महाविकास आघाडी सरकरला नुकताच मोठा फकटा बसला असून त्यांचे सरकार कोसळले गेले. खरंतर एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेना ही सत्तेतून बाहेर पडली. अशातच आता राज्यात शिवसेना आणि भाजप प्रणित सत्ता स्थापन झाली आहे. मात्र ही सत्ता स्थापन होण्यापूर्वी एकनाथ शिंदे हे कशा पद्धतीने नॉट रिचेबल झाले आणि त्यांनी कशा प्रकारे आमदार एकत्रित केले हे आपण गेले काही दिवस पाहतच होतो. अखेरच्या क्षणाला जेव्हा राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार यावर जोरदार चर्चा होती ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची, पण झाले असे की, मुख्यमंत्री म्हणून चक्क एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली आणि सर्वांचे डोळे हे उघडेच राहिले. नक्की काय सुरु आहे राज्यात हे कोणालच कळतं नव्हतं पण एकनाथ शिंदेंना पाठिंबा देणारे कार्यकर्ते, नेतेमंडळी, घरातील मंडळी ही फार आनंदात होती. एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात सुद्धा त्यांचे भरपावसात जंगी स्वागत करण्यात आल्याचे पाहिले. असो शिवसेनेसोबत बंडखोरी करणारे एकनाथ शिंदे हे पहिलेच नेते नाहीत. यापूर्वी सुद्धा बड्या बड्या राजकीय नेत्यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली आणि त्यांची बंडखोरी सुद्धा तितकीच चर्चेत आली जशी एकनाथ शिंदेची. तर पाहूयात शिवसेनेसोबत बंडखोरी केलेले हे नेते सध्या काय करतात त्याबद्द अधिक.(shiv sena rebellion politician)
-राज ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे बंधू राज ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा राजकरणासाठी नव्हे तर घरातील मंडळींसाठी सुद्धा तो मोठा धक्का होता. खरंतर बाळ ठाकरे यांच्या पावलावर पाऊल ठेवत राज ठाकरे यांनी राजकरणात एन्ट्री केली होती. काका बाळ ठाकरे यांच्यासारखे राज ठाकरे यांचे व्यक्तीमत्त्व आणि बोलण्याची पद्धत ही तशीच असल्याने राज हेच ठाकरे परिवाराचे राजकीय वारसदार असल्याचे मानले जाऊ लागले. परंतु महाबळेश्वर येथे झालेल्या अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्षपद सोपवण्यात आले. अशातच ठाकरे परिवाराचे आणि शिवसेना पक्षाचे वारसदार म्हणून असतील हे फायनल झाले. पण २७ नोव्हेंबर २००५ रोजी राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तेव्हा राज ठाकरेंनी माझा वाद हा ”विठ्ठलाशी नसून विठ्ठलाभोवतीच्या बडव्यांशी आहे” असे म्हटले होते. तर ९ मार्च २००६ रोजी राज ठाकरे यांनी स्वत:चा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून स्थापन केला.
-गणेश नाईक
आधी कट्टर शिवसैनिक, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि नंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे खंदे समर्थक आणि आता भाजपावासी असलेले गणेश नाईक यांची नवी मुंबईचे गॉड अशी ओळख आहे. परंतु गणेश नाईक यांनी शिवसेनेसोबत केलेली बंडखोरी सुद्धा सर्वांच्या लक्षात आहे. खरंतर युतीची सत्ता आल्यानंतर मनोहर जोशी आणि नारायण राणे यांच्याकडे मुख्यमंत्री पद आले होते. अशातच गणेश नाईक यांना मुख्यमंत्री पदाची इच्छा होती. पण तेव्हा त्यांना ना मुख्यमंत्री ना चांगल मंत्रीपद ही दिले गेले. पर्यावरण मंत्रीपद देत त्यांना गप्प केले. त्यामुळे नाराज झालेले गणेश नाईक यांनी शिवसेना सोडल्याने राजकीय विश्लेषकांकडून सांगितले जाते.
-नारायण राणे
नारायण राणे यांचा जन्म कोकणातील आहे. वयाच्या २० व्या वर्षी नारायण राणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. कट्टर शिवसैनिकांपैकी असलेले नारायण राणे हे नेहमीच राजकरणात सक्रिय होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वातील एक नेते म्हणून नारायण राणे ओळखले जात होते. तर मुंबईत ८५ च्या काळात महापालिका बेस्ट समितीचे अध्यक्षपद नारायण राणे यांना दिले गेले. त्यानंतर ९० च्या वर्षात कणकवली- मालवण विधानसभा मतदारसंघातून नारायण राणे यांना आमदारकी मिळाली. पण १९९१ मध्ये जेव्हा छगन भुजबळ यांनी शिवसेनेला राम राम केला आणि नतर विधिमंडळातील विरोधीपक्ष नेतेपदाची संधी राणेंकडे आली.
भाजप-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये मनोहर जोशी यांना गैरव्यवहाराचा सामना करावा लागल्याने जोशींनी राजीनामा दिला आणि नंतर राणे हे मुख्यमंत्री झाले. तर ९ महिन्यांसाठी राणे हे मुख्यमंत्री झाले होते. पण त्याच दरम्यान शिवसेनेचा उत्तराधिकारी म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. तेव्हा राणे यांना वाईट वाटले. २००५ मध्ये शिवसेनाला राणे यांनी राम राम ठोकत काँग्रेसमध्ये एन्ट्री केली. पण तेथे ही ते फार काळ टिकले नाही. २००९ च्या आघाडी सरकारमध्ये नारणे यांना उद्योग खाते दिले गेले. पण त्यांना मुख्यमंत्री पदाची आशा होती. पण २०१८ मध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष राणेंनी स्थापन केले. त्याच दरम्यान, भाजपच्या तिकिटावर राणे हे राज्यसभेवर गेले. नारायण राणे यांचा पक्ष ही भाजपात विलिन झाला.(shiv sena rebellion politician)
हे देखील वाचा- विद्यार्थी चळवळ ते ‘काय झाडी’… डायलॉगने चर्चेत आलेले शाहाजीबापू कोण?
-छगन भुजबळ
शिवसेनेतील आमदार, माझगाव शिवसेना शाखाप्रमुख ते माजी माहापौर राहिलेले छगन भुजबळ यांनी सुद्धा शिवसेनेसोबत केलेल्या बंडखोरीची चर्चा सुद्धा जोरदार झाली होती. त्याआधी ९० च्या दशकात जेव्हा बाबरी मशिदीचा मुद्दा जोर धरत होता तेव्हा शिवसेना आणि भाजप यांनी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमामात हिंदुत्वाचा नारा लावला होता. पण पुढे जाऊन भाजप-शिवसेना पक्षाची युती झाली. परंतु दोन्ही पक्षाला आपली सत्ता राज्यात येणार असे वाटत होते. तेव्हा भुजबळ आणि मनोहर जोशी यांना आपणच मुख्यमंत्री होणार अशी स्वप्न पाहत होते. त्याचवेळी ठाकरे विरुद्ध पवार असा वाद राज्यात सुरु होता. विधानसभेच्या निवडणूकीत बाजी मार पवारांनी ठाकरेंना मात दिली आणि आपली सत्ता स्थापन केली. त्या निवडणूकीत शिवसेनेचे ५२ आमदार निवडून आले आणि शिवसेना प्रमुख विरोधी पक्ष म्हणून घोषित झाला. त्याचवेळी भुजबळ यांना विरोधी पक्ष नेतेपद हेवे पण ते दिले गेले नसल्याने भुजबळ नाराज झाले आणि येथेच बंडाची पहिली ठिगणी पडली.
खरंतर ९० च्या काळात तत्कालीन पंतप्रधान व्हिपी सिंग यांनी मंडल आयोगाच्या आधारे अन्य मागास वर्गीयांसाठी केंद्र सरकारच्या आस्थापनांमध्ये २७ टक्के आरक्षण हे जाहीर केले होते. तर राज्यात मंडल आयोगाची अंमलबजावणी केली जावी अशी भुजबळ यांनी मागणी केली होती. त्यानंतर सतत भुजबळ यांचे मतभेद होऊ लागले होते. अखेर मतभेद अधिक वाढल्याने त्यांनी शिवसेना सोडली. ज्यावेळी भुजबळ यांनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांनी आपल्यासोबत १८ आमदार स्वत: सोबत घेतले होते.(shiv sena rebellion politician)
-सुभाष साबणे
शिवसेनेचे नेते सुभाष साबणे यांनी गेल्याच वर्षात शिवसेनेचा हात सोडला. त्यानंतर साबणे यांना भाजपने देगलूर बिलोली जागेसाठी उमेदवारी जाहीर केली. पण जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले होते. तर १९८४ पासून इतके वर्ष शिवसेनेत घालवली पण अशोक चव्हाण यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून मला शिवसेना सोडली असे म्हटले. शिवसेना सोडताना अतिशय वाटत आहे असे ही साबणे यांनी म्हटले. बाळासाहेबांनी मला खुप प्रेम दिले तसेच उद्धव ठाकरेंनी सुद्धा जे मागितले ते दिले. पण शिवसेना संपवण्याचा प्रयत्न नांदेडमध्ये अशोक चव्हाण करत आहेत असा आरोप ही साबणे यांनी केला होता.