काशी, वाराणसी ही उत्तरप्रदेशमधील नगरी भगवान शंकाराची नगरी म्हणून ओळखली जाते. वाराणसीच्या गल्लोगल्लीमध्ये भगवान शंकराची मंदिरे आहेत. यापैकी बहुतांश मंदिरे ही पुरातन असून त्यांना ऐतिहासिक महत्त्व आहे. पुराणात या मंदिरांविषयी उल्लेख आहे. त्यामुळे वाराणसीमधील प्रत्येक भगवान शंकाराच्या मंदिरात भाविकांची गर्दी असते. आता तर श्रावण महिन्यानिमित्त ही मंदिरे भक्तांनी गजबजून गेलेली आहेत. मात्र या वाराणसीमध्ये असेही एक मंदिर आहे की, जे श्रावण महिन्यातही भक्तांसाठी उघडण्यात येत नाही. हे मंदिर म्हणजे, प्रत्यक्ष काशी विश्वनाथाचे वडील महेश्वर महादेवाचे मंदिर असल्याची आख्यायिका आहे. असे असले तरी हे मंदिर वर्षातून अगदी ठराविक दिवशीच उघडण्यात येते. बाकी अन्य वेळ भगवान शंकराचे भक्त एका झरोक्याच्या माध्यमातून देवाचे दर्शन घेतात. (Shiva temple)
वाराणसी हे गंगा नदीच्या काठावर वसलेले शहर असून हे शहर मंदिरांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. भारतातील सर्वात पवित्र धार्मिक स्थळांपैकी वाराणसी एक शहर आहे. याच वाराणसीमध्ये असलेले एक मंदिर अनोखे आहे. हे मंदिर पीता महेश्वर मंदिर किंवा पिटा महेश्वर म्हणून ओळखले जाते. पिता महेश्वर शिवलिंग हे वाराणसीमधील छुप्या मंदिरांपैकी एक आहे. पिता महेश्वर मंदिराचे वैशिष्ट म्हणजे, या मंदिरातील शिवलिंग हे जमिनीच्या 40 फूट खाली असून ते स्वयंभू मानले जाते. हे शिवलिंग बघायचे असेल, त्याचे दर्शन घ्यायचे असेल तर त्यासाठी एक जमिनीवर छिद्र केलेले आहे. त्याच माध्यमातून या शिवलिंगाचे दर्शन घडते. हे पिता महेश्वेर मंदिर काशी विश्वनाथाचे वडील महेश्वर महादेवाचे मंदिर आहे.(Shiva temple)
पिता महेश्वर मंदिरात (Shiva temple) असलेले शिवलिंग हे स्वयंभू शिवलिंगाचे रूप मानले जाते. या शिवलिंगाचा उल्लेख स्कंद पुराणातही करण्यात आला आहे. या मंदिरातील महेश्वराची पूजा केल्यास त्या व्यक्तीच्या पुढील 20 पिढ्यांना मोक्ष मिळतो, असे सांगण्यात आले आहे. मुख्य म्हणजे, हे मंदिर फक्त शिवरात्री, रंग भरी एकादशी आणि पावसाळ्यातील सोमवारी अशा निवडक दिवसांमध्ये उघडते. आता श्रावण महिन्यात वाराणसीमधील सर्वच शिवमंदिरे सजलेली असतांना हे पिता महेश्वर मंदिर मात्र बंद आहे. परंतु छिद्रातून या शिवलिंगाचे वर्षभर दर्शन घेण्यात येते. पहाटे हे मंदिर उघडण्यात येते. रात्री दहा वाजता मंदिर बंद होते. मात्र या दरम्यान प्रत्यक्ष मंदिरात जाण्यास बंदी आहे. तर शिवलिंगावर असेल्या छिद्रातून हे दर्शन घेण्यात येते. शिवरात्रीच्या दिवशी हे मंदिर उघडण्यात येते. प्रत्यक्ष जाऊन या शिवलिंगाचे दर्शन भाविकांना घेता येते. त्यावेळी येथे लाखोंची गर्दी होते. (Shiva temple)
गंगा आणि वाराणसीचे अस्तित्व नव्हते तेव्हापासून या मंदिराची स्थापना झाल्याचे मानले जाते. जेव्हा देवी-देवता काशीला आले तेव्हा आपले वडील न दिसल्यानं ते खूप निराश झाले. आपल्या आई-वडिलांनीही या ठिकाणी वास्तव्य करावे, अशी भावना त्यांच्या मनात आली. मग देवांनी पिता महेश्वरांना आमंत्रण दिले आणि देवांच्या आवाहनावरून येथे भगवान शिवाचे पिता महेश्वर महादेव यांचे आगमन झाले. पिता महेश्वर महादेव गंगा नदीच्या काठावर बसले, तेच हे स्थान असल्याचे सांगण्यात येते. सिंधिया घाटाजवळ असलेल्या या मंदिरातील शिवलिंग जमिनीपासून सुमारे 40 फूट खाली आहे. बरोबर शिवलिंगाच्या वर एक मोठे छिद्र आहे ज्यातून नागरिक दर्शन घेतात. (Shiva temple)
=============
हे देखील वाचा :भारताचा विकास दर 4 तिमाहीत सर्वाधिक, एप्रिल-जूनमध्ये 7.8 टक्के ग्रोथ
=============
या मंदिरात (Shiva temple) प्रवेश करण्याचा मार्ग वर्षातून एकदाच शिवरात्रीच्या दिवशी उघडला जातो आणि त्याच दिवशी रुद्राभिषेकही केला जातो. मात्र हा मार्ग उघडण्यापूर्वी त्याची साफसफाई काळजीपूर्वक केली जाते. जवळपास वर्षभर हा मार्ग बंद असल्यामुळे आणि मंदिर जमिनीपासून 40 फूट खाली असल्यामुळे या भागात साप आणि विंचू मोठ्याप्रमाणात सापडतात. या मंदिराचा उल्लेख काशीखंडातही आहे. वर्षभर हे पिता महेश्वर मंदिर बंद असले तरी या मंदिराला भेट देणा-या शिवभक्तांची संख्या जास्त असल्यामुळे मंदिर परिसरात निवासासाठी धर्मशाळा आहेत. या धर्मशाळा मोठ्या आणि प्रशस्त असून त्यातील भक्तांची मोफतही सोय कऱण्यात येते.
सई बने