Home » शिवसेनेचे निवडणूक चिन्ह का गोठवण्यात आलंय?

शिवसेनेचे निवडणूक चिन्ह का गोठवण्यात आलंय?

by Team Gajawaja
0 comment
Shiv Sena Symbol
Share

निवडणूक आयोगाने नुकत्याच शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवले आहे. यामुळे आता शिवसेनेच्या चिन्हावरुन नवा वाद सुरु झाला आहे. आता पक्ष कोणाचा असेल असा मोठा प्रश्न उपस्थितीत झालाच आहे. पण पक्षाने नाव कोणाला मिळणार आणि कोण कोणत्या निवडणूक चिन्हावर आपली निवडणूक लढवणार हे सुद्धा पाहणे फार महत्वाचे ठरणार आहे. याच दरम्यान, असे समोर येत आहे की, उद्धव ठाकरे यांनी आपल्या आवडीच्या निवडणूक चिन्हासाठी तीन पर्याय निवडणूक आयोगाला दिले आहेत. तर आज आज दोन्ही गटांनी निवडणूक आयोगाला दुपारी १ वाजेपर्यंत आपले निवडणूकीचे चिन्ह पाठवले आहे. (Shiv Sena Symbol)

शिवसेनेचे चिन्ह का गोठवण्यात आले आहे?
जेव्हा एखाद्या पक्षाचे विभाजन होते किंवा त्यांच्यामध्ये फूट पडते तेव्हा निवडणूक चिन्हावरुन दावेदारी सुरु होते. दोन्ही गट आपल्या पक्षाचे राहिलेले चिन्ह निवडणूकीसाठी वापरु पाहते. अशातच निवडणूक आयोग दखल घेते आणि पक्षाचे निवडणूकीचे चिन्ह गोठवते. गेल्या वर्षात अशीच फूट लोक जनशक्ति पार्टी मध्ये पडली होती. तेव्हा निवडणूक आयोगाने एलपीजीचे निवडणूक चिन्ह बंगला हे गोठवले होते. शिवसेनेच्या प्रकरणी सु्द्धा आता अशाच प्रकारच्या निर्णयाच्या नुसर निवडणूक आयोग हे सुनिश्चित करते की, होणाऱ्या पोटनिवडणूकीत पक्षातील दोन गटांपैकी कोणीही ते चिन्ह निवडणूक चिन्ह म्हणून वापरु नये.

Shiv Sena Symbol
Shiv Sena Symbol

आता जेव्हा निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्य-बाण गोठवले आहे तर प्रश्न असा उपस्थितीत राहतो की, एकनाथ शिंदे आणि ठाकरे गट काय करणार? कोणते असेल निवडणूक चिन्ह किंवा काय असेल नवे नाव? पण निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना उपलब्ध असलेल्या चिन्हांपैकी आपल्या आवडीचे चिन्ह निवडण्यास सांगितले आहे. आयोगाने पक्षाच्या नावासंदर्भात ही असे म्हटले की, दोन्ही गट आपल्या पक्षाच्या नावात सेन या शब्दाचा वापर करु शकतात. आता तर हे स्पष्ट झाले आहे की, भविष्यात शिवसेनेला एक नवे निवडणूक चिन्ह आणि नावासह निवडणुकीत उतरावे लागणार आहे. (Shiv Sena Symbol)

हे देखील वाचा- काँग्रेसच्या अध्यक्षपदी ‘या’ नेत्यांची लागली होती वर्णी, पण जेव्हा नेहरुंसह गांधींच्या उमेदवारांचा ही झाला होता पराभव

धनुष्य बाण कधी झाले होते शिवसेनेचे निवडणूक चिन्ह?
बाळासाहेब ठाकरे यांनी सन १९६६ मध्ये शिवसेनेची स्थापना केली होती. त्याच्या दोन वर्षानंतर १९६८ मध्ये त्याची एक राजकीय पक्षात रुपात रजिस्ट्रेशन झाले. तेव्हा पक्षाचे निवडणूकीचे चिन्ह ढाल आणि तलवार होते. १९७१ मध्ये शिवसेनेने निवडणूक लढवली. पण विजय झाला नाही. सन १९७८ मध्ये पक्षाने रेल्वे इंजिनचे चिन्ह ठेवले. सन १९८५ मध्ये विधानसभा निवडणूकीत जेव्हा धनुष्य बाण चिन्हासह निवडणूक लढवली तेव्हा पक्षाचा विजय झाला.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.