताना, ‘त्रिदल त्रिगुणाकार त्रिनेत्रं च त्रिधायुतम | त्रीजन्मपापसंहारम बिल्वपत्रं शिवार्पणम ‘ या मंत्राचा जप करावा. या मंत्राचा अर्थ असा होतो की तीन गुण, तीन डोळे, त्रिशूल धारण करणारे आणि तीन जन्मांचे पाप नष्ट करणारे हे भगवान शिव, तुम्हाला तीन पाने असलेले बेलाचे पान मी अर्पण करत आहे. (Marathi Latest Headline)

बेलाची पाने तोडताना देखील खास काळजी घ्यावी लागते. हे बेलपत्र तोडताना शिवाचे नामस्मरण केले पाहिजे. याशिवाय, चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी, संक्रांत आणि अमावास्या या तिथींना तसेच सोमवारी बेलाची पाने तोडू नयेत. तीन पान असलेले बेलपत्रच शंकराला अर्पण करावे. तीन पाने नसलेले बेलाचे पान शंकराला वाहू नये. शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना एकाच वेळी ५ बेलपत्र अर्पण करावीत. (Marathi Trending News)

शिवलिंगावर बेलपत्र नेहमी उलटे अर्पण करावे. म्हणजे बेलपत्राचा गुळगुळीत भाग वरच्या बाजूला असावा. देवाला हे बेलपत्र वाहण्याआधी बेलपत्रांना शुद्ध पाण्याने स्वच्छ करा. नंतर एका भांड्यात दूध घ्या आणि त्यात बेलपत्र शुद्ध करा. यानंतर गंगाजलानेही बेलपत्र शुद्ध करा. त्यानंतर त्यावर सुगंधी अत्तर शिंपडून ‘ओम नमः शिवाय’ किंवा बेलपत्र वाहण्याच्या मंत्राचा उच्चार करून बेलपत्र देवाला अर्पण करावे. (Top Marathi NEws)

=========

हे देखील वाचा : Nagpanchami : श्रावण महिन्याच्या पंचमी तिथीला साजरी होणारी ‘नागपंचमी’

Shravan : श्रावणातला पहिला सोमवार महादेवाला अर्पण करा ‘ही’ शिवामूठ

=========

महादेवाला बेलपत्रे अर्पण करणे अतिशय महत्वाचे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शंकराचे मन शांत राहते आणि ते प्रसन्न होतात. विधिवत पूजन आणि बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शिव भक्तांवर प्रसन्न होतात. भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. बेलपत्र अर्पण केल्याने व्यक्तीचे पाप नष्ट होत जीवनात येणाऱ्या संकटांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. (Top Stories)

बेलाची पाने आरोग्यासाठी देखील अतिशय प्रभावी आहेत. कॅल्शियमयुक्त गुणधर्मांनी समृद्ध असलेले बेलाचे पान आरोग्याच्या अनेक समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी मदत करते. पचन, मधुमेह, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. बेलाची पाने पचन सुधारण्यास मदत करतात, ज्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, आम्लता आणि अपचन यासारख्या समस्या कमी होतात. बेलपत्र रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते आणि मधुमेहींसाठी फायदेशीर ठरू शकते. बेलपत्र हृदय निरोगी ठेवण्यास आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. (Social Updates)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.