आज श्रावणातला दुसरा सोमवार. श्रावण महिना आणि श्रावणातील सोमवाराला मोठे महत्व असते. श्रावणात महादेवाच्या उपासनेला महत्व आहे. चातुर्मासात भगवान विष्णू निद्राधीन झाल्यानंतर शिव या सृष्टीचे पालकत्व स्वीकारतात आणि तिचा सांभाळ करतात. त्यामुळे हा काळ महादेवांच्या पूजेसाठी जास्तच लाभदायक समजला जातो. अनेक लोकं श्रावणात किंवा श्रावणातल्या सोमवारी महादेवाच्या महत्वाच्या आणि मोठ्या मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतात. हिंदू धर्मामध्ये १२ ज्योतिर्लिंगांना अनन्यसाधारण महत्व आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात हे १२ ज्योतिर्लिंग आहेत. यातलेच पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रामध्ये आहेत. दररोजच या मंदिरांमध्ये मोठी गर्दी असते, मात्र श्रावणात आणि त्यातही सोमवारी या मंदिरांचे दर्शन घेण्याचे खास महत्व आहे. आज दुसऱ्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने आपण जाणून घेऊया महाराष्ट्रातील अतिशय प्रसिद्ध अशा घृष्णेश्वर महादेव मंदिराबद्दल. (Ghrushneshwar Temple)
१२ ज्योतिर्लिंगापैकी एक प्रसिद्ध मंदिर आणि १२ वे ज्योतिर्लिंग म्हणून घृष्णेश्वर मंदिर ओळखले जाते. हे एक प्राचीन शंकराचे मंदिर असून ते औरंगाबाद जिल्ह्यात स्थित आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद पासून सुमारे ११ कि. मी. अंतरावर आणि वेरूळ लेण्यांपासून हे मंदिर जवळ आहे. शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथांत या ठिकाणाचे उल्लेख आढळतात.(Marathi News)
वेरूळ गावातील येलगंगा नदीजवळ हे मंदिर वसलेले असून छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा सर्वात आधी १६ व्या शतकात जीर्णोद्धार केला. या मंदिरावर अनेक परकीय आक्रमणं झाली. मालोजीराजे भोसले यांच्यानंतर इ.स. १७३० मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी घृष्णेश्वराचे मंदिर पुन्हा बांधले. त्यांच्यानंतर अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार केला. मंदिराचे बांधकाम लाल रंगांच्या दगडामध्ये करण्यात आले आहे. या मंदिराचे नक्षीकाम अवर्णनीय आहे. या मंदिराला २७ सप्टेंबर १९६० रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले. (Todays Marathi Headline)
========
Shravan : आजचा दुसरा श्रावणी सोमवार, आज कोणती शिवामूठ वाहणार?
=========
घृष्णेश्वराच्या मंदिराजवळून अत्यंत पवित्र असलेली येळगंगा नदी वाहते. २४० फूट लांब आणि १८५ फूट रुंद हे मंदिर आहे. घृष्णेश्वराचा गाभारा १७ फूट लांब व १७ फूट रुंद असून श्री भगवान शंकराचे हे दिव्य ज्योतिर्लिंग पूर्वाभिमुख आहे. गाभाऱ्यासमोर सभा मंडपात भला मोठा नंदी ही आहे. या मंदिराच्या परिसरामध्ये अंतर्गत कक्ष आणि गर्भगृह आहे. याची रचना लाल रंगाच्या दगडांनी बनलेली आहे. तसेच याचे बांधकाम ४४ हजार ४०० चौरस फूट क्षेत्रावर पसरलेले आहे. हे मंदिर सर्वात लहान ज्योतिर्लिंग आहे.(Shravan Somvar Special)
मंदिराच्या अर्ध्या उंचीपर्यंत लाल रंगाच्या पाषाणात श्री विष्णूंचे दशावतार दाखवणाऱ्या अनेक मूर्ती कोरलेल्या आहेत. मोठ्या दगडात घडवलेल्या २४ खांबांवर सभामंडप आधारलेला आहे. यातील प्रत्येक खांबावर नक्षीकाम केलेले आहे. तसेच अनेक सुंदर चित्रे ही कोरलेली आहेत. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात पारंपारिक दक्षिण भारतीय वास्तूकला आपल्याला पाहायला मिळते. या मंदिराच्या आवारात मुख्य मंदिरा शिवाय इतरही अनेक छोटी मोठी मंदिरे आहेत. सुधर्मा, सुदेहा आणि घृष्मा यांच्या पौराणिक कथेनुसार याला घृष्मेश्वर हे देखील नाव पडले आहे. (Marathi Trending News)
घृष्णेश्वर मंदिरापासून साधारणपणे पाचशे मीटर अंतरावर शिवालय तीर्थ नावाचे एक प्रसिद्ध कुंड आहे. हे कुंड साधारणपणे एक एकर परिसरात असून चारही बाजूने आत जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या कुंडाला एकूण ५६ पायऱ्या आहेत. तसेच या शिवालय कुंडात भगवान शंकराची आठ मंदिरे आहेत. उत्तरेस काशी, ईशान्येस गया तीर्थ, पूर्वेस गंगातीर्थ, आग्नेयेला वीरज, दक्षिणेस विशाल, नैऋत्येस नाशिक तीर्थ इत्यादी. अष्टतीर्थे या ठिकाणी पहावयास मिळतात. घृष्णेश्वर मंदिर हे सकाळी ५.३० वाजता उघडते. आणि रात्री ९.३० वाजता बंद होते. तसेच श्रावण महिन्यात हे मंदिर पहाटे ३ वाजता उघडते आणि रात्री ११ वाजता बंद होते.(Marathi Latest News)
घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग कथा
घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची कहाणी पती-पत्नी जोडप्या सुधर्मा आणि सुधा यांच्या कथेपासून सुरू होते. दोघेही त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदी होते, परंतु ते बालसुखापासून वंचित होते आणि हे सिद्ध झाले की सुदेहा कधीही आई होऊ शकत नाही. म्हणून सुदेहाने तिचा पती सुधर्मा हिची धाकटी बहीण घुश्मासोबत लग्न केले. वेळ गेला आणि घुश्माच्या गर्विष्ठतेपासून, एक सुंदर मुलाचा जन्म झाला. पण हळू हळू तिच्या हातातून तिचा पती, प्रेम, घर आणि आदर जात असल्याचे पाहून सुधाच्या मनात ईर्षेची बीजं फुटू लागली आणि एके दिवशी संधी पाहून तिने मुलाची हत्या केली आणि त्याच तळ्यामध्ये त्याचे शरीर त्या तलावात दफन केले ज्यात घुश्मा शिवलिंगाचे विसर्जन करत होती. (Top Marathi News)
सुधर्माची दुसरी पत्नी घुश्मा, जी भगवान शिवची भक्त होती, ती दररोज सकाळी उठून 101 शिवलिंगे बनवून पूजन करायची आणि नंतर तलावामध्ये विसर्जित करत असे. मुलाची बातमी ऐकून चहूबाजूंनी आक्रोश झाला, पण दररोज प्रमाणेच, घुश्माही शिवलिंग बनवून शांत मनाने भगवान शिवाची पूजा करत राहिली आणि जेव्हा ती तलावात शिवलिंगाचे विसर्जन करायला गेली, तेव्हा तिचा मुलगा जिवंत बाहेर आला आला. त्याच वेळी भगवान शिव सुद्धा घुश्माला दिसले. (Top Stories)
भोलेनाथ सुधाच्या या कृतीवर रागावले आणि तिला शिक्षा आणि घुश्माला वरदान देऊ इच्छित होते. पण घुश्माने सुधेला क्षमा करावी अशी विनवणी केली आणि भगवान शंकराला लोकांच्या कल्याणासाठी येथे राहण्याची प्रार्थना केली. घुश्माची विनंती मान्य करून भोलेनाथ शिवलिंगाच्या रूपाने येथेच राहू लागले आणि हे स्थान जगभरात घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध झाले. (Social News)
========
Varanasi : तिळभांडेश्वर मंदिराचे रहस्य !
=========
घृष्णेश्वर मंदिरात कसे पोहचाल?
विमान – संभाजीनगर विमानतळावरून घृष्णेश्वर मंदिरापर्यंत जवळपास ३६ किलोमीटरचे अंतर आहे. या ठिकाणी येण्यासाठी १ तास लागतो.
ट्रेन – संभाजीनगर रेल्वे स्टेशन ते घृष्णेश्वर मंदिर यामध्ये जवळपास ३८ किलोमीटरचे अंतर असून ४४ मिनिटांचा कालावधी लागतो.
बस – संभाजीनगर बस स्थानकापासून घृष्णेश्वर मंदिरापर्यंत जवळपास २८ किलोमीटरचे अंतर असून ४३ मिनिटांचा कालावधी लागतो.
खाजगी वाहने – संभाजीनगर या मोठ्या शहराला राष्ट्रीय महामार्गाने जोडलेले असल्यामुळे खाजगी वाहनाने देखील या ठिकाणी प्रवास करून येऊ शकता.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics