Shiv Temples in India : देश-विदेशात भगवान शंकराची काही शक्तिशाली मंदिरे आहेत. ज्याच्या अख्यायिका अनोख्या आहेत. काहीजण असे मानतात की, या मंदिरामध्ये गेल्याने कपलच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. अशातच काही मंदिरे कपल्ससाठी अत्यंत खास असल्याचे मानली जातात. खरंतर, भारतात भगवान शंकराची पूजा केली जाते. जाणून घेऊया भारतातील अशी काही मंदिरे जेथे कपलने लग्नानंतर नक्की दर्शन घेतले पाहिजे.
वेमुलावाडा राजराजेश्वर मंदिर
तेलंगणामधील राजन्ना सिरसिला जिल्ह्यातील वेमुलावाडा देवस्थान येथे राजराजेश्वर मंदिर आहे. हे मंदिर आपल्या बांधकाम आणि पावित्र्यासाठी प्रसिद्ध आहे. हैदराबादपासून जवळजवळ 150 किमी दूरवर वेमुलावाडा राजराजेश्वर मंदिर स्थित आहे. असे मानले जाते की, या मंदिराचे बांधकाम 8व्या ते 10व्या शतकात झाले होते.
मंदिरात एक धर्म गुंडम जल दिसून येईल. या कुंडाला अत्यंत पवित्र मानले जाते. दर्शनासाठी येणारे भाविक धर्म गुंडम जलात पवित्र स्नान करतात. कारण असे केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते.
श्री कल्याण सुंदरेश्वर मंदिर
श्री कल्याण सुंदरेश्वर मंदिर तमिळनाडूमधील नागपट्टिनम जिल्ह्यातील थिरुमानम चेरी नावाच्या ठिकाणी आहे. हे मंदिर विवाहित जोडपी आणि विवाहाची इच्छा असणाऱ्या कपल्ससाठी खास असल्याचे मानले जाते. मंदिरात विवाह संबंधित दोष दूर करण्यासाठी पूजा केली जाते. असे मानले जाते की, या मंदिरात शंकर आणि देवी पार्वतीने विवाह केला होता.
त्रिगुणीनारायण
उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यात त्रिगुणीनारायण मंदिर आहे. हे मंदिर भगवान विष्णूंना समर्पित आहे. पण हे ठिकाण भगवान शंकर आणि देवी पार्वतीच्या विवाहाच्या दृष्टीने पाहिले जाते. हे मंदिर डेस्टिनेशन वेडिंग स्थळासाठी प्रसिद्ध आहे. (Shiv Temples in India)
वर्ष 2018 पासून त्रिगुणीनारायण मंदिरात उत्तराखंड सरकारने लग्न करण्यासाठी परवानगी दिली आहे. येथे दूरवरुन लोक येतात. या मंदिरात विवाह केल्याने नातेसंबंधं अधिक घट्ट होतात असे मानले जाते.