संपूर्ण मराठी माणसांचे दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. नुसते नाव उच्चारले तरी अंगावर शहारा उभा राहतो आणि ऊर अभिमानाने भरून येतो. संपूर्ण देशाला स्वराज्याचे स्वप्न दाखवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची यंदा आपण ३९६ वी जयंती साजरी करणार आहोत. १९ फेब्रुवारी १६३० रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगडावर जन्म झाला. महाराजांचे संपूर्ण जीवन शौर्य आणि पराक्रमाने भरलेले आहे. त्यांच्याबद्दल काय आणि किती सांगावे असेच कायम होते. सामान्य प्रजेचा राजा असलेल्या महाराजांचे वर्णन करायला कोणतेही खास, मोठे विशेषण न लावता केवळ डोळ्यातच त्यांच्याबद्दल प्रेम, अभिमान दिसून येतो. (Chatrapati Shivaji Maharaj)
महाराजांनी स्वराज्याचा कारभार अतिशय उत्तम आणि चोखंदळपणे चालवला. आजही महाराजांच्या राज्यकारभाराची चर्चा होते, त्यांच्या कामाचे उदाहरणं दिली जातात. काही वर्षांपूर्वी भारतीय नौदलाने ॲडमिरल, व्हाईस ॲडमिरल आणि रिअर ॲडमिरल या दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या इपॉलेटचा नवीन लोगो जारी केला. हा लोगो छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेपासून प्रेरित होता. अशा या महाराजांच्या राजमुद्रेची आजही चर्चा होणे ही आपल्यासाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे. त्यांची एक खास राजमुद्रा देखील तयार केली होती. (Marathi)
पूर्वीच्या काळात पत्रव्यवहार करताना विश्वासार्हता जपण्यासाठी म्हणून मुद्रांची निर्मिती झाली. एका राजाने दुसऱ्या राजाला पाठवलेल्या पत्रातला मजकूर विश्वास ठेवण्यायोग्य आहे की नाही यासाठी मुद्रा हाच एकमेव पर्याय होता. त्यामुळं प्रत्येक राजाची स्वतंत्र मुद्रा होती. छत्रपती राजेंनी पुण्याच्या कारभार आपल्या हाती घेतल्यावर स्वतःची एक स्वतंत्र राजमुद्रा तयार करण्यास सांगितली. या राजमुद्रेवर संस्कृत भाषेत लिहिले होते. ६ जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर मोठ्या थाटामाटात महाराजांचा राज्याभिषेक पार पडला. त्या वेळी त्यांनी स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा निर्माण केली, जी स्वराज्याच्या सार्वभौमत्वाचे प्रतीक होती. ही राजमुद्रा केवळ एक शिक्का नसून मराठ्यांच्या स्वातंत्र्याची, अभिमानाची आणि गौरवशाली परंपरेची ओळख होती. (Todays Marathi Headline)

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेवर (शिवमुद्रा) संस्कृतमध्ये खालील ओळी कोरलेल्या आहेत:
“प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता । शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।”
अर्थात ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र कलेकलेने वाढत जातो, आणि ज्याला सर्व जग वंदन करते, तशीच शहाजीराजांचा पुत्र शिवाजी यांची ही मुद्रा, सर्वांच्या कल्याणासाठी (लोककल्याणासाठी) शोभून दिसत आहे. (Latest Marathi Headline)
ही केवळ एक मोहोर नव्हती, तर स्वराज्याचे ध्येय सांगणारे एक घोषणापत्र होते. यात शिवाजी महाराजांनी स्वतःच्या नावाआधी वडिलांचे (शहाजीराजे) नाव लावून त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त केला आहे, तर ‘भद्राय राजते’ मधून हे राज्य केवळ सत्तेसाठी नसून लोककल्याणासाठी आहे, हे स्पष्ट केले आहे. शिवरायांची राजमुद्रा अष्टकोनी आकाराची आहे. या मुद्रेतून महाराजांनी स्पष्ट केले होते की, त्यांचे राज्य हे स्वतःच्या उपभोगासाठी नसून ‘प्रजेच्या कल्याणासाठी’ (भद्राय) आहे. त्या काळी आदिलशाही आणि निजामशाहीमध्ये ‘फारसी’ भाषेचा वापर व्हायचा, पण महाराजांनी स्वराज्याची ओळख म्हणून मुद्रेसाठी मुद्दाम ‘संस्कृत’ भाषेची निवड केली. (Top Trending News)
“प्रतिपदेचा चंद्र” हे रूपक वापरून महाराजांनी हे सुचवले की, जरी आज स्वराज्य छोटे असले तरी ते भविष्यात पूर्ण चंद्रासारखे विस्तारणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेली राजमुद्रा ही हिंदवी स्वराज्याच्या सार्वभौमत्वाचे प्रतीक होती. तत्कालीन काळात भारतात मुघल, आदिलशाही, निजामशाही आणि इंग्रज यांसारख्या परकीय सत्तांचे वर्चस्व होते. त्यांची स्वतःची राजमुद्रा होती, जी त्यांच्या साम्राज्याच्या अधिकृततेचे प्रतीक मानली जात असे. अशा वेळी शिवाजी महाराजांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्य स्थापन करून त्यासाठी स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा निर्माण केली. ही राजमुद्रा फक्त एक शिक्का नव्हता, तर तो मराठ्यांच्या स्वातंत्र्याची, अस्मितेची आणि अभिमानाची ओळख होती. (Top Stories)
========
Shiv Jayanti : छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ; ‘हे’ होते महाराजांचे अष्टप्रधान
========
शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून स्वातंत्र्याचा मंत्र दिला. त्यांनी कोणत्याही बाह्य शक्तीच्या अधिपत्याखाली न राहता स्वत:चे स्वतंत्र राज्य निर्माण केले. राजमुद्रेच्या माध्यमातून शिवाजी महाराजांनी जगाला जाहीर केले की मराठे स्वतंत्र आहेत आणि त्यांचे स्वतःचे राज्य आहे. स्वराज्य ही कोणत्याही मुघल किंवा परकीय सत्तेच्या आधिपत्याखालील प्रदेश नाही. त्यामुळे राजमुद्रा ही मराठा साम्राज्याच्या सार्वभौमत्वाचे व स्वतंत्र अस्तित्वाचे प्रतिक बनली. शिवाजी महाराजांच्या काळात राजमुद्रेला राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर अत्यंत महत्त्व होते. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
