Home » आपल्या मुलाला रस्त्यावर झोपण्यासाठी एकटे सोडते आई, कारण ऐकून व्हाल हैराण

आपल्या मुलाला रस्त्यावर झोपण्यासाठी एकटे सोडते आई, कारण ऐकून व्हाल हैराण

by Team Gajawaja
0 comment
Shocking Motherhood in Denmark
Share

एखादी आई आपल्या मुलाला जीवापाड जपते. त्याला ती कधीच एकटे सोडून कुठे जात ही नाही. पण जगात अशी एक आई आहे ही जी आपल्या मुलाला रस्त्यावर एकटे झोपण्यासाठी सोडते. यामागील कारण सुद्धा हैराण करणारे आहे. महिलेने दावा केला आहे की, ती फक्त असे करत नाही तर संपूर्ण डेन्मार्क मध्ये अशा ट्रेंन्ड आहे. अशातच तुमच्या मनात प्रश्न येईल की, अखेर अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे पालकांना आपल्या मुलाला रस्त्यावर सोडून द्यावे लागत आहे. तर जाणून घेऊयात याच विचित्र ट्रेंन्ड बद्दल अधिक. (Shocking Motherhood in Denmark)

तुम्ही हैराण व्हाल की, कोणताही ऋतू असो डेन्मार्क मधील प्रैम मध्ये आपल्या मुलांना एकटे सोडून कामावर पालक निघून जातात. द सन यांच्या रिपोर्टनुसार, चार मुलांची आई एनी सॅम्पल्स हिचे असे म्हणणे आहे की, हे काही कल्चर नाही पण डिलिव्हरी दरम्यान आता नर्स किंवा आया सुद्धा असे करण्यास प्रेरित करतात. असे करण्यामागे काही कारणं सुद्धा आहेत. ती ऐकून तु्म्हाला विचित्र वाटेल.

Shocking Motherhood in Denmark
Shocking Motherhood in Denmark

या कारणास्तव रस्त्यांवर मुलांना एकटे सोडले जाते
एनी हिचे असे म्हणणे आहे की, आपल्या मुलांना रस्त्यावर अशासाठी एकटे सोडले जाते की, जेणेकरुन त्यांना ताजी हवा मिळण्यासाठी वेळ मिळे. महिलेने असे ही म्हटले की, डेन्मार्क हे अतिशय सुरक्षित आहे. येथे मुलांचे अपहरण होण्याचा धोका सुद्धा नाही. एनीच्या मते, डेन्मार्कचे हेल्थ केअर सिस्टिम प्रत्येक प्रकारच्या सेवा देतात. त्यामध्ये मुलाचे पालन करणे सुद्धा आहे. एनीचे असे ही म्हणणे आहे की, येथे सर्वकाही कमी पैशात होते.

मुलांवर नजर ठेवण्यासाठी केले जाते हे काम
महिलेने असे सांगितले की, काही पालक आपल्या मुलांना रस्त्यांवर किंवा गल्ल्यांमधअये किंवा घराबाहेर काही वेळासाठी एकटे सोडतात. त्यांना माहिती असते की, त्यांचे मुलं सुरक्षित आहे. त्यासाठी पालक मुलांवर नजर ठेवण्यासाठी प्रैम मध्ये बेबी मॉनिटर लावतात. एनीचे असे म्हणणे आहे की, जेव्हा ती कधी ही बाजारात किंवा कॅफे मध्ये जाते तेव्हा आपल्या मुलाला प्रैम मध्ये आराम करण्यासाठी रस्त्यावर एकटी सोडते. (Shocking Motherhood in Denmark)

हे देखील वाचा- जन्मावेळी मुलं का रडते?

दरम्यान, डेन्मार्क मध्ये जेव्हा लोक घरात असतात तेव्हा महिला किचनमधअये कम करतान आपल्या मुलांना प्रैम मध्ये झोपवून त्यांना बागेत काही वेळासाठी एकटे सोडतात. सोशल मीडियात एनीने सांगितल्यानंतर काही पालक संताप व्यक्त करत आहेत. काही लोकांनी तर तिला पागल असल्याचे ही म्हटले आहे. लोकांचे असे म्हणणे आहे की, ते कधीच अशासाठी आपल्या मुलाला रस्त्यावर एकटे सोडणार नाहीत.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.