Shravan 2024 : वाराणसी आपल्या प्राचीन मंदिर आणि धार्मिक स्थळांमुळे प्रसिद्ध आहे. या शहाराला धार्मिक आणि संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे. वाराणसीमध्ये देश-विदेशातून पर्यटक भेट देण्यासाठी येतात. येथेच भगवान शंकरांचे एक मंदिर आहे, जे अत्यंत खास मानले जाते. या मंदिराचे महत्व हे त्याची पौराणिकता, भाविकांच्या मनातील श्रद्धा आणि धार्मिक मान्यतेसंबंधित आहे. मंदिरात येणाऱ्या भाविकांमधील नकारात्मक उर्जा दूर होते. पण मंदिराची खासियत अशी की, येथे भगवान शंकरांच्या बालरुपी मुर्तीची पूजा केली जाते. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर..
बटुक भैरव शिव मंदिर
बटुक भैरव शिव मंदिर वाराणसीच्या कमच्छा येथे आहे. येथे भगवान शंकरांचे बालरुप आहे. याशिवाय मंदिराच्या दुसऱ्या हिस्स्याच्या येथे भैरव यांच्या रुपात विराजमान आहेत. मंदिराचे पूजारी असे सांगतात की, येथे दर्शन केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या मंदिराबद्दल काही धार्मिक मान्यताही आहेत. बटुक भैरवांचे बालरुप मंदिरात पहायला मिळते. येथे दरशन केल्यानंतर आयुष्यातील संकटेही दूर होतात. असे मानले जाते की, बाबा यांचे दर्शन केल्यानंतर बाळाची इच्छाही पूर्ण होते.
मंदिराची खास मान्यता
भगवान शंकरांना टॉफी बिस्किटचा प्रसाद दिला जातो. असे केल्याने बाळाचे सर्व कष्ट दूर होतात. धार्मिक मान्यतेनुसार, बटुक भैरव हे भगवान शंकर आणि कालीचा पुत्र असल्याचे मानले जाते. (Shravan 2024)
मंदिऱ उघडण्याची वेळ
-मंदिर पहाटे 4 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आणि दुपारी 4 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत खुले असते.
-मंदिरात तीनवेळा आरती होते. यामुळे तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा आरतीला उपस्थितीत राहू शकता. ही आरती विशेष आणि मोठी असते. यावेळी नगाडेही वाजवले जातात.