दररोज अंघोळ करणे म्हणजे दिनचर्येचाच एक महत्वाचा भाग आहे. अनेकांना अंघोळ करायला खूपच कंटाळा येतो. मात्र अंघोळ केल्यानंतर शरीरातील संपूर्ण थकवा निघून जातो. अंघोळ केल्याने एनर्जी तर येतेच सोबतच ताजेतवाने आणि सकारात्मक वाटते. काही लोकांना दिवसातून दोनवेळा किंवा त्याहीपेक्षा जास्त अंघोळ करण्याची सवय असते. त्यामुळे असे लोकं केव्हाही अंघोळ करतात. यात काही चुकीचे नाही, मात्र कधी कधी हे लोकं जेवण झाल्यानंतर लगेच अंघोळ करतात. (Health news)
आपण देखील कधी जेवल्यानंतर अंघोळ करायला जातो. पण जेवण केल्यानंतर लगेच अंघोळ करणे खूपच चुकीचे आहे. याचे अनेक दुष्परिणाम आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर होतात. आजकाल अनेक लोकं आयुर्वेद फॉलो करतात. आयुर्वेदानुसार फिट आणि निरोगी राहण्यासाठी उपाय करतात. मात्र याच आयुर्वेदामध्ये जेवल्यानंतर अंघोळ करणे अयोग्य सांगण्यात आले आहे. एवढेच नाही, तर यामुळे अनेक तोटे आपल्याला होतात. आज आपण ये लेखातून याबद्दल माहिती जाणून घेऊया. (Todays Marathi Headline)
जेवणानंतर लगेच अंघोळ करण्याचे दुष्परिणाम :
आयुर्वेदातही याबाबत सांगितले आहे की, जेवल्यानंतर लगेच आंघोळ केल्याने पचनक्रिया मंदावते. जेवताना आपले अन्न पचनास मदत करण्यासाठी पोटाभोवती रक्त परिसंचरण वाढते. त्याचवेळी, जेवल्यानंतर आंघोळ केल्याने हे रक्त परिसंचरण कमी होते. ज्यामुळे पचन मंदावते. जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा शरीरात अग्नितत्व सक्रिय होते. अन्न लवकर पचण्यासाठी शरीरात रक्ताभिसरण वाढते. आंघोळ करताना शरीराचे तापमान कमी होते. ज्यामुळे पचनक्रिया मंदावते. त्यामुळे ऍसिडिटी वाढणे, अपचन किंवा गॅस होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे जेवणानंतर लगेच अंघोळ करू नये. (Marathi Trending News)
जेवणानंतर लगेच अंघोळ केल्यामुळे शरीराचे तापमान कमी होते. अशा परिस्थितीत, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, हात, पाय, चेहरा यासारख्या शरीराच्या इतर भागात रक्त प्रवाह वाढतो. त्यामुळे शरीरात अस्वस्थता वाढते. अन्नपचन योग्यरित्या होत नाही किंवा पचण्यास जास्त वेळ लागतो. यामुळे आपल्याला वजन वाढीच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते.(Top Marathi News)
पचनक्रिया मंदावल्याने शरीराच्या काही भागांमध्ये गॅस तयार होतो. शिवाय पोटात अन्न असल्याने थकवा आणि सुस्तपणा जाणवतो. शिवाय अन्न पोटात गेल्याने आपण कोणतेही काम नीट करू शकत नाही. खाल्ल्यानंतर शरीर पचन क्रियेचे कार्य करत असतो. अशा स्थितीत आंघोळ केल्याने या प्रक्रियेत व्यत्यय येतो, ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचन सारख्या समस्या उद्भवतात. (Marathi Latest News)
अन्न खाल्ल्यानंतर लगेच आंघोळ करणे त्वचेसाठी देखील हानिकारक आहे. यामुळे तुम्हाला मुरुम आणि पिंपल्सच्या समस्या उद्भवू शकतात. जेवल्यानंतर लगेच आंघोळ केल्याने अस्वस्थ वाटते. तसेच, यामुळे छातीत जळजळ होण्याची समस्या उद्भवते. अन्न खाल्ल्यानंतर लगेच आंघोळ करणे हाडांसाठी हानिकारक आहे. यामुळे तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. तसेच, यामुळे हाडांमध्ये वेदना निर्माण होऊ शकतात. (Top Stories)
जेवणानंतर किती तासांनी अंघोळ करावी याबद्दल तज्ज्ञ सांगतात की, जेवल्यानंतर किमान २-३ तासांनी अंघोळ करणे चांगले. त्याचबरोबर आंघोळ केल्यावर जेवण केले तर जास्त तेलकट पदार्थ खाऊ नका. यामुळेही पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होते आणि हे तुमच्या आरोग्यांसाठी घातक ठरू शकते. जेवल्यानंतर फळे खाल्ल्याने आम्लपित्त तयार होते. खाल्ल्यानंतर धूम्रपान केल्याने वजन वाढते. खाल्ल्यानंतर १०-१५ मिनिटे चाला. अन्न पचन होईल. (Social News)
(टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून आम्ही यात कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics